शिरूरच्या आनंद सोसायटी परिसरात झालेल्या २४ लाख रुपयांच्या घरफोडीचा शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणी, चोराने लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल २४ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपी नोकराला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे आणि सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरले होते. या गुन्ह्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.
शिरूरच्या आनंद सोसायटी परिसरात झालेल्या २४ लाख रुपयांच्या घरफोडीचा शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणी, चोराने लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल २४ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपी नोकराला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे आणि सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरले होते. या गुन्ह्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण
आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.
- शिरूरच्या आनंद सोसायटी परिसरात झालेल्या २४ लाख रुपयांच्या घरफोडीचा शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे उलगडा केला आहे. या प्रकरणी, चोराने लंपास केलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसह तब्बल २४ लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत मुख्य आरोपी नोकराला नांदेड जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे आणि सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी आणि अन्य मौल्यवान साहित्य चोरले होते. या गुन्ह्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा आणि चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना, मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांनी चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.2
- जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.1
- वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.1
- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.1
- पुणे शहरात शिवसेनेने अवैध दारूच्या अड्ड्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या कारवाईदरम्यान शेकडो लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली.1
- घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.1
- पिंपरी चिंचवड शहरात महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या एका इशाऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या इशाऱ्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून, विविध स्तरांवर यावर बोलले जात आहे.1
- वडगाव शेरी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने २.६० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादींचे घर कुलूप लावून बंद असताना, चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने थेट बेडरूममधील कपाटातून हे दागिने लंपास केले.1