राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत महिलांचे शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी 'पोश' (POSH) कायद्यांतर्गत तक्रार समित्यांची तातडीने स्थापना करण्यात यावी. यासोबतच, केंद्र व राज्य शासनाच्या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जावा. त्यांनी १९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा, कायदे व विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलताना हे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या (पोश ऍक्ट) अंमलबजावणीबाबत बोलताना, रहाटकर यांनी सांगितले की, ज्या संस्था किंवा आस्थापनांमध्ये दहापेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समित्यांची नोंदणी 'शी-बॉक्स' (She-Box) पोर्टलवर करण्यात यावी. कौटुंबिक किंवा घरेलू काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारींसाठी स्थानिक समितीमार्फत तातडीने न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, या दोन्ही समित्यांनी अत्यंत तत्परतेने काम करून पीडित महिलांना न्याय द्यावा असेही त्या म्हणाल्या. त्यांनी महिलांविरुद्ध होणारे गुन्हे आणि जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेत 'दामिनी पथका'ची गस्त अधिक प्रभावी करण्याची सूचना केली. गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनाने अधिक संवेदनशील राहून आपापसात समझोता करण्याच्या प्रवृत्तीवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून व्यापक मोहीम राबवावी, असे निर्देशही अध्यक्षांनी दिले. विविध शासकीय योजनांचा आढावा घेताना, त्यांनी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मुलीचे 'सुकन्या समृद्धी खाते' उघडण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्यास सांगितले. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक गर्भवती महिलेला 'मातृवंदना योजने'चा लाभ मिळेल याकडे विशेष लक्ष देऊन, कोणतीही गर्भवती महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. 'माझी लाडकी बहीण' योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू ठेवण्यासही त्यांनी सांगितले. अत्याचारग्रस्त व पीडित महिलांना 'मनोधैर्य योजने'चा लाभ विनाविलंब मिळवून द्यावा, तसेच संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक आधार देणाऱ्या 'वन स्टॉप सेंटर'ची कार्यपद्धती सुलभ आणि गतिमान करावी. या केंद्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे केंद्र अधिक सक्षम करावे असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी 'ड्रोन दीदी' योजनेला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे आणि 'प्रधानमंत्री आवास योजने'त महिलांच्या नावे घरकुलांचे प्रमाण वाढवून त्यांना प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि 'उमेद' अभियानांतर्गत महिला बचत गटांचे काम जिल्ह्यात चांगले सुरू असून, त्यांनी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणखी जोमाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शेवटी, अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रशासनाला महिलांच्या तक्रारींचे निवारण करताना अधिक संवेदनशील आणि तत्पर राहण्याचा इशारा दिला. जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानकारक वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सक्षम महिलांच्या यशोगाथा समाजासमोर आणून इतर महिलांना प्रेरणा देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत महिलांचे शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी 'पोश' (POSH) कायद्यांतर्गत तक्रार समित्यांची तातडीने स्थापना करण्यात यावी. यासोबतच, केंद्र व राज्य शासनाच्या सर्व महिलाभिमुख योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जावा. त्यांनी १९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा, कायदे व विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलताना हे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या (पोश ऍक्ट) अंमलबजावणीबाबत बोलताना, रहाटकर यांनी सांगितले की, ज्या संस्था किंवा आस्थापनांमध्ये दहापेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत, त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समित्यांची नोंदणी 'शी-बॉक्स' (She-Box) पोर्टलवर करण्यात यावी. कौटुंबिक किंवा घरेलू काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारींसाठी स्थानिक समितीमार्फत तातडीने न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, या दोन्ही समित्यांनी अत्यंत तत्परतेने काम करून पीडित महिलांना न्याय द्यावा असेही त्या म्हणाल्या. त्यांनी महिलांविरुद्ध होणारे गुन्हे आणि जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेत 'दामिनी पथका'ची गस्त अधिक प्रभावी करण्याची सूचना केली. गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनाने अधिक संवेदनशील राहून आपापसात समझोता करण्याच्या प्रवृत्तीवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून व्यापक मोहीम राबवावी, असे निर्देशही अध्यक्षांनी दिले. विविध
शासकीय योजनांचा आढावा घेताना, त्यांनी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सबलीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मुलीचे 'सुकन्या समृद्धी खाते' उघडण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्यास सांगितले. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक गर्भवती महिलेला 'मातृवंदना योजने'चा लाभ मिळेल याकडे विशेष लक्ष देऊन, कोणतीही गर्भवती महिला योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. 'माझी लाडकी बहीण' योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू ठेवण्यासही त्यांनी सांगितले. अत्याचारग्रस्त व पीडित महिलांना 'मनोधैर्य योजने'चा लाभ विनाविलंब मिळवून द्यावा, तसेच संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक आधार देणाऱ्या 'वन स्टॉप सेंटर'ची कार्यपद्धती सुलभ आणि गतिमान करावी. या केंद्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे केंद्र अधिक सक्षम करावे असेही ते म्हणाले. ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी 'ड्रोन दीदी' योजनेला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे आणि 'प्रधानमंत्री आवास योजने'त महिलांच्या नावे घरकुलांचे प्रमाण वाढवून त्यांना प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि 'उमेद' अभियानांतर्गत महिला बचत गटांचे काम जिल्ह्यात चांगले सुरू असून, त्यांनी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणखी जोमाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शेवटी, अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रशासनाला महिलांच्या तक्रारींचे निवारण करताना अधिक संवेदनशील आणि तत्पर राहण्याचा इशारा दिला. जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानकारक वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सक्षम महिलांच्या यशोगाथा समाजासमोर आणून इतर महिलांना प्रेरणा देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
- औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंढरपूर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. २० जून) दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास नेहा हॉस्पिटलसमोर जुबेर दौलतखान पठाण उर्फ सुपड्या याने व्यापारी जावेद इस्माईल शेख यांच्याशी वाद घालत हवेत गोळीबार केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी जावेद शेख हे मित्रासह आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असताना ही घटना घडली. एका साखरपुडा कार्यक्रमात काही युवकांसोबत वाहनातून फिरल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर उपस्थित नातेवाईक व नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने कमरेला लावलेली पिस्टल काढून हवेत एक गोळी झाडली. यावेळी त्याने, “मला पंढरपूरचा डॉन म्हणतात, माझ्या नावालाच लोक घाबरतात,” असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. गोळीबारानंतर आरोपी लाल रंगाच्या क्रेटा कारमधून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी पडलेले कारतूसाचे कवच ताब्यात घेतले असून ते महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे.1
- अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या.1
- पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, म्हणजेच २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये या परीक्षेसाठी १७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक केंद्रावर कडक तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात ठेवण्यासारख्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.1
- महाराष्ट्रातील पातुर येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमला होता, ज्यामुळे सभेला जनसागर उसळल्याचे चित्र होते.1
- २० जून रोजी सायंकाळी ५:५१ च्या सुमारास, अकोट शहर पोलीस स्टेशनला डायल ११२ वर अनिल परशराम जावरकर (वय २९, रा. धारणी, जि. अमरावती) यांनी फोन करून त्यांची पत्नी शर्मिला जावरकर (वय २५) आणि २ वर्षांची मुलगी पायल बस स्टँड परिसरातून हरवल्याची माहिती दिली. अनिल जावरकर यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यांची पत्नी व मुलीसह शेगाव येथून धारणीला जाण्यासाठी अकोटला आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलीला बस स्टँडबाहेर थांबवून खाऊ घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले. थोड्याच वेळात परत आल्यावर त्यांना पत्नी व मुलगी बस स्टँडबाहेर दिसल्या नाहीत. या कॉलची तात्काळ दखल घेत, डायल ११२ वरील ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार सपोउपनि हिंमत दंदी आणि पोकॉ स्वप्निल आढे यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे आणि डायल ११२ चे इन्चार्ज पोउपनि अविनाश मोहीते यांना दिली. त्यानंतर हे अधिकारी अनिल जावरकर यांना भेटून त्यांच्यासोबत अकोट शहरातील बस स्टँड परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॅम्प आणि हिवरखेड रोड परिसरात सुमारे एक तास सतत शोध घेत होते. या शोध मोहिमेदरम्यान, अनिल जावरकर यांची पत्नी सौ. शर्मिला जावरकर आणि मुलगी पायल या रेल्वे स्टेशन परिसरात सुखरूप आढळून आल्या. त्यांना सुरक्षितपणे अनिल जावरकर यांच्या ताब्यात देऊन पोलीस स्टेशनमधून रवाना करण्यात आले. ही संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि मा. सहा. पोलीस अधीक्षक अकोट निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर जुनघरे, पोउपनि अविनाश मोहीते, सपोउपनि हिंमत दंदी व पोकॉ स्वप्निल आढे यांनी केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हरवलेल्या पत्नी आणि मुलीचा शोध घेऊन त्यांना पतीच्या ताब्यात दिले.2
- खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर तीव्र हल्ला चढवला आहे.1
- अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत बनावट केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) अधिकारी बनून एका व्यापाऱ्याकडून लुटलेले २५ लाख रुपयांची रोकड अवघ्या १२ तासांत जप्त केली आहे. या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, LCB च्या जलद तपासामुळे या आरोपींचा पर्दाफाश झाला आहे. अकोला पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.1
- अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांचे पंख, माशाचे तुकडे आणि इतर घाण आढळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर रोष व्यक्त केला आहे. या दूषित पाणीपुरवठ्याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते राम म्हैसने आणि ग्रामस्थांनी पाणीपुरवठा कार्यालय गाठले. त्यांनी अधिकाऱ्यांना दूषित पाणी प्रत्यक्ष दाखवले, ज्यात पक्ष्यांचे पंख आणि माशाचे तुकडे स्पष्टपणे दिसत होते. राम म्हैसने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्टपणे इशारा दिला की, जर त्यांनी यावर त्वरित उपाययोजना केली नाही, तर नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी जे दूषित पाणी दिले जाते, तेच पाणी अधिकाऱ्यांना प्यायला दिले जाईल आणि त्याच पाण्याने त्यांना अंघोळही घालण्यात येईल. तसेच, हा प्रश्न दोन दिवसांच्या आत मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा संतप्त इशारा समस्त ग्रामस्थ आणि गट ग्रामपंचायत लोहारी खुर्द यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.1
- लातूर जिल्ह्याच्या भोईसमुद्रगा शिवारात जनतेला विनाकारण त्रास देणाऱ्या चार वाहतूक पोलिसांना आज सकाळी रंगेहात पकडण्यात आल्याचा दावा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी केला आहे. हे वाहतूक पोलीस सकाळी दोन तासांपासून ट्रक, टिप्पर, ट्रॅव्हल, कार, मोटारसायकल यांसारख्या वाहनांना थांबवून त्यांची कागदपत्रे मागत होते. विशेष म्हणजे, वाहनधारकांकडे सर्व कागदपत्रे असूनही किंवा कोणताही नियमभंग नसतानाही त्यांना त्रास दिला जात होता, असे प्रदीप पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकाराबाबत अनेक नागरिकांनी फोन करून तक्रारी केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन संबंधित वाहतूक पोलिसांना वाहने तपासण्याचे अधिकार कोणी दिले, अशी विचारणा केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, वाहनधारकाची कोणतीही चूक नसताना किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन नसतानाही त्यांना का त्रास दिला जात आहे? वाहने तपासण्याचे अधिकार सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) किंवा उपनिरीक्षक (PSI) दर्जाच्या अधिकाऱ्याला असताना, हे पोलीस असे का करत होते, असा सवाल पाटील यांनी केला. त्यांच्याकडे या ठिकाणी वाहने तपासण्याबाबतची नोंद किंवा 'मूव्हमेंट रजिस्टर' नव्हते, तसेच त्यांना या पॉईंटवर वाहने तपासण्याचे अधिकारही नसल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे आरटीओ निरीक्षकांप्रमाणेच आता वाहतूक पोलीसही जनतेला त्रास देत असल्याचे पाटील म्हणाले. त्यांनी वाहतूक नियमांचा संदर्भ देत स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांना गाडीची चावी स्वतःहून काढण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही आणि असे करणे म्हणजे अधिकारांचा गैरवापर आहे. दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार केवळ ASI किंवा त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच असतात, तर साध्या हवालदाराला ऑन-स्पॉट दंड आकारण्याचा अधिकार नसतो. गणवेशातील पोलीस ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि पीयूसी तपासू शकतात, परंतु केवळ सामान्य तपासणीसाठी विनाकारण अडवू शकत नाहीत; स्पष्ट नियमभंग केल्याशिवाय तपासणी करता येत नाही. तसेच, गाडी जप्त करणे दारू पिऊन गाडी चालवणे, विनापरवाना चालवणे किंवा हिट-अँड-रनसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येच शक्य आहे, केवळ हेल्मेट किंवा कागदपत्रे नसतील तर थेट वाहन जप्त केले जाऊ शकत नाही. जर एखाद्या वाहतूक पोलिसाने गैरवर्तन केले, अनधिकृतपणे चावी काढली किंवा बळजबरी केली, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येते. या पोलिसांना जाब विचारणार कोणी आहे का, असा सवाल करत, आता आपणच यांचा बंदोबस्त करूया, असे आवाहन प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी जनतेला केले आहे. प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणताही आरटीओ इन्स्पेक्टर किंवा वाहतूक पोलीस तुम्हाला त्रास देत असेल किंवा पैशांची (लाच) मागणी करत असेल, तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.1