देगलूर तालुक्यातील गाय गोठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात माधव मारकवाड यांचे आमरण उपोषण. नांदेड / छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात सन 2021 ते 2024 या कालावधीत शासनाच्या गाय गोठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. देगलूर पंचायत समिती कार्यालयातील तत्कालीन गटविकास अधिकारी शेखर देशमुख, तत्कालीन एपीओ नामदेवराव ढाले, संबंधित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच अभियंता यांनी संगनमत करून तालुक्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्षात गाय गोठे न बांधता लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माधव संभाजीराव मारकवाड यांनी मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडे यासंदर्भात सविस्तर तक्रार सादर केली होती. तथापि, अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी किंवा संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माधव संभाजीराव मारकवाड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. देगलूर तालुक्यातील सर्व गावांमधील गाय गोठा योजनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अपहार झालेला निधी वसूल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. माधव मारकवाड यांनी सांगितले की, शासनाच्या गरीब व शेतकरी हिताच्या योजनांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करण्यात आला असून, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना योजनेचा कोणताही फायदा मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनामुळे देगलूर तालुक्यातील गाय गोठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Post by Today One Live1
- Post by माधव गायकवाड4
- Post by Karan1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Today One Live1