logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चॉकलेट चे आमिष दाखवून तीन वर्षीय चिमुकलीवर काकाचा अत्याचार चिमुकली अंगणात खेळत असताना काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची मन सुन्न करून अंगावर शहारे आणणारी घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 25 ऑगस्ट 2026 रोज मंगळवार या दिवशी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक मानणाऱ्या काका ने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेलेल्या चिमुकलीवर गैरकृत्य केले, साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. या प्रकरणाची कसून चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याची माहिती समोर आली. पीडितेची प्रकृती स्थिर चिमुकली कथितरित्या आरोपीला बाबा अशी हाक मारायची. मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर डॉक्टरांच्या देखदेखी खाली उपचार सुरू करण्यात आले असून तिची सध्या प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी फरारा झाला असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नांदेड जिल्ह्यात चिमुकलीसह अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याने अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहेत. या अमानुष कृत्याने नांदेड हदरले आहे. जिल्ह्यासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

3 hrs ago
user_जयपाल दावनगीरकर
जयपाल दावनगीरकर
Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
3 hrs ago
57696108-56bc-4b5c-ad02-0cb64bf7f834

चॉकलेट चे आमिष दाखवून तीन वर्षीय चिमुकलीवर काकाचा अत्याचार चिमुकली अंगणात खेळत असताना काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची मन सुन्न करून अंगावर शहारे आणणारी घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 25 ऑगस्ट 2026 रोज मंगळवार या दिवशी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक मानणाऱ्या काका ने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेलेल्या चिमुकलीवर गैरकृत्य केले, साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. या प्रकरणाची कसून चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याची माहिती समोर आली. पीडितेची प्रकृती स्थिर चिमुकली कथितरित्या आरोपीला बाबा अशी हाक मारायची. मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर डॉक्टरांच्या देखदेखी खाली उपचार सुरू करण्यात आले असून तिची सध्या प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी फरारा झाला असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नांदेड जिल्ह्यात चिमुकलीसह अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याने अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहेत. या अमानुष कृत्याने नांदेड हदरले आहे. जिल्ह्यासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली. हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास  अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना  भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना  घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    2
    मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली.
हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास  अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना  भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना  घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मोटरसायकली चोरून भंगार करायचा, भंगाराचे साहित्य विकून पैसे कमवायचे मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. १२ गुन्हे उघडकीस लातूर (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटार सायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटार सायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    1
    मोटरसायकली चोरून भंगार करायचा, भंगाराचे साहित्य विकून पैसे कमवायचे
मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद.  १२ गुन्हे उघडकीस
लातूर  (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटार सायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटार सायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे.
सदर कारवाई  वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने,  पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. 
आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    1
    मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले.

तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे.

सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    1
    🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात!

📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.
    1
    रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार 
बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुरात सुरु होणार हेल्मेट शक्ती. हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा.
    1
    📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुरात सुरु होणार हेल्मेट शक्ती.
हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा.
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer Latur, Maharashtra•
    19 hrs ago
  • मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १२ गुन्हे उघडकीस, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त. मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १२ गुन्हे उघडकीस, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे १) तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटारसायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    1
    मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १२ गुन्हे उघडकीस, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १२ गुन्हे उघडकीस, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर.
मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026.
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे 
१) तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) 
हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटारसायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे.
सदर कारवाई  वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने,  पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. 
आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नांदेड : वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
    1
    नांदेड :  वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात 

 : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.