तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत ,-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे *महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर दि. 11 राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत अशी प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. करमाळा येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. व घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते यावेळीआमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जि. प. सदस्य गणेश चिवटे, रश्मीताई बागल, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सह दुय्यम निबंधक एस. एस. कोकाटे आदी मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, जनतेने गाऱ्हाणी घेऊन मंत्रालयात जाण्याऐवजी मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेचे निवेदन तक्रारी स्वीकारणे व सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे. पुढील चार महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव यातून सुटणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घ्यावी..यापुढे मोजणी प्रक्रियेत गतिमानता येण्यासाठी पंधरा दिवसात मोजणी पूर्ण करणे जिल्ह्यातील पानंद रस्ते व वहीवटीचे रस्ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय साधून प्रत्येक रस्ते शोधून त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी सुरू करावेत. तसेच रस्त्याच्या कडेने झाडे लावावी जेणेकरून झाडे तोडली जाणार नाहीत व रस्ता बंद होणार नाही, जर कोणी रस्ता अडवला तर त्या व्यक्ती वर कारवाई करण्यात येईल, त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण मोजणी होणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांसाठी 24 तास लाईट आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यां च्या मुलांना नोकरी मागण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शेतकरी सदन व समृद्ध होईल. पुढील पाच वर्षात सर्व शेतकऱ्यांचे वहिवाटी चे रस्ते बारमाही सुरू होतील, यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. तसेच राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनधिकृत रहिवासी घरे कायमस्वरूपी त्यांच्या नावे करून रजिस्ट्रीचा खर्च शासन करेल. तसेच हे सरकार जनतेच्या हितासाठी असून जनतेचे प्रश्न सोडवणे हे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. शिवरायांच्या राज्यकारभारात गतिमानता, पारदर्शीपणा आणि लोकाभिमुखता असे शासन होते, समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीचे कल्याण व्हावे असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत त्यानुसार हे सरकार काम करत आहे. नागरिकांनी दिलेल्या, नियमात असलेल्या निवेदना वर तीन दिवसात मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन श्री बावनकुळे यांनी यावेळी नागरिकांना दिले. तसेच देवस्थानाच्या जमिनी बाबत कायद्यात सुधारणा करण्याबाबत त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जनतेची जराही हेळसांड करू नये, जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावेत तसेच भ्रष्टाचाराच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत अशा सूचनाही महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी केल्या.

- वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका नामांकित डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीर वैद्यकीय व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1
- पुण्यातील बालगंधर्व चौकात नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडील आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते, त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.1
- साधं पेट्रोल संपलं म्हणत ग्राहकांना ‘पॉवर पेट्रोल’ची विक्री केली जाते1
- पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून ५६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ते तासगाव तालुक्यातील विसापूर येथील आहेत. खारघर आणि तासगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी यशस्वी कारवाई झाली.1
- पुण्यातील सातारा रोड परिसरात धोकादायक लोंबकळणाऱ्या तारांचे जाळे मृत्यूचा सापळा बनले आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.1
- पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.1