logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सराईत मटका-जुगार अड्डा चालकावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; आरोपी अमरावती कारागृहात स्थानबद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १८ गुन्ह्यांतील आरोपी रफीक काझी वर्षभरासाठी ताब्यात पिंपरी-चिंचवड: प्रतिनिधी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईतपणे मटका आणि जुगार अड्डे चालविणाऱ्या आरोपीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई करत ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. रफीक शगीर काझी (वय ३९, रा. चाकण) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर एकूण १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी परिसरात सातत्याने बेकायदेशीर मटका आणि जुगार व्यवसाय चालवणाऱ्या आरोपी काझी याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. पोलिस तपासात काझी हा “कल्याण मटका”च्या नावाखाली जुगार अड्डे चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरोधात विविध गुन्ह्यांअंतर्गत एकूण १८ प्रकरणे दाखल झाली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. सदर प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आरोपी रफीक काझी याला ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र प्रतिबंधक ताबा कायदा) अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेशानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गुप्त बातमीदारांची मदत घेतली. अखेर पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले आणि २१ एप्रिल २०२६ रोजी त्याला मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार व्यवसायांवर पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

2 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
16ae00c1-5aba-44dd-a116-6eb1ef6ee709

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली... #पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi #PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील लीनिअर गार्डनजवळ रात्रीच्या सुमारास एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही...
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहन लीनिअर गार्डन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अचानक गाडीने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद  केली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आग विझल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली...
#पिंपळेसौदागर #पिंपरीचिंचवड #कारआग #वाहनआग #अग्निशमनदल #शॉर्टसर्किट #अपघातवार्ता #स्थानिकबातमी #PCMC #FireIncident #BreakingNewsMarathi
#PimpleSaudagar #PimpriChinchwad #CarFire #VehicleFire #FireBrigade #ShortCircuit #AccidentNews #LocalNews #PCMC #FireIncident #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ##
    1
    ##
    user_निलेश लक्ष्मण सोनवलकर
    निलेश लक्ष्मण सोनवलकर
    Farmer फलटण, सातारा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • 🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 📍 सुरत (गुजरात) रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली. 🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. 😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. ⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS
    1
    🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज
📍 सुरत (गुजरात)
रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली.
🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली.
😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
#बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • चेंबूर:प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ महाराज, यांच्या पालखी पादुकांचे आगमन थेट श्री क्षेत्र अक्कलकोट ,या पुण्यभूमीतून चेंबूर गांवठाण, श्री साई सेवा समिती या ठिकाणी रविवार दि. ३/०५/२०२६.रोजी सकाळी ९:३० वाजता होत आहे. त्यानिमित्ताने श्री साई सेवा समिती यांच्या वतीने ,श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन,श्री साई सेवा समिती अध्यक्ष,श्री जितेश प्र. परळकर यांनी केले आहे.
    1
    चेंबूर:प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी, श्री स्वामी समर्थ महाराज, यांच्या पालखी पादुकांचे आगमन थेट श्री क्षेत्र अक्कलकोट ,या पुण्यभूमीतून चेंबूर गांवठाण, श्री साई सेवा समिती या ठिकाणी रविवार दि. ३/०५/२०२६.रोजी सकाळी ९:३० वाजता होत आहे. त्यानिमित्ताने श्री साई सेवा समिती यांच्या वतीने ,श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन,श्री साई सेवा समिती अध्यक्ष,श्री जितेश प्र. परळकर यांनी केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!
    1
    पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, 
चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    1
    पिंपरी चिंचव्हडं :-
नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला....
भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले....
#नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी
#NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.