logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंठा शहरात श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.

2 hrs ago
user_Mahadev pakhare super
Mahadev pakhare super
मराठवाडा अभिनेता,पत्रकार Mantha, Jalna•
2 hrs ago

मंठा शहरात श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.

More news from Maharashtra and nearby areas
  • महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।
    1
    महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    6 hrs ago
  • हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    1
    हिंगोली | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच  जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते.
दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला.
सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे,  जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Dhanjay surve Surve
    1
    Post by Dhanjay surve Surve
    user_Dhanjay surve Surve
    Dhanjay surve Surve
    वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    1
    -----
(प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
__-__
एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल
एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले.
__-__
या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा
    1
    बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor Buldana, Buldhana•
    8 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जालन्यात SIR मॅपिंगला वेग: शनिवार-रविवारी विशेष शिबिरे; 55% प्रक्रिया पूर्ण.---. दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR मॅपिंगला गती...
    1
    जालन्यात SIR मॅपिंगला वेग: शनिवार-रविवारी विशेष शिबिरे; 55% प्रक्रिया पूर्ण.---.
दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR मॅपिंगला गती...
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
    1
    खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
    user_Santosh Bahekar PRESS
    Santosh Bahekar PRESS
    Advertising Photographer बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *खामगाव तालुक्यात रेती माफियांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवून दिली आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या थेट तहसीलदारांच्याच अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेखामगाव-नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात ही घटना घडली. तहसीलदार सुनील पाटील हे आपल्या खाजगी वाहनाने या परिसरात गस्तीवर असताना, त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणारे एक वाहन (क्रमांक MH 30 BD 7374) दिसून आले.जेव्हा तहसीलदारांनी या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, तेव्हा चालकाने गाडी थांबवण्याऐवजी ती थेट तहसीलदारांच्या अंगावर घालून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसीलदार पाटील यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलाया माफियाला सोडायचे नाही या जिद्दीने तहसीलदारांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा सिनेस्टाईल पाठलाग केला. काही अंतरावरच त्यांनी या वाहनाला घेराव घालून पकडले. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पारखेड परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मी स्वतः खाजगी वाहनाने पाठलाग केला असता एका हायवा चालकाने मला चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हायवेवरून त्याने युटर्न घेऊन धोकादायक पद्धतीने वाहन चालवले. आम्ही या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि फौजदारी कलमान्वये कारवाई प्रस्तावित केली आहे."
    1
    *खामगाव तालुक्यात रेती माफियांनी पुन्हा एकदा आपली मुजोरी दाखवून दिली आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या थेट तहसीलदारांच्याच अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेखामगाव-नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात ही घटना घडली. तहसीलदार सुनील पाटील हे आपल्या खाजगी वाहनाने या परिसरात गस्तीवर असताना, त्यांना रेतीची अवैध वाहतूक करणारे एक वाहन (क्रमांक MH 30 BD 7374) दिसून आले.जेव्हा तहसीलदारांनी या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, तेव्हा चालकाने गाडी थांबवण्याऐवजी ती थेट तहसीलदारांच्या अंगावर घालून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तहसीलदार पाटील यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलाया माफियाला सोडायचे नाही या जिद्दीने तहसीलदारांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा सिनेस्टाईल पाठलाग केला. काही अंतरावरच त्यांनी या वाहनाला घेराव घालून पकडले. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पारखेड परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मी स्वतः खाजगी वाहनाने पाठलाग केला असता एका हायवा चालकाने मला चकमा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. हायवेवरून त्याने युटर्न घेऊन धोकादायक पद्धतीने वाहन चालवले. आम्ही या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि फौजदारी कलमान्वये कारवाई प्रस्तावित केली आहे."
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor Buldana, Buldhana•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.