सेवा हक्क अभियाना अंतर्गत शिबिराचे आयोजन करून प्राप्त झालेल्या अर्जाची एका हप्त्यामध्ये निकाली काढा वर्षा मीना जिल्हाधिकारी अकोला सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक शिबिरे घेऊन प्राप्त अर्जांचा एका आठवड्यात निपटारा करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आदेश अकोला, दि. २० : सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा नागरिकांना कालमर्यादेत पुरविणे आवश्यक आहे. त्यात एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये. सर्व यंत्रणांनी शिबिर स्तरावर काम करून आठवडाभरात सर्व अर्जांचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. सेवा हक्क अधिनियमानुसार प्राप्त अर्जांवर विविध यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, अधिनियमानुसार कालमर्यादा लक्षात घेऊन अर्जांचे निराकरण व्हावे. या बाबीचा विभागप्रमुखांनी आपल्या विभागात प्रत्येक तालुक्यात आढावा घ्यावा. शिबिरांचे आयोजन करून आठवडाभरात सर्व अर्ज निकाली काढा. एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये. चांगला परफॉर्मन्स असलेल्या कार्यालयाला गौरविण्यात येईल. पारदर्शकता, उत्तरदायित्व, कालबद्धता व कार्यक्षमता यांचा अवलंब करून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकसेवा हक्क दिन दि. २८ एप्रिल रोजी साजरा केला जाईल. अधिनियमाच्या अनुषंगाने कार्यालयांनी केलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेतला जाईल. बैठकीला अनुपस्थित राहणा-या यंत्रणाप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस दाखविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवली जात आहे. त्यात 'डिजिटल सेन्सस' आणि 'स्व-गणना' ही सुविधा देण्यात आली. सर्व यंत्रणांनी स्वगणना सुविधेबाबत जनजागृती व राष्ट्रीय जनगणनेच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन श्रीमती मीना यांनी केले.

- Post by नंदकिशोर साखरकर1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by M B B1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1