logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड भवन येथे भावाच्या हातातून भावाचा खून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे

6 hrs ago
user_Sham Thakur
Sham Thakur
Aurangabad•
6 hrs ago

सिल्लोड भवन येथे भावाच्या हातातून भावाचा खून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे

More news from Aurangabad and nearby areas
  • सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    Aurangabad•
    6 hrs ago
  • रविवार ठरला मृत्यूचा वार!; हर्सूल तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शहरातील हर्सूल परिसरात असलेल्या तलावात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास काही तरुण हर्सूल तलावात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल भागात गेल्यामुळे ते बुडू लागले. सोबत असलेल्या इतरांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू करून सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर चौघांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सूचना: उन्हाळ्याच्या काळात तलाव, धरण किंवा खोल पाण्यात पोहण्यासाठी जाताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
    1
    रविवार ठरला मृत्यूचा वार!; हर्सूल तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शहरातील हर्सूल परिसरात असलेल्या तलावात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास काही तरुण हर्सूल तलावात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल भागात गेल्यामुळे ते बुडू लागले. सोबत असलेल्या इतरांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
बचाव कार्य सुरू करून सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर चौघांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सूचना:
उन्हाळ्याच्या काळात तलाव, धरण किंवा खोल पाण्यात पोहण्यासाठी जाताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची नुकसानग्रस्त शेती ची पाहणी, पाऊस वारा गारपिट मुळे पिकाचे नुकसान झाले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली.
    1
    सोयगाव तालुक्यातील शिवारामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची नुकसानग्रस्त शेती ची पाहणी, पाऊस वारा गारपिट मुळे पिकाचे नुकसान झाले आहेत आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*
    1
    आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पारंपरिक अंत्यसंस्कार पद्धतींना पर्यावरणपूरक पर्याय देत तुकाराम मुंढे यांनी एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. आई आसराबाई यांच्या निधनानंतर अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी त्यांनी त्या शेतात वृक्षारोपणासह अर्पण करत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव असलेल्या मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मूळगावी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर सावडण्याच्या दिवशी पारंपरिक अस्थी विसर्जन न करता कुटुंबियांनी घरासमोरील शेतात वडाचे झाड लावले. त्या खड्ड्यात आईच्या अस्थींची राख अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले.
    1
    पारंपरिक अंत्यसंस्कार पद्धतींना पर्यावरणपूरक पर्याय देत तुकाराम मुंढे यांनी एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. आई आसराबाई यांच्या निधनानंतर अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी त्यांनी त्या शेतात वृक्षारोपणासह अर्पण करत समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे माजी सचिव असलेल्या मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंडे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मूळगावी बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना येथे अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर सावडण्याच्या दिवशी पारंपरिक अस्थी विसर्जन न करता कुटुंबियांनी घरासमोरील शेतात वडाचे झाड लावले. त्या खड्ड्यात आईच्या अस्थींची राख अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    35 min ago
  • प्रतिनिधी जालना सेवा, समर्पण, आणि संघटन तत्वावर काम करत पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार उत्कृष्ट काम करत आहे आमदार बबनराव लोणीकर आजच्या डिजिटल युगात पक्ष प्रशिक्षण महत्वाचे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे भाजपाचा इतिहास हा संघर्षाचा महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे केंद्र व राज्याच्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त* किशोर आबा पवार भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्रवास “काल, आज आणि उद्या” या विषयावर माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. ते परतूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते या वेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा “काल” म्हणजे संघर्ष, त्याग आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचा कालखंड होता. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या “अंत्योदय” या विचारधारेवर चालत पक्षाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. त्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी यांचा जय संघ पासून सुरू झालेला प्रवास तदनंतर अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी प्रमोद जी महाजन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाची पायाभरणी मजबूत केली. “आज”च्या काळात भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. “उद्या”बाबत बोलताना लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात पक्षाचा विस्तार करताना युवकांना मोठ्या प्रमाणात जोडणे, तसेच गावपातळीपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जागतिक सद्य परिस्थितीवर भाष्य करताना बबनराव लोणीकर यांनी इराण-अमेरिका तणावाबाबतही आपले मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर थेट परिणाम पुणे शक्य नसून जागतिक पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नीतीमुळे संपूर्ण जगप्रभात झाले आहे त्यामुळे या युद्धाचा कुठलाच परिणाम भारतावर होणार नसल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण सध्या सक्षम व संतुलित असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींना तोंड देण्याची क्षमता देशात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भारताने नेहमीच शांतता आणि संवादाच्या मार्गाला प्राधान्य दिले असून, युद्धापेक्षा सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावरील संघर्ष हे तात्पुरते असतात, मात्र देशांतर्गत विकास आणि स्थिरता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ऊर्जा, व्यापार आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारताने पर्यायी व्यवस्था उभी केली असल्यामुळे कोणत्याही तणावाचा कुठलाही परिणाम होणार नाही, भारतातील प्रगतीचा वेग कायम राहणार असून जागतिक संकटांचा त्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाची अंतर्गत शक्ती, युवा वर्ग आणि मजबूत नेतृत्व ही भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारत स्थिर आणि सुरक्षित राहील, असा निष्कर्ष त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांना वीज माफी दिल्यामुळे ही मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगतानाच विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे सांगितले त्याचा परिणाम म्हणून आपल्या भागामध्ये 300 गावाचे वॉटर ग्रीड, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, 14 तेहतीस के व्ही उपकेंद्र आपण उभारू शकलो असे सांगतानाच परतुर मतदारसंघातील जवळपास 42000 हजार घरकुल लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकलो, मतदार संघातील तीनशे गावांमध्ये रस्ते बांधू शकलो, दलित वस्ती धनगर वस्ती, यासह तीनशेच्या आसपास सभा मंडपी आपण बांधू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी पहिल्या सत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणा ची आवश्यकता व महत्त्व या विषयावर भाष्य करताना यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ पक्षाशी निष्ठा असून चालत नाही, तर कार्यकर्त्यांना विचारसरणी, संघटन पद्धती आणि आधुनिक राजकारणातील बदल यांचे ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका स्पष्टपणे समजते आणि ते जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येते, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, संवाद कौशल्य आणि माहितीचे अचूक सादरीकरण ही कार्यकर्त्यांची मोठी ताकद बनली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने अद्ययावत राहून तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच निवडणूक व्यवस्थापन, बूथ पातळीवरील कामकाज, मतदारांशी संवाद आणि संघटन विस्तार या सर्व बाबींमध्ये प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षित कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्यामुळेच पक्ष गावपातळीपर्यंत मजबूत होतो, असेही त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते आवश्यक असल्याचे अधोरेखित केले यावेळी जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी यावेळी बोलताना यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय जनसंघ हा पक्ष राष्ट्रहित, संस्कृती आणि तत्त्वनिष्ठ राजकारण यासाठी ओळखला जात होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर पक्षाची मजबूत पायाभरणी केली. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच पुढे भारतीय जनता पार्टी उदयास आली आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले. भास्करराव दानवे यांनी नमूद केले की, भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारधारा आहे, आज भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघर्ष जाणून घेतल्यास त्यांच्यात काम करण्याची प्रेरणा अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने जनसंघापासून भाजपा पर्यंतचा प्रवास समजून घेत पक्षवृद्धीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मा जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी पोखरा योजना (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) विषयी माहिती देताना सांगितले की, ही योजना शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी मोठा आधार देत आहे. जलसंधारण, मृदसंवर्धन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत असून, यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना चा उल्लेख करत गरीबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे सांगितले राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना त्यांनी महालक्ष्मी योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच विविध पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा विकासाच्या योजनांचा उल्लेख केला. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सह भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, महानगराध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आमदार विलासराव देशमुख, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार जालनाच्या महापौर वंदना मगरे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार,, भगवान मोरे अंकुशराव आवचार गणेश राव खवणे सतीश निर्वळ ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव नितीन राठोड शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाड ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव, गजानन देशमुख, परतूरच्या नगराध्यक्ष प्रियंका राक्षे, मंठा नगराध्यक्ष वंदना बोराडे रमेश भापकर संपत टकले, शहाजी राक्षे वैजनाथ बोराडे पंजाबराव बोराडे दीपक बोराडे विलास घोडके आनंद जाधव, प्रवीण सातोनकर , दिलीप जोशी दया काटे दिलीप पवार पोपटराव खंदारे, संभाजी घनवट माऊली कोंडके अमोल मोरे अग्रवाल प्रकाश चव्हाण सावता काळे, दत्तात्रय काकडे विकास पालवे अजय अवचार शिवाजी जाधव संभाजी वारे तुकाराम सोळंके रवी सोळंके नागेश घारे , राहुल बाहेकर विनोद राठोड प्रदीप ढवळे दिगंबर मुजमुले भगवान आरडे बंडू मानवतकर, मधुकर मोरे संदीप बाहेकर, अमोल जोशी नसरुल्ला काकड आशिक कच्ची बबलू सातपुते , उमेश सोळंके जयश्री पवार रमेश थोरात, अर्जुन राठोड नितीन सरकटे नवनाथ खंदारे रामकिसन बोडके दत्ता खराबे सिद्धेश्वर केकान डॉ स्वप्निल मंत्री , सिद्धेश्वरला आणि अजित पोरवाल गणेश चव्हाण किरण अंभोरे राजाभाऊ खराबे कृष्णा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने या दोन दिवशीय निवासी शिबिरासाठी उपस्थित आहेत
    4
    प्रतिनिधी जालना 
सेवा, समर्पण, आणि संघटन तत्वावर काम करत पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार उत्कृष्ट काम करत आहे आमदार बबनराव लोणीकर
आजच्या डिजिटल युगात पक्ष प्रशिक्षण महत्वाचे
भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे भाजपाचा इतिहास हा संघर्षाचा
महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे केंद्र व राज्याच्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त*
किशोर आबा पवार
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्रवास “काल, आज आणि उद्या” या विषयावर माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
ते परतूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते
या वेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा “काल” म्हणजे संघर्ष, त्याग आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचा कालखंड होता. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या “अंत्योदय” या विचारधारेवर चालत पक्षाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. त्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी यांचा  जय संघ पासून सुरू झालेला प्रवास  तदनंतर अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी प्रमोद जी महाजन  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाची पायाभरणी मजबूत केली.
“आज”च्या काळात भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
“उद्या”बाबत बोलताना लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात पक्षाचा विस्तार करताना युवकांना मोठ्या प्रमाणात जोडणे, तसेच गावपातळीपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जागतिक सद्य परिस्थितीवर भाष्य करताना बबनराव लोणीकर यांनी इराण-अमेरिका तणावाबाबतही आपले मत व्यक्त केले.
त्यांनी स्पष्ट केले की इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर थेट परिणाम पुणे शक्य नसून जागतिक पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नीतीमुळे संपूर्ण जगप्रभात झाले आहे  त्यामुळे या युद्धाचा कुठलाच परिणाम भारतावर होणार नसल्याचे ते म्हणाले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की
भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण सध्या सक्षम व संतुलित असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींना तोंड देण्याची क्षमता देशात आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच भारताने नेहमीच शांतता आणि संवादाच्या मार्गाला प्राधान्य दिले असून, युद्धापेक्षा सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक स्तरावरील संघर्ष हे तात्पुरते असतात, मात्र देशांतर्गत विकास आणि स्थिरता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऊर्जा, व्यापार आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारताने पर्यायी व्यवस्था उभी केली असल्यामुळे कोणत्याही तणावाचा कुठलाही  परिणाम होणार नाही, 
भारतातील प्रगतीचा वेग कायम राहणार असून जागतिक संकटांचा त्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाची अंतर्गत शक्ती, युवा वर्ग आणि मजबूत नेतृत्व ही भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यामुळे इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारत स्थिर आणि सुरक्षित राहील, असा निष्कर्ष त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांना वीज माफी दिल्यामुळे ही मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगतानाच विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे सांगितले त्याचा परिणाम म्हणून आपल्या भागामध्ये 300 गावाचे वॉटर ग्रीड, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, 14 तेहतीस के व्ही उपकेंद्र आपण उभारू शकलो असे सांगतानाच परतुर मतदारसंघातील जवळपास 42000 हजार घरकुल लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकलो, मतदार संघातील तीनशे गावांमध्ये रस्ते बांधू शकलो, दलित वस्ती धनगर वस्ती, यासह तीनशेच्या आसपास सभा मंडपी आपण बांधू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी पहिल्या सत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणा ची आवश्यकता व महत्त्व या विषयावर भाष्य करताना
यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ पक्षाशी निष्ठा असून चालत नाही, तर कार्यकर्त्यांना विचारसरणी, संघटन पद्धती आणि आधुनिक राजकारणातील बदल यांचे ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका स्पष्टपणे समजते आणि ते जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येते, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, संवाद कौशल्य आणि माहितीचे अचूक सादरीकरण ही कार्यकर्त्यांची मोठी ताकद बनली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने अद्ययावत राहून तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.
तसेच निवडणूक व्यवस्थापन, बूथ पातळीवरील कामकाज, मतदारांशी संवाद आणि संघटन विस्तार या सर्व बाबींमध्ये प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षित कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्यामुळेच पक्ष गावपातळीपर्यंत मजबूत होतो, असेही त्यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते आवश्यक असल्याचे अधोरेखित केले
यावेळी जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी यावेळी बोलताना 
यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय जनसंघ हा पक्ष राष्ट्रहित, संस्कृती आणि तत्त्वनिष्ठ राजकारण यासाठी ओळखला जात होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर पक्षाची मजबूत पायाभरणी केली.
त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच पुढे भारतीय जनता पार्टी उदयास आली आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले.
भास्करराव दानवे यांनी नमूद केले की, भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारधारा आहे,
आज भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे.
कार्यकर्त्यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघर्ष जाणून घेतल्यास त्यांच्यात काम करण्याची प्रेरणा अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने जनसंघापासून भाजपा पर्यंतचा प्रवास समजून घेत पक्षवृद्धीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मा जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी पोखरा योजना (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) विषयी माहिती देताना सांगितले की, ही योजना शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी मोठा आधार देत आहे. जलसंधारण, मृदसंवर्धन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत असून, यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले
पुढे बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना चा उल्लेख करत गरीबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे सांगितले
राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना त्यांनी महालक्ष्मी योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच विविध पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा विकासाच्या योजनांचा उल्लेख केला.
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सह भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, महानगराध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आमदार विलासराव देशमुख, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार जालनाच्या महापौर वंदना मगरे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार,, भगवान मोरे अंकुशराव आवचार गणेश राव खवणे सतीश निर्वळ ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव नितीन राठोड  शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाड ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव, गजानन देशमुख, परतूरच्या नगराध्यक्ष प्रियंका राक्षे, मंठा नगराध्यक्ष वंदना बोराडे रमेश भापकर संपत टकले, शहाजी राक्षे वैजनाथ बोराडे पंजाबराव बोराडे दीपक बोराडे विलास घोडके आनंद जाधव, प्रवीण सातोनकर , दिलीप जोशी दया काटे दिलीप पवार पोपटराव खंदारे, संभाजी घनवट माऊली कोंडके अमोल मोरे अग्रवाल प्रकाश चव्हाण सावता काळे, दत्तात्रय काकडे विकास पालवे अजय अवचार शिवाजी जाधव संभाजी वारे तुकाराम सोळंके रवी सोळंके नागेश घारे , राहुल बाहेकर विनोद राठोड प्रदीप ढवळे दिगंबर मुजमुले भगवान आरडे बंडू मानवतकर, मधुकर मोरे संदीप बाहेकर, अमोल जोशी  नसरुल्ला काकड आशिक कच्ची बबलू सातपुते , उमेश सोळंके जयश्री पवार रमेश थोरात, अर्जुन राठोड नितीन सरकटे नवनाथ खंदारे रामकिसन बोडके दत्ता खराबे सिद्धेश्वर केकान डॉ स्वप्निल मंत्री , सिद्धेश्वरला आणि अजित  पोरवाल गणेश चव्हाण किरण अंभोरे राजाभाऊ खराबे कृष्णा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने या दोन दिवशीय निवासी शिबिरासाठी उपस्थित आहेत
    user_Sudarshan Raut
    Sudarshan Raut
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सोयगाव, दि. ०५ : दिंडोरीतील ताज्या दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत एक मालवाहतूक गाडी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कंकराळा गावातील युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात कोणी अडकले आहे का, या भीतीने संपूर्ण गाव विहिरीजवळ जमा झाले होते. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या गंभीर घटनेच्या वेळी एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे समोर आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    सोयगाव, दि. ०५ : दिंडोरीतील ताज्या दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत एक मालवाहतूक गाडी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच कंकराळा गावातील युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात कोणी अडकले आहे का, या भीतीने संपूर्ण गाव विहिरीजवळ जमा झाले होते.
दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, या गंभीर घटनेच्या वेळी एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे समोर आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेमुळे रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.