logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. ७ जुलै रोजी 'हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६' सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, पत्रकारिता, वैद्यकीय, योगा, निवेदन आणि पोलीस प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते शाल, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज शशिकांत कंक व सिद्धार्थ कंक, छ. उदयनराजे भोसले यांचे सुपा परगना प्रमुख सुनील राजेभोसले, छ. शिवाजी महाराज यांचे व्याही पिलाजीराव राजेशिर्के यांचे वंशज अमितराजे राजेशिर्के, सरनौबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वंशज इंद्रजितसिंह घोरपडे (हिंदुराव) गजेंद्रगडकर आणि छ. संभाजीराजे यांची दुधाई धाराऊ गाडे यांचे वंशज बाबुराजे गाडे व मयुर गाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह माजी आमदार सुनील टिंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सातव, विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त विवेक देव, सामाजिक कार्यकर्त्या मीनाकाकी सातव पाटील, जिल्हा परिषद सदस्या कोमल आव्हाळे, नगरसेविका रत्नमालाताई सातव, कविताताई गलांडे, श्वेताताई गलांडे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम-ढोले आणि सुरेखाताई हरगुडे यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'दैनिक पुढारी'चे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन स्पंदन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा कामिनीताई शरद राजेभोसले-ताकवले, उपाध्यक्ष नेहा ताकवले (जहागीरदार) आणि खजिनदार ऋषिकेश ताकवले (जहागीरदार) यांनी केले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कामिनीताई राजेभोसले-ताकवले यांनी केली, आभार अमित राजेभोसले यांनी मानले, तर अतुल बनकर यांनी त्यांच्या बहारदार शैलीत सूत्रसंचालन केले.

3 hrs ago
user_Digital maharashtra news
Digital maharashtra news
Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
ffd13fed-bfa2-424e-a30a-cdc7d63ad364

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    1
    पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    1
    उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे सहाय्यक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर थेट कर्जत कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    1
    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याशी संबंधित एका भक्तीमय संदेशात, सम्राटेक विजापूर येथील दुर्गा माता देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्व लोकांना जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी देवी माता दुर्गादेवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह व्हीआयपी (VIP) पाहुणे आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असा उत्साह या संदेशातून व्यक्त करण्यात आला आहे।
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शिरूर तालुक्यातील कान्हेर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत एवरी डेनिसन व मॅजिक बस यांच्या सहकार्याने लोकशाही पद्धतीने विद्यार्थी बालपंचायत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया केवळ प्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्व, समानता, सहभाग आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी एक अत्यंत महत्त्वाची संधी ठरत आहे. या उपक्रमाबाबत बोलताना विद्यालयाचे प्राचार्य विनोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आवाहन केले की, प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान केंद्रावरील सर्व सूचनांचे पालन करून अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही दबाव, प्रभाव किंवा पक्षपाताशिवाय स्वतःच्या विचारांनुसार योग्य उमेदवाराची निवड करावी, कारण प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातूनच सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडू शकते.
    1
    शिरूर तालुक्यातील कान्हेर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत एवरी डेनिसन व मॅजिक बस यांच्या सहकार्याने लोकशाही पद्धतीने विद्यार्थी बालपंचायत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया केवळ प्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिकत्व, समानता, सहभाग आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी एक अत्यंत महत्त्वाची संधी ठरत आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना विद्यालयाचे प्राचार्य विनोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आवाहन केले की, प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान केंद्रावरील सर्व सूचनांचे पालन करून अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही दबाव, प्रभाव किंवा पक्षपाताशिवाय स्वतःच्या विचारांनुसार योग्य उमेदवाराची निवड करावी, कारण प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातूनच सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडू शकते.
    user_महाराष्ट्र ONE न्यूज
    महाराष्ट्र ONE न्यूज
    Artist शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरासर खोटं बोलत असून हीच आपल्या भारत देशाची खरी अवस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीवर सामान्य नागरिकांनी नक्की काय अर्थ काढायचा आणि आपला देश नेमका विकासाच्या दिशेने चालला आहे की अविकासाच्या, असा गंभीर व संतप्त प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या भन्नाट माहितीसाठी त्वरित सबस्क्राईब करण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.
    1
    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरासर खोटं बोलत असून हीच आपल्या भारत देशाची खरी अवस्था असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. या परिस्थितीवर सामान्य नागरिकांनी नक्की काय अर्थ काढायचा आणि आपला देश नेमका विकासाच्या दिशेने चालला आहे की अविकासाच्या, असा गंभीर व संतप्त प्रश्न येथे उपस्थित करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या भन्नाट माहितीसाठी त्वरित सबस्क्राईब करण्याचे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.
    user_Bhau 🎀💞
    Bhau 🎀💞
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    53 min ago
  • पुणे जिल्ह्यातील सचिन भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'जगातील पहिला रस्त्यांचा डॉक्टर कोण?' असा प्रश्न उपस्थित करत सचिन भोसले यांच्याबाबत चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार गाजत आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील सचिन भोसले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'जगातील पहिला रस्त्यांचा डॉक्टर कोण?' असा प्रश्न उपस्थित करत सचिन भोसले यांच्याबाबत चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ जोरदार गाजत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पुण्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. पोलिसांनी थेट कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली असून, या धडक कारवाईमुळे आता गुन्हेगारांचे धाबे पार दणाणले आहेत.
    1
    पुण्याच्या विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. पोलिसांनी थेट कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली असून, या धडक कारवाईमुळे आता गुन्हेगारांचे धाबे पार दणाणले आहेत.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.