Shuru
Apke Nagar Ki App…
आपना नगर येथील मंदिर प्रकरण विरोधक जाती जातीत भांडण लावत आहे आमदार डॉ राहुल पाटील आपना नगर येथील मंदिर प्रकरण विरोधक जाती जातीत भांडण लावत आहे आमदार डॉ राहुल पाटील
Sayad Jamil
आपना नगर येथील मंदिर प्रकरण विरोधक जाती जातीत भांडण लावत आहे आमदार डॉ राहुल पाटील आपना नगर येथील मंदिर प्रकरण विरोधक जाती जातीत भांडण लावत आहे आमदार डॉ राहुल पाटील
- Gajanan RathodJintur, Parbhani👏3 days ago
- Gajanan RathodJintur, Parbhani💣3 days ago
More news from Maharashtra and nearby areas
- महापौर सय्यद इकबाल ॲक्शन मोडवर; शंकरनगर डीपी प्रश्न तासाभरात निकाली नागरिकांनी मानले आभार1
- 🚩 नांदेडमध्ये शिवकालीन वैभव अवतरणार: 'सुवर्ण होन' आणि पुरातन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन! नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारे 'शिवकालीन सुवर्ण होन' आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 'नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार' आणि 'नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था, नांदेड' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, नांदेडकरांसाठी ही एक दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे. 🔍 प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे: शिवकालीन सुवर्ण होन: श्री अशोक सिंह ठाकूरजी यांनी संग्रहित केलेला, शिवरायंच्या राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला सोन्याचा 'होन' पाहण्याची संधी पहिल्यांदाच नांदेडमध्ये उपलब्ध झाली आहे. प्राचीन नाणी: निलंगा (लातूर) येथील 'श्री चक्रधर संग्रहालय' यांच्या संग्रहातील इ.स. पूर्व ६०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ऐतिहासिक शस्त्रास्त्रे: 'शहाजीराजे भोसले ऐतिहासिक वस्तू संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट' यांच्याकडील शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येईल. 📍 प्रदर्शनाचा तपशील: दिनांक: शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ ते रविवार, ५ एप्रिल २०२६. वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत. स्थळ: नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नावघाट, नांदेड. विशेष टीप: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी सोन्याचे 'होन' चलनात आणले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशा दुर्मिळ ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. नांदेडमधील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.4
- निर्भीड पत्रकार तथा दैनिक बुलंद शक्ती चे संपादक मा. रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ रद्द करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात दरेकर हे निर्भीड, पुराव्यानिशी पत्रकारिता करणारे व जनहितासाठी सातत्याने लढणारे पत्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, राज्यातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर दरेकर यांनी संबंधितांच्या मालमत्तेबाबत सखोल व पुराव्यानिशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चिकलठाणा एमआयडीसी पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण क्रमांक 167/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 352, 353(2), 356(2), 67 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा फिर्यादी पांडुरंग विठ्ठलराव डक मांडकीकर यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला असला, तरी तो महसूलमंत्री यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या प्रभावाखाली दाखल करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामेश्वर दरेकर यांनी यापूर्वीही विविध प्रकरणांमध्ये पोलिसांच्या कथित भ्रष्टाचाराचे व्हिडिओ व पुरावे समोर आणणे, लाचलुचपत प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणे तसेच अवैध धंदे व प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या प्रकरणाला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात असल्याचे नमूद करत, गुन्ह्याची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा, संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी तसेच दरेकर यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.1
- Post by Today One Live1
- Post by वैजनाथ पावडे1
- छत्रपती संभाजीनगर - पिकअप विहिरीत कोसळले; पहा भयानक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर-जळगाव सीमेलगत असलेल्या कंकराळा शिवारात एक पिकअप चारचाकी वाहन विहिरीत कोसळल्याची घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना सोयगाव तालुक्यात घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप वाहन शिवारातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट शेतातील विहिरीत जाऊन पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने, वाहनातील सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते1
- प्रतिनिधी जालना सेवा, समर्पण, आणि संघटन तत्वावर काम करत पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार उत्कृष्ट काम करत आहे आमदार बबनराव लोणीकर आजच्या डिजिटल युगात पक्ष प्रशिक्षण महत्वाचे भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे भाजपाचा इतिहास हा संघर्षाचा महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे केंद्र व राज्याच्या योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त* किशोर आबा पवार भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्रवास “काल, आज आणि उद्या” या विषयावर माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत सखोल मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. ते परतूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते या वेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा “काल” म्हणजे संघर्ष, त्याग आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाचा कालखंड होता. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या “अंत्योदय” या विचारधारेवर चालत पक्षाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. त्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी यांचा जय संघ पासून सुरू झालेला प्रवास तदनंतर अटल बिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी प्रमोद जी महाजन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनता पक्षाची पायाभरणी मजबूत केली. “आज”च्या काळात भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. “उद्या”बाबत बोलताना लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात पक्षाचा विस्तार करताना युवकांना मोठ्या प्रमाणात जोडणे, तसेच गावपातळीपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जागतिक सद्य परिस्थितीवर भाष्य करताना बबनराव लोणीकर यांनी इराण-अमेरिका तणावाबाबतही आपले मत व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा भारताच्या अंतर्गत परिस्थितीवर थेट परिणाम पुणे शक्य नसून जागतिक पातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नीतीमुळे संपूर्ण जगप्रभात झाले आहे त्यामुळे या युद्धाचा कुठलाच परिणाम भारतावर होणार नसल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण सध्या सक्षम व संतुलित असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय घडामोडींना तोंड देण्याची क्षमता देशात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच भारताने नेहमीच शांतता आणि संवादाच्या मार्गाला प्राधान्य दिले असून, युद्धापेक्षा सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावरील संघर्ष हे तात्पुरते असतात, मात्र देशांतर्गत विकास आणि स्थिरता अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ऊर्जा, व्यापार आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारताने पर्यायी व्यवस्था उभी केली असल्यामुळे कोणत्याही तणावाचा कुठलाही परिणाम होणार नाही, भारतातील प्रगतीचा वेग कायम राहणार असून जागतिक संकटांचा त्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाची अंतर्गत शक्ती, युवा वर्ग आणि मजबूत नेतृत्व ही भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारत स्थिर आणि सुरक्षित राहील, असा निष्कर्ष त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत मोठा दिलासा दिला असून, शेतकऱ्यांना वीज माफी दिल्यामुळे ही मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगतानाच विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे सांगितले त्याचा परिणाम म्हणून आपल्या भागामध्ये 300 गावाचे वॉटर ग्रीड, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग, 14 तेहतीस के व्ही उपकेंद्र आपण उभारू शकलो असे सांगतानाच परतुर मतदारसंघातील जवळपास 42000 हजार घरकुल लाभार्थ्यांना आपण लाभ देऊ शकलो, मतदार संघातील तीनशे गावांमध्ये रस्ते बांधू शकलो, दलित वस्ती धनगर वस्ती, यासह तीनशेच्या आसपास सभा मंडपी आपण बांधू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी पहिल्या सत्रामध्ये भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षणा ची आवश्यकता व महत्त्व या विषयावर भाष्य करताना यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ पक्षाशी निष्ठा असून चालत नाही, तर कार्यकर्त्यांना विचारसरणी, संघटन पद्धती आणि आधुनिक राजकारणातील बदल यांचे ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका स्पष्टपणे समजते आणि ते जनतेसमोर प्रभावीपणे मांडता येते, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया, संवाद कौशल्य आणि माहितीचे अचूक सादरीकरण ही कार्यकर्त्यांची मोठी ताकद बनली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने अद्ययावत राहून तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच निवडणूक व्यवस्थापन, बूथ पातळीवरील कामकाज, मतदारांशी संवाद आणि संघटन विस्तार या सर्व बाबींमध्ये प्रशिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षित कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो आणि त्याच्यामुळेच पक्ष गावपातळीपर्यंत मजबूत होतो, असेही त्यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते आवश्यक असल्याचे अधोरेखित केले यावेळी जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांनी यावेळी बोलताना यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय जनसंघ हा पक्ष राष्ट्रहित, संस्कृती आणि तत्त्वनिष्ठ राजकारण यासाठी ओळखला जात होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठा आणि समर्पणाच्या बळावर पक्षाची मजबूत पायाभरणी केली. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष केला. त्या संघर्षातूनच पुढे भारतीय जनता पार्टी उदयास आली आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले. भास्करराव दानवे यांनी नमूद केले की, भाजपा ही केवळ राजकीय पक्ष नसून एक विचारधारा आहे, आज भाजपा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघर्ष जाणून घेतल्यास त्यांच्यात काम करण्याची प्रेरणा अधिक वाढते, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने जनसंघापासून भाजपा पर्यंतचा प्रवास समजून घेत पक्षवृद्धीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. मा जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार यांनी पोखरा योजना (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) विषयी माहिती देताना सांगितले की, ही योजना शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती टिकवण्यासाठी मोठा आधार देत आहे. जलसंधारण, मृदसंवर्धन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळत असून, यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास हातभार लागत असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना चा उल्लेख करत गरीबांना स्वतःचे घर मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे सांगितले राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना त्यांनी महालक्ष्मी योजना, शेतकरी सन्मान योजना तसेच विविध पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा विकासाच्या योजनांचा उल्लेख केला. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सह भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, महानगराध्यक्ष भास्करराव दानवे, माजी आमदार विलासराव देशमुख, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार जालनाच्या महापौर वंदना मगरे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार,, भगवान मोरे अंकुशराव आवचार गणेश राव खवणे सतीश निर्वळ ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव नितीन राठोड शत्रुघ्न कणसे, विक्रम उफाड ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव, गजानन देशमुख, परतूरच्या नगराध्यक्ष प्रियंका राक्षे, मंठा नगराध्यक्ष वंदना बोराडे रमेश भापकर संपत टकले, शहाजी राक्षे वैजनाथ बोराडे पंजाबराव बोराडे दीपक बोराडे विलास घोडके आनंद जाधव, प्रवीण सातोनकर , दिलीप जोशी दया काटे दिलीप पवार पोपटराव खंदारे, संभाजी घनवट माऊली कोंडके अमोल मोरे अग्रवाल प्रकाश चव्हाण सावता काळे, दत्तात्रय काकडे विकास पालवे अजय अवचार शिवाजी जाधव संभाजी वारे तुकाराम सोळंके रवी सोळंके नागेश घारे , राहुल बाहेकर विनोद राठोड प्रदीप ढवळे दिगंबर मुजमुले भगवान आरडे बंडू मानवतकर, मधुकर मोरे संदीप बाहेकर, अमोल जोशी नसरुल्ला काकड आशिक कच्ची बबलू सातपुते , उमेश सोळंके जयश्री पवार रमेश थोरात, अर्जुन राठोड नितीन सरकटे नवनाथ खंदारे रामकिसन बोडके दत्ता खराबे सिद्धेश्वर केकान डॉ स्वप्निल मंत्री , सिद्धेश्वरला आणि अजित पोरवाल गणेश चव्हाण किरण अंभोरे राजाभाऊ खराबे कृष्णा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने या दोन दिवशीय निवासी शिबिरासाठी उपस्थित आहेत4
- परभणी महापालिका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वनाथ गोबाडे यांची निवड1