सिल्लोड सोयगाव मतदार संघातील प्रलंबित कामे दातलीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सिल्लोड सोयगाव मतदार संघातील प्रलंबित कामे दातलीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे
घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
- ‘जयभीम’च्या गर्जनेने संभाजीनगर निळ्या रंगात न्हाले दरम्यान, विविध ठिकाणी अनुयायांकडून अभिवादन कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणारे फलक झळकले. प्रशासनाकडूनही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरभर सणासारखे वातावरण निर्माण झाले असून, ‘जयभीम’च्या घोषणांनी संपूर्ण संभाजीनगर निळ्या चैतन्याने भारावून गेले.4
- Post by Swal Jansamannyaca ...1
- भोकरदन मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित.1
- Post by Jansagar 9 Marathi1
- धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.1
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीत जल्लोष; आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खांद्यावर घेत नृत्य, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाचोरा व भडगाव तालुक्यात अभूतपूर्व उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम, तसेच सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी केली. या मिरवणुकीत पाचोरा-भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वातावरणात रंग भरला. विशेष म्हणजे ढोल-ताशांच्या गजरात व गाण्यांच्या तालावर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतल्यावरही त्यांनी आनंदाने डान्स करत जल्लोषात भर टाकली. त्यांचे सुपुत्र, नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते यांनी देखील मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. या प्रसंगी युवकांमध्ये विशेष ऊर्जा दिसून आली असून, संपूर्ण परिसर आंबेडकरमय झाल्याचे चित्र होते. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन केले. सामाजिक एकात्मता, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. एकूणच, यंदाची आंबेडकर जयंती पाचोरा-भडगाव तालुक्यात उत्साह, एकजूट आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.1
- सिल्लोड: तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य मिरवणूक काढण्यात आली जयंती मध्ये सर्व धर्मीय गावकऱ्यांचा समावेश1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत असताना ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रांती चौकात आयोजित भव्य मिरवणुकीत सहभागी होत त्यांनी ढोल वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला. शहरभर सध्या 135 वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत असून ठिकठिकाणी मिरवणुका, ढोलताशा आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे. याच उत्साहात दानवे यांनी ढोल वाजवत सामाजिक एकतेचा आणि उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचा आगळावेगळा संदेश दिला.3
- अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई : आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय १९) याच्यावर १८० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. प्रशासनाची कडक कारवाई अचलपूर नगर परिषद च्या पथकाने पोलिस बंदोबस्तात आरोपीच्या घरावरील अवैध बांधकामावर कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने घराचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत तसेच लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.1