पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक परिसरातील एवरलूस टेक्सटाइल (ई-३६/२) या कारखान्यात काम करताना साईनाथ जाधव हा कामगार उंचावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात साईनाथ यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्राव झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अपघातानंतर जखमी कामगाराला तातडीने रुग्णालयात न पाठवता काही काळ कारखान्यातच थांबवून ठेवल्याचा गंभीर आरोपही नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी साईनाथ जाधव याला सुरुवातीला टीमा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी खाजगी सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर सुरुवातीला कंपनीचा कोणताही अधिकारी रुग्णालयात उपस्थित नव्हता, परंतु ही घटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर कंपनीचे काही अधिकारी रुग्णालयात आल्याचे सांगण्यात आले आहे. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याबद्दल नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर उद्योगातील कामगारांची सुरक्षा केवळ कागदोपत्रीच आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उंचावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याला आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली होती का आणि कारखान्यात सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. कारखाना सुरक्षा व आरोग्य संचालनालय फॅक्टरी निरीक्षक, कामगार आयुक्त कार्यालय आणि बोईसर पोलिस यांनी या अपघाताची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी कामगार व नागरिकांकडून केली जात आहे. चौकशीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणावर कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया मिळणे अद्याप बाकी आहे.

- पालघर तालुक्यातील कुडण गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे आणि कल्पेश अशोक म्हात्रे यांच्या शेतातील सुमारे ८०० ते ९०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून आंबा, फणस, शेवगा आणि नारळ या फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत तारापूर विभागाचे (पालघर) सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर यांनीही नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली. मात्र, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर स्थानिक सदस्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी तीव्र नाराजी आणि तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.1
- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. भिवंडी-वाडा महामार्गालगत मेट ग्रामपंचायत हद्दीतील 'रंगतरंग कमर्शियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने नैसर्गिक पाण्याचा नाला अडवून त्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. या अडथळ्यामुळे अतिवृष्टीदरम्यान पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला आणि पुराचे पाणी विरुद्ध दिशेने शेतांमध्ये शिरल्याने परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी बालकृष्ण धोंडू घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही नैसर्गिक नाला अडविल्याबाबत वाडा तहसील कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून संबंधित कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता घोडविंदेपाडा येथील शेतकरी सुनील घोडविंदे, भरत परशुराम घोडविंदे, किरण घोडविंदे, पंडित घोडविंदे आणि बालकृष्ण घोडविंदे यांनी शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित कंपनीची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक जलवाहिन्या मोकळ्या कराव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.4
- महाराष्ट्रातील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून खूप पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हे थक्क करणारे दृश्य समोर आल्यानंतर, एवढ्या मोठ्या संख्येने सिलेंडर पाण्यात वाहून जाण्यामागचे नेमके काय कारण असू शकते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- ठाण्यातील हाय स्ट्रीट मॉलमध्ये नदीम मेमन यांच्या वतीने 'हाय स्ट्रीट क्रिएटर स्टुडिओ' या नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही नदीम मेमन यांची एक नवी पेशकश आहे.1
- मुंब्रा फायर ब्रिगेडमध्ये कर्मचारी जुगार खेळताना पकडले गेले आहेत.1
- पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये कल्याण ज्वेलर्सच्या (Kalyan Jewellers) नवीन शोरूमचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल याने मुख्य अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लावली होती. आपल्या या लाडक्या स्टारची केवळ एक झलक मिळवण्यासाठी विरारमध्ये चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच विरारमध्ये पोहोचलेल्या बॉबी देओलने येथे आल्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला. विरारमधील चाहत्यांचे प्रेम पाहून भारावून गेलेल्या बॉबी देओलने या सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.1
- उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे ज्वैलरी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका शिक्षिकेने तहान लागल्यामुळे बिसलेरीची बाटली समजून थेट अॅसिड प्यायले. पाणी समजून त्यांनी बाटलीतून घोट घेतला, मात्र त्या बाटलीत पाण्याऐवजी अॅसिड असल्याचा आरोप केला जात आहे. अॅसिड प्यायल्यामुळे या शिक्षिकेची प्रकृती अत्यंत बिघडली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर पीडित शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित दुकानदाराची कसून चौकशी केली जात आहे.1