logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जालन्यातील मंठ्यात अशोका पब्लिक स्कूल आणि छत्रपती संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक भाऊ चव्हाण सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक संजयकुमार चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विधाते उपस्थित होते. या सोहळ्यात ट्रिपल आयआयटी (IIIT) अलाहाबादमध्ये निवड झालेल्या ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ऋग्वेदने आपल्या यशात अशोका पब्लिक स्कूलची जडणघडण, मिळालेले संस्कार आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात एमएच-सीईटी परीक्षेत ९९.५० पर्सेंटाईल मिळवणारा अजिंक्यसिंह अशोकराव चव्हाण, नीट परीक्षेत ५६५ गुण मिळवणारा अनिरुद्ध कैलास शेंडगे आणि दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून मंठा तालुक्यात प्रथम आलेली आकांक्षा पाथरकर यांचाही गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात संजयकुमार चव्हाण म्हणाले की, अशोका पब्लिक स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे. विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून मंठ्याचे नाव उज्ज्वल केले असून, हे शिक्षक, पालक आणि संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. भविष्यातही अशीच गुणवंतांची परंपरा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मोरे यांनी केले, तर प्रा. इर्शाद खान पठाण यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी अलका देशमुख, स्वाती कदम, प्रियंका चिंचणे, सविता राठोड, अश्विनी ठाकूर, धनश्री कापडे, शीतल कुटारे, प्रणिता दळवी, ज्योती शहाणे आणि राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.

12 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
12 hrs ago

जालन्यातील मंठ्यात अशोका पब्लिक स्कूल आणि छत्रपती संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक भाऊ चव्हाण सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक संजयकुमार चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विधाते उपस्थित होते. या सोहळ्यात ट्रिपल आयआयटी (IIIT) अलाहाबादमध्ये निवड झालेल्या ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ऋग्वेदने आपल्या यशात अशोका पब्लिक स्कूलची जडणघडण, मिळालेले संस्कार आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात एमएच-सीईटी परीक्षेत ९९.५० पर्सेंटाईल मिळवणारा अजिंक्यसिंह अशोकराव चव्हाण, नीट परीक्षेत ५६५ गुण मिळवणारा अनिरुद्ध कैलास शेंडगे आणि दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून मंठा तालुक्यात प्रथम आलेली आकांक्षा पाथरकर यांचाही गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात संजयकुमार चव्हाण म्हणाले की, अशोका पब्लिक स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे. विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून मंठ्याचे नाव उज्ज्वल केले असून, हे शिक्षक, पालक आणि संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. भविष्यातही अशीच गुणवंतांची परंपरा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मोरे यांनी केले, तर प्रा. इर्शाद खान पठाण यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी अलका देशमुख, स्वाती कदम, प्रियंका चिंचणे, सविता राठोड, अश्विनी ठाकूर, धनश्री कापडे, शीतल कुटारे, प्रणिता दळवी, ज्योती शहाणे आणि राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यातील मंठ्यात अशोका पब्लिक स्कूल आणि छत्रपती संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक भाऊ चव्हाण सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक संजयकुमार चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विधाते उपस्थित होते. या सोहळ्यात ट्रिपल आयआयटी (IIIT) अलाहाबादमध्ये निवड झालेल्या ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ऋग्वेदने आपल्या यशात अशोका पब्लिक स्कूलची जडणघडण, मिळालेले संस्कार आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात एमएच-सीईटी परीक्षेत ९९.५० पर्सेंटाईल मिळवणारा अजिंक्यसिंह अशोकराव चव्हाण, नीट परीक्षेत ५६५ गुण मिळवणारा अनिरुद्ध कैलास शेंडगे आणि दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून मंठा तालुक्यात प्रथम आलेली आकांक्षा पाथरकर यांचाही गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात संजयकुमार चव्हाण म्हणाले की, अशोका पब्लिक स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे. विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून मंठ्याचे नाव उज्ज्वल केले असून, हे शिक्षक, पालक आणि संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. भविष्यातही अशीच गुणवंतांची परंपरा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मोरे यांनी केले, तर प्रा. इर्शाद खान पठाण यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी अलका देशमुख, स्वाती कदम, प्रियंका चिंचणे, सविता राठोड, अश्विनी ठाकूर, धनश्री कापडे, शीतल कुटारे, प्रणिता दळवी, ज्योती शहाणे आणि राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.
    1
    जालन्यातील मंठ्यात अशोका पब्लिक स्कूल आणि छत्रपती संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक भाऊ चव्हाण सेवाभावी संस्थेचे संस्थापक संचालक संजयकुमार चव्हाण होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव विधाते उपस्थित होते.

या सोहळ्यात ट्रिपल आयआयटी (IIIT) अलाहाबादमध्ये निवड झालेल्या ऋग्वेद जयप्रकाश कीर्तने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ऋग्वेदने आपल्या यशात अशोका पब्लिक स्कूलची जडणघडण, मिळालेले संस्कार आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमात एमएच-सीईटी परीक्षेत ९९.५० पर्सेंटाईल मिळवणारा अजिंक्यसिंह अशोकराव चव्हाण, नीट परीक्षेत ५६५ गुण मिळवणारा अनिरुद्ध कैलास शेंडगे आणि दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून मंठा तालुक्यात प्रथम आलेली आकांक्षा पाथरकर यांचाही गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात संजयकुमार चव्हाण म्हणाले की, अशोका पब्लिक स्कूल ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे. विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून मंठ्याचे नाव उज्ज्वल केले असून, हे शिक्षक, पालक आणि संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. भविष्यातही अशीच गुणवंतांची परंपरा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना मोरे यांनी केले, तर प्रा. इर्शाद खान पठाण यांनी आभार प्रदर्शन केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी अलका देशमुख, स्वाती कदम, प्रियंका चिंचणे, सविता राठोड, अश्विनी ठाकूर, धनश्री कापडे, शीतल कुटारे, प्रणिता दळवी, ज्योती शहाणे आणि राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील टोलनाका लोकलसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
    1
    मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील टोलनाका लोकलसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. भाजपचे आंदोलन संपताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमा होत आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर 'शुद्ध' केल्याचा दावा केला आणि भाजपला जोरदार प्रतीकात्मक प्रत्युत्तर दिले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या आंदोलनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य भूमिका मांडल्याचे सांगत, "चोरी करणाऱ्या आणि दरोडा टाकणाऱ्या भाजपने आमच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे," अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाविरोधात भाजपने आंदोलन केले असते तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, परंतु जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आंदोलनाचे राजकारण करत असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला. या दोन्ही पक्षांच्या आंदोलनामुळे आणि कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात दिलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.
    1
    दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. भाजपचे आंदोलन संपताच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमा होत आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून परिसर 'शुद्ध' केल्याचा दावा केला आणि भाजपला जोरदार प्रतीकात्मक प्रत्युत्तर दिले.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या आंदोलनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य भूमिका मांडल्याचे सांगत, "चोरी करणाऱ्या आणि दरोडा टाकणाऱ्या भाजपने आमच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे," अशी खरमरीत टीका काँग्रेसने केली. राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाविरोधात भाजपने आंदोलन केले असते तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, परंतु जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप आंदोलनाचे राजकारण करत असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला.

या दोन्ही पक्षांच्या आंदोलनामुळे आणि कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात दिलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    42 min ago
  • परभणीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आक्रमक एल्गार पुकारत जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान सुरेश भुमरे यांनीही अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
    1
    परभणीमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आक्रमक एल्गार पुकारत जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान सुरेश भुमरे यांनीही अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच परवा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. "क्षत्रिय मराठे आम्ही शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर महाराष्ट्रातील मराठा समाज दिल्लीच्या छातीवर येऊन बसेल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे जंतर-मंतरवरील या आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    2
    मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली. त्यांच्या आगमनाने आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच परवा आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. "क्षत्रिय मराठे आम्ही शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल, तर महाराष्ट्रातील मराठा समाज दिल्लीच्या छातीवर येऊन बसेल. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमुळे जंतर-मंतरवरील या आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Santram Jadhav
    Santram Jadhav
    Jalna, Maharashtra•
    7 hrs ago
  • केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून अधिक बळकट करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकार विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या संस्थांमार्फत नागरिकांना सीएससी (Common Service Centre) सेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली असून, सीएससी केंद्र चालविण्यास उत्सुक नसलेल्या व निष्क्रिय असलेल्या संस्था तात्काळ सक्रिय करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सहकारी संस्थांनी पूरक व्यवसाय हाती घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यादृष्टीने बैठकीत प्रोत्साहन देण्यात आले. विकेंद्रीत धान्य साठवणूक योजनेअंतर्गत गोदाम उभारणीसाठी जालना जिल्ह्यातील दहा संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, संबंधित संस्थांना शासनाची जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी योजनेबाबत माहिती दिली. या बैठकीस पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दुग्ध सहकारी संस्था, कृषी विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करून पुढील बैठकीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
    1
    केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून अधिक बळकट करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकार विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या संस्थांमार्फत नागरिकांना सीएससी (Common Service Centre) सेवा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली असून, सीएससी केंद्र चालविण्यास उत्सुक नसलेल्या व निष्क्रिय असलेल्या संस्था तात्काळ सक्रिय करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

सहकारी संस्थांनी पूरक व्यवसाय हाती घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यादृष्टीने बैठकीत प्रोत्साहन देण्यात आले. विकेंद्रीत धान्य साठवणूक योजनेअंतर्गत गोदाम उभारणीसाठी जालना जिल्ह्यातील दहा संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, संबंधित संस्थांना शासनाची जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी योजनेबाबत माहिती दिली.

या बैठकीस पशुसंवर्धन विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दुग्ध सहकारी संस्था, कृषी विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक उपस्थित होते. जिल्हाधिकारी मित्तल यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करून पुढील बैठकीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
    user_सय्यद अबरार
    सय्यद अबरार
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    45 min ago
  • बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या 'सदाकत आश्रम' या मुख्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला झालेल्या घोषणाबाजीनंतर या वादाचे रूपांतर थेट दगडफेक आणि हिंसक संघर्षात झाले. या तुफान राड्यात दगडफेक आणि लाठीचार्ज झाला असून अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील या थेट वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
    1
    बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या 'सदाकत आश्रम' या मुख्यालयाबाहेर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार हाणामारी झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला झालेल्या घोषणाबाजीनंतर या वादाचे रूपांतर थेट दगडफेक आणि हिंसक संघर्षात झाले.

या तुफान राड्यात दगडफेक आणि लाठीचार्ज झाला असून अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील या थेट वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.