Shuru
Apke Nagar Ki App…
नागपूरच्या शताब्दी चौकात महिनाभरापूर्वी नवीन सिग्नल बसवण्याचे काम करण्यात आले, मात्र हा सिग्नल अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. सिग्नल बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही तेथील गट्टूचे तुकडे आणि तोडलेल्या झाडांचा कचरा आतापर्यंत उचलण्यात आलेला नाही. त्यातच फुटपाथला लागून असलेले पावसाळी पाणी वाहून नेणारे छिद्र बुजवण्यात आल्याने थेट सिग्नलवरच पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना नाहक त्रासाचा आणि घाणीचा सामना करावा लागत आहे.
Sanjay Sathe
नागपूरच्या शताब्दी चौकात महिनाभरापूर्वी नवीन सिग्नल बसवण्याचे काम करण्यात आले, मात्र हा सिग्नल अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. सिग्नल बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही तेथील गट्टूचे तुकडे आणि तोडलेल्या झाडांचा कचरा आतापर्यंत उचलण्यात आलेला नाही. त्यातच फुटपाथला लागून असलेले पावसाळी पाणी वाहून नेणारे छिद्र बुजवण्यात आल्याने थेट सिग्नलवरच पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना नाहक त्रासाचा आणि घाणीचा सामना करावा लागत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नागपूरच्या शताब्दी चौकात महिनाभरापूर्वी नवीन सिग्नल बसवण्याचे काम करण्यात आले, मात्र हा सिग्नल अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. सिग्नल बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही तेथील गट्टूचे तुकडे आणि तोडलेल्या झाडांचा कचरा आतापर्यंत उचलण्यात आलेला नाही. त्यातच फुटपाथला लागून असलेले पावसाळी पाणी वाहून नेणारे छिद्र बुजवण्यात आल्याने थेट सिग्नलवरच पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना नाहक त्रासाचा आणि घाणीचा सामना करावा लागत आहे.1
- Post by SUBHASH BORKAR1
- विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी थेट मैदानात उतरली आहे. देशातील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन आणि काहींची रखेल झाली असून, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली असल्याचा अत्यंत तीव्र आणि आक्रमक आरोप करण्यात आला आहे. इथल्या भ्रष्ट न्यायव्यवस्थेमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा नक्की कुणाकडे मांडायच्या, असा थेट सवाल उपस्थित करत काँग्रेस कमिटीने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका घेतली आहे.1
- एक सच्चा गुरू नेहमी हीच इच्छा बाळगतो की त्याचा प्रत्येक शिष्य ज्ञान, संस्कार आणि यशाच्या बाबतीत त्याच्यापेक्षाही पुढे निघून जावा.1
- महाराष्ट्रात स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ते २८ तारखेपर्यंत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे।1
- कामठी शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याचा मोठा फटका शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची ही दुरवस्था पाहता विकासकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाने रस्ते घोटाळ्याची पोलखोल केली असून 'कोट्यवधींचा निधी गेला कुठे?' असा सवाल केला जात आहे. आता प्रशासन या समस्येकडे कधी लक्ष देणार आणि कामठीकरांना सुरक्षित रस्ते कधी मिळणार, हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे.1
- सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून स्वतःची ओळख निर्माण केली, मात्र नंतर सत्तेसाठी त्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला. आता त्यांची सत्तेची हाव इतकी वाढली आहे की, सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणारे विद्यार्थी त्यांना थेट दहशतवादी वाटू लागले आहेत. दिल्लीसह प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात तरुणाई पेपर फुटीच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून अमानुष आणि हिंसक हल्ले केले जात असून त्यांची डोकी फोडली जात आहेत, हाडे खिळखिळी केली जात आहेत आणि अंगावरील कपडे फाडले जात आहेत. अशा कठीण परिस्थितीतही या लढणाऱ्या तरुणांना दहशतवादी ठरवणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या सत्तापिपासू वृत्तीची कीव येत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.1
- हिंगणा एम.आय.डी.सी. परिसरातील एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची प्रकृती अचानक खालावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कामगाराची तब्येत बिघडताच त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस व संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात आहे. अधिकृत तपास आणि चौकशी अहवाल समोर आल्यानंतरच कामगाराच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.1