logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रामनगर येथील प्रतिबंधित क्षेत्र खुले करा; ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे ​महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी जागा देण्याची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन ​खामगाव :येथील रामनगर भागातील ज्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध समाज बांधव धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरे करत आहेत, ती जागा प्रशासनाने 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित केली आहे. आगामी काळात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव येत असल्याने, ही जागा तत्काळ खुली करण्यात यावी, अशी मागणी रामनगर येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे रामनगर (ता. खामगाव) येथे १९८० च्या पुनर्वसनापासून बौद्ध समाजाचे अनुयायी वास्तव्यास आहेत. येथील एका विशिष्ट जागेवर समाजाचा निळा ध्वज, बुद्ध विहार व समाज मंदिर असून, ही जागा त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. याच ठिकाणी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, इतर महापुरुषांचे जन्मोत्सव, लग्न सोहळे आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. गावात याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही मोकळी जागा उपलब्ध नाही. ​प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी प्रशासनाने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर क्षेत्र 'प्रतिबंधित' म्हणून घोषित केले आहे. यामुळे सध्या येथे कोणतेही कार्यक्रम घेता येत नाहीत. या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून, कोणताही वाद नसताना किंवा प्रकरण न्यायप्रविष्ट नसताना जागा बंद का करण्यात आली? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ​निवेदनातील प्रमुख मागण्या : ​आगामी महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी जागा खुली करण्यात यावी. ​नियोजित लग्न समारंभांसाठी परवानगी मिळावी. ​तरुणांना व्यायामासाठी उपलब्ध असलेली ही जागा पूर्ववत करण्यात यावी.​भारतीय संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखला जावा.​हे निवेदन मंगला अनिल सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुमन सिरसाट, कल्पना सिरसाट, यमुना सिरसाट, प्रमिला सूर्यवंशी, अलका शेगोकार, शिलाबाई सिरसाट यांच्यासह रामनगरमधील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1 hr ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago
03faa2cd-54bc-4f76-9478-448deabf7c4c

रामनगर येथील प्रतिबंधित क्षेत्र खुले करा; ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे ​महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी जागा देण्याची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन ​खामगाव :येथील रामनगर भागातील ज्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध समाज बांधव धार्मिक व सामाजिक कार्यक्रम साजरे करत आहेत, ती जागा प्रशासनाने 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून घोषित केली आहे. आगामी काळात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव येत असल्याने, ही जागा तत्काळ खुली करण्यात यावी, अशी मागणी रामनगर येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे रामनगर (ता. खामगाव) येथे १९८० च्या पुनर्वसनापासून बौद्ध समाजाचे अनुयायी वास्तव्यास आहेत. येथील एका विशिष्ट जागेवर समाजाचा निळा ध्वज, बुद्ध विहार व समाज मंदिर असून, ही जागा त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. याच ठिकाणी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, इतर महापुरुषांचे जन्मोत्सव, लग्न सोहळे आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. गावात याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही मोकळी जागा उपलब्ध नाही. ​प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी प्रशासनाने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर क्षेत्र 'प्रतिबंधित' म्हणून घोषित केले आहे. यामुळे सध्या येथे कोणतेही कार्यक्रम घेता येत नाहीत. या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून, कोणताही वाद नसताना किंवा प्रकरण न्यायप्रविष्ट नसताना जागा बंद का करण्यात आली? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ​निवेदनातील प्रमुख मागण्या : ​आगामी महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी जागा खुली करण्यात यावी. ​नियोजित लग्न समारंभांसाठी परवानगी मिळावी. ​तरुणांना व्यायामासाठी उपलब्ध असलेली ही जागा पूर्ववत करण्यात यावी.​भारतीय संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखला जावा.​हे निवेदन मंगला अनिल सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सुमन सिरसाट, कल्पना सिरसाट, यमुना सिरसाट, प्रमिला सूर्यवंशी, अलका शेगोकार, शिलाबाई सिरसाट यांच्यासह रामनगरमधील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shivaji Bhosale
    1
    Post by Shivaji Bhosale
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच
    1
    युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.
    1
    स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.
    1
    या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बातमी :
मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    17 hrs ago
  • एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे
    1
    एकता नगर  वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे
नगरपंचायत बाशिटाकळीमधील 
कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे
    user_Samrat Dhole
    Samrat Dhole
    Tailor बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • #marathi#newsjalna#
    1
    #marathi#newsjalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    3 hrs ago
  • प्रतिनिधि.... दिलीप मोरे  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    2
    प्रतिनिधि....
दिलीप मोरे 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला.
या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे 
गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ​खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. ​महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ​उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. ​या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
    1
    ​खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.
​महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ​उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. ​या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.