Shuru
Apke Nagar Ki App…
धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- Balaji Sontakke Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- भोकरदन मध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आमदार संतोष दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह सर्व समाज बांधव उपस्थित.1
- माकड हाकलताना ३३ केवी लाईनचा करंट, क्षणातच झाला दुर्दैवी अंत ! छतरपूर (मध्य प्रदेश) मधील बमीठा पोलीस ठाणे हद्दीत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या रूम बॉयचा करंट लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रदीप रैकवार उर्फ रानू रैकवार हे लोखंडी पाइपने माकड हाकलत असताना अचानक ३३ केवी वीज लाईनच्या संपर्कात आले. जोरदार विद्युत धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.1
- प्रेस नोट सिल्लोड (प्रतिनिधी) दि.13, सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे त्वरित मार्गी लावावीत, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, तसेच विहीर अधिग्रहणाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांसोबतच पशुधनासाठीही पाण्याची पुरेशी उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स, डोंगरगाव फाटा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), पाणीटंचाई, चारा टंचाई, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, अनुदान वाटप तसेच सुरू व प्रलंबित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढे सांगितले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांच्या हाताला तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तत्काळ उपाययोजना राबवून टँकर सुरू करावेत. तसेच ‘महाराजस्व अभियान’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेत / पानंद रस्ताची नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विकासकामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी ओळखून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. *▢ चौकट : 1* विहीर, गायगोठा , घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेणार नाही. या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी विहीर, गाय-गोठा, घरकुल यासारख्या लाभाच्या योजनांतील भ्रष्टाचार खपून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा दिला. घरकुलाचा दुसरा हप्ता देण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या टाळाटाळीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनेचा धनादेश देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा तक्रारीचा आरोप नागरिकांनी केला यावरून आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. घरकुलाचा हप्ता देण्यासाठी अधिकारी किंवा रोजगार सेवकांकडून पैसे घेतले जात असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी बैठकीत दिले. *चौकट : 2* वाळू माफियांवर कारवाईचे निर्देश, जप्त वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्या या बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्पष्ट निर्देश दिले. जप्त केलेली वाळू घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. अवैध वाळू उपसा तात्काळ रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,बऱ्याच गावामध्ये अवैध वाळू साठे दिसतात ते वाळूसाठे महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करावे, तसेच वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या किंवा काणाडोळा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सोयगाव तहसीलदार मनीषा मेने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजयकुमार सोन्ने, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप फुलारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता साजिदा बानो शहापुरे, जलसंधारण अधिकारी राजधार दांडगे, जि.प. सिंचन विभागाच्या उपअभियंता रुचिता घोगरे यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, देविदास लोखंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, दारासिंग चव्हाण, सतीश ताठे, विनोद मंडलेचा, दुर्गाबाई पवार, धरमसिंग चव्हाण, अशोक सूर्यवंशी, सयाजीराव वाघ, पांडुरंग दुधे, कौतीकराव मोरे, संजय डमाळे, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, अक्षय मगर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालबद्ध नियोजन करून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.2
- ‘जयभीम’च्या गर्जनेने संभाजीनगर निळ्या रंगात न्हाले दरम्यान, विविध ठिकाणी अनुयायांकडून अभिवादन कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संदेश देणारे फलक झळकले. प्रशासनाकडूनही सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरभर सणासारखे वातावरण निर्माण झाले असून, ‘जयभीम’च्या घोषणांनी संपूर्ण संभाजीनगर निळ्या चैतन्याने भारावून गेले.4