logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात नांदेड दि. 24 एप्रिल : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२५ अंतर्गत ४,३४,८१९ शेतकऱ्यांनी ८,२९,७३७ विमा अर्ज दाखल केले असून ५,१३,९०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता. माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. सदर नुकसानग्रस्त पिक विमाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईपोटी रु.८१३.९३ कोटी रक्कम मंजूर झाली असून पिक विमा कंपनी मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरणास दि.२१.०४.२०२६ पासून सुरुवात झाली आहे. योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पिक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे/ तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असून जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे ७,२७,९३२ हे. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयबीन, मुग, उडीद, पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सोयबीन, मुग, उडीद, कापूस, तूर आणि ज्वारी पिके अधिसूचित असून खरीप हंगाम सन २०२५ पासून सुधारित उंबरठा उत्पन्नावर आधारित पिक विमा राबविण्यात येत आहे. सदर पिकांचे जिल्ह्यात ३३१२ पिक कापणी प्रयोग नियोजित होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर पिक नुकसान झाल्यामुळे श्री. राहुल कर्डिले मा.जिल्हाधिकारी, नांदेड व श्री. दत्तकुमार कळसाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पिक कापणी प्रयोगाचे सूक्ष्मनियोजन करून महसूल विभाग, ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठक आयोजित करून सर्व पिक कापणी प्रयोग CCE मोबाईल app वर होतील व वस्तुनिष्ठ होतील याची खबरदारी घेतली. पिक कापणी प्रयोगाचे काम सुरु असताना पिक विमा कंपनी कडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. सदर आक्षेपाचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांचे अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने निराकरण केले. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला सुधारित पिक विमा योजनेनुसार उंबरठा उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई या एका घटका अंतगर्त रु.८१३.९३ कोटी रक्कम सोयाबीन, मुग व उडीद पिकासाठी मंजूर झाला आहे. पिक विमा योजनेअंतर्गत मंजूर नुकसान भरपाई प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टल वरून ऑनलाईन DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून सद्यस्थितीत मंजूर रु.८१३.९३ कोटी रकमेचे वितरण सुरु असून सर्व विमाधारक शेतकऱ्यांना योजनेच्या पोर्टलवर शेतकरी लॉगिन मध्ये आधार नंबर टाकून OTP प्रविष्ट केल्यावर आपली मंजूर रक्कम पाहता येईल. 0000000

14 hrs ago
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    2
    जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड
शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
    1
    नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    1
    पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे
    1
    हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    Hadgaon, Nanded•
    21 hrs ago
  • जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews
    1
    जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! 
विहिरी कोरड्या…
पाण्यासाठी रात्रभर जागरण…
लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ…
ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे!
ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का?
तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी.
पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही!
#जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.
    1
    मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न.
अनावरण सोहळा
दिनांक : २५ एप्रिल २०२६
वेळ : सायं. ०६:०० वाजता
स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.