logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गेले अनेक दिवस आमदार रोहितदादा पवार अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेतील झिरो अवरमध्ये हा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करून अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम आणि स्पष्ट मागणी केंद्र सरकारसमोर मांडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत चौकशीचे आश्वासन दिले आहे, मात्र केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे.आता केंद्र सरकारनेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता राज्य सरकारशी समन्वय साधून तातडीने निष्पक्ष चौकशी सुरू करावी आणि अजितदादांना न्याय द्यावा, हीच सुप्रियाताई सुळे यांची ठाम मागणी आहे. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. *JusticeForAjitdada*

7 days ago
user_मन्सूर शेख
मन्सूर शेख
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
7 days ago

गेले अनेक दिवस आमदार रोहितदादा पवार अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेतील झिरो अवरमध्ये हा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करून अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम आणि स्पष्ट मागणी केंद्र सरकारसमोर मांडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत चौकशीचे आश्वासन दिले आहे, मात्र केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे.आता केंद्र सरकारनेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता राज्य सरकारशी समन्वय साधून तातडीने निष्पक्ष चौकशी सुरू करावी आणि अजितदादांना न्याय द्यावा, हीच सुप्रियाताई सुळे यांची ठाम मागणी आहे. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. *JusticeForAjitdada*

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आळंदि पुणे : - आळंदी परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या सहा वर्षीय चिमुकली आणि ७० वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली असून, संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. या वादाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.... #आळंदी_दुहेरीहत्या #पुणे_क्राइम #बालहत्या #क्राइम_न्यूज #पिंपरी_चिंचवड_पोलीस #हत्या_प्रकरण #धक्कादायक #गुन्हेगारी #महाराष्ट्र_न्यूज #ब्रेकिंग_न्यूज #AlandiMurderCase #PuneCrime #DoubleMurder #ChildMurder #CrimeNews #PimpriChinchwadPolice #BreakingNews #MaharashtraNews #ShockingCrime #PoliceInvestigation
    1
    आळंदि पुणे : - 
आळंदी परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या सहा वर्षीय चिमुकली आणि ७० वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली असून, संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे.
धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. या वादाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत....
#आळंदी_दुहेरीहत्या #पुणे_क्राइम #बालहत्या #क्राइम_न्यूज #पिंपरी_चिंचवड_पोलीस #हत्या_प्रकरण #धक्कादायक #गुन्हेगारी #महाराष्ट्र_न्यूज #ब्रेकिंग_न्यूज
#AlandiMurderCase #PuneCrime #DoubleMurder #ChildMurder #CrimeNews #PimpriChinchwadPolice #BreakingNews #MaharashtraNews #ShockingCrime #PoliceInvestigation
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक
श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड)  येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , 
अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    1
    आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    1
    वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त 
मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण...
आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते...
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि‌. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    1
    सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत  18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Vijay Meher
    1
    Post by Vijay Meher
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Voice of people परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    1
    गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    1
    स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥
हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥
सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥
अर्थ
स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.