Shuru
Apke Nagar Ki App…
खामगाव: वामन नगर चौकातील पाईपलाईन लिकेज झाल्याने पाण्याचा अपव्यय
Shivaji Bhosale
खामगाव: वामन नगर चौकातील पाईपलाईन लिकेज झाल्याने पाण्याचा अपव्यय
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Shivaji Bhosale1
- राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; 5 दिवसांत 40 लाखांची विक्री! बुलढाणा : जिजामाता प्रेक्षागार येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सोमवारी महोत्सवाची दिमाखदार सांगता झाली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळून अवघ्या पाच दिवसांत तब्बल 40 लाखांहून अधिक विक्री झाली. महिला उद्योजकांच्या स्टॉल्स, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव रंगला. उत्कृष्ट उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला असून या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळाल्याचे प्रशासनाने सांगितले. महिलांच्या कष्टाला बाजारपेठ — राजमाता महोत्सव ठरला यशस्वी!1
- युद्धाचं खरं कारण हे एपस्टीन फाईलच1
- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.1
- एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे1
- Post by Sharad Dayedar1
- खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1