logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड पोलिसांची MPDA अंतर्गत मोठी कारवाई; सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध. नांदेड : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांकडून सराईत व वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत वजीराबाद परिसरातील सराईत गुन्हेगार किशन राजू कुरिल याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करून एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस नोंदीनुसार, किशन कुरिल याच्याविरुद्ध खून, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे व वापरणे, गंभीर दुखापत करणे, लूट व दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती; मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडे सादर करण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची शिफारस केली. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी MPDA कायद्यानुसार किशन कुरिल याला मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारागृहात दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात १६ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, १५० हून अधिक सराईत गुन्हेगारांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

8 hrs ago
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
8 hrs ago
c0a6175f-ff58-4d87-9c4a-ccc6b99c2dcd

नांदेड पोलिसांची MPDA अंतर्गत मोठी कारवाई; सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध. नांदेड : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांकडून सराईत व वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत वजीराबाद परिसरातील सराईत गुन्हेगार किशन राजू कुरिल याच्यावर MPDA कायद्यान्वये कारवाई करून एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस नोंदीनुसार, किशन कुरिल याच्याविरुद्ध खून, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे व वापरणे, गंभीर दुखापत करणे, लूट व दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती; मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडे सादर करण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची शिफारस केली. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी MPDA कायद्यानुसार किशन कुरिल याला मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारागृहात दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात १६ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, १५० हून अधिक सराईत गुन्हेगारांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    1
    मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले.

तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे.

सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    1
    🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात!

📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा!
#NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes
    user_Shaikh Jahur Dudhadkar
    Shaikh Jahur Dudhadkar
    Newspaper publisher Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
  • 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    1
    🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
 शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू,
📍 वसमत, जि. हिंगोली
शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली—
🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!”
असा स्पष्ट इशारा!
✊ जमीन आमची — निर्णय आमचा!
🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द!
#शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट
    user_Ramprasad Magar news reporter
    Ramprasad Magar news reporter
    Local News Reporter बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली. हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास  अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना  भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना  घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    2
    मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली.
हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास  अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना  भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना  घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Milind Manohar Kamble
    Milind Manohar Kamble
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी
    1
    जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी

जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी
जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 min ago
  • कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे.  सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    1
    कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून  शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. 
सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास  कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    1
    सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न 
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    8 hrs ago
  • नांदेड : वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
    1
    नांदेड :  वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात 

 : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.