राज्यात दर ५३ मिनिटाला एका चिमुकलीवर अत्याचार … मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर”* *छत्रपती संभाजी नगर* * लहान मुलींपासून तरुणींपर्यंत असुरक्षिततेची भावना; समाज, पोलीस आणि पालकांसमोर मोठं आव्हान? P2c : राज्यात दर ५३ मिनिटाला एका चिमुकलीवर अत्याचार होतोय… ही फक्त आकडेवारी नाही, तर समाजाला हादरवणारी वास्तव आहे. धक्कादायक म्हणजे—अल्पवयीन मुलीही सुरक्षित नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्येच ४२३ गुन्हे नोंद झाले आहेत. हातात खेळणी असण्याच्या वयात, भीतीचं सावट वाढताना दिसतंय. प्रश्न फक्त कायद्याचा नाही, तर समाजाच्या मानसिकतेचाही आहे. मुलींना सावध करणं गरजेचं आहेच, पण समाजालाही जागं होणं तितकंच आवश्यक आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली. अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. कायदे अधिक कडक झाले तरच अशा घटनांवर प्रभावी आळा बसू शकतो, असं मत स्त्रीवादी अभ्यासक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी व्यक्त केलंय. *Bite 1 - डाॅ. आरतीश्यामल जोशी, स्त्रीवादी अभ्यासक* अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. *Bite 3 - प्रविणा यादव, पोलीस निरीक्षक*
राज्यात दर ५३ मिनिटाला एका चिमुकलीवर अत्याचार … मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर”* *छत्रपती संभाजी नगर* * लहान मुलींपासून तरुणींपर्यंत असुरक्षिततेची भावना; समाज, पोलीस आणि पालकांसमोर मोठं आव्हान? P2c : राज्यात दर ५३ मिनिटाला एका चिमुकलीवर अत्याचार होतोय… ही फक्त आकडेवारी नाही, तर समाजाला हादरवणारी वास्तव आहे. धक्कादायक म्हणजे—अल्पवयीन मुलीही सुरक्षित नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्येच ४२३ गुन्हे नोंद झाले आहेत. हातात खेळणी असण्याच्या वयात, भीतीचं सावट वाढताना दिसतंय. प्रश्न फक्त कायद्याचा नाही, तर समाजाच्या मानसिकतेचाही आहे. मुलींना सावध करणं गरजेचं आहेच, पण समाजालाही जागं होणं तितकंच आवश्यक आहे. एकीकडे संपूर्ण राज्यात अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा होत
असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली. अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. कायदे अधिक कडक झाले तरच अशा घटनांवर प्रभावी आळा बसू शकतो, असं मत स्त्रीवादी अभ्यासक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी व्यक्त केलंय. *Bite 1 - डाॅ. आरतीश्यामल जोशी, स्त्रीवादी अभ्यासक* अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. *Bite 3 - प्रविणा यादव, पोलीस निरीक्षक*
- पुण्यात प्रवचनकार विकास लवांडे यांच्यावर हल्ल्याचा आरोप; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा निषेध आळंदी मातोबाची, ता. हवेली जि. पुणे येथे प्रवचन संपवून परत येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा वारकरी प्रवचनकार विकास लवांडे यांच्या गाडीला अडवून काही जणांनी शाई फेकत धक्काबुक्की व हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे. बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.1
- पुण्यात ट्रॅफिक महिला पोलिसाचा संयम सुटला.. ट्रक चालकरावर थेट दगड उगारला.1
- जय लक्ष्मी कंपनी फारोळा या कंपनीने येथे राजनगाव येथील म्हारोळा रोडवर असलेले महार हडूळे अवैध रित्या खोदून मुरुम वहातूक चालू केले आहे. जय लक्ष्मी कंपनी फारोळा या कंपनीने येथे राजनगाव येथील म्हारोळा रोडवर असलेले महार हडूळे अवैध रित्या खोदून मुरुम वहातूक चालू केले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीनगर : मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रयत्नातून मंजूर केले. त्यामुळे मतदारसंघात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्वाही शिवसेना नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांनी दिली. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केलेल्या मागणीनुसार प्रभाग क्र. 2 नवजीवन कॉलनी येथे 20 लक्ष रुपये निधीतून सामाजिक सभागृहाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत सेवासुविधा तात्काळ देण्यासाठी कटीबद्ध असून, हक्काने आदेश द्या, असे आवाहन जैस्वाल यांनी केले. याप्रसंगी शिवसेना गटनेते किशोर नागरे, सिनेट सदस्या पूनम पाटील खरगे, युवासेना शहर अधिकारी सागर खरगे, शिवसैनिक रमेश इधाटे, रविंद्र देशमुख, बाबासाहेब घुगे, तेजस पाटील, अविष्कार राजपूत , निखिल चव्हाण आदिसह स्थानिक नागरिक आणि भाविक उपस्थित होते.2