logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पहाटे तीन वाजता बाप-लेकांची भावनिक भेट; लेकाची खालावलेली तब्येत पाहून बापाच्या डोळ्यांत अश्रू! पहाटे तीन वाजता बाप-लेकांची भावनिक भेट; लेकाची खालावलेली तब्येत पाहून बापाच्या डोळ्यांत अश्रू! अंतरवाली सराटी प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू ठेवत मुंबईच्या दिशेने निघालेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील काल मंगळवारी रात्री सुमारे २ वाजता बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी पोहोचले. पहाटेच्या सुमारास आपल्या लेकाला भेटण्यासाठी त्यांचे वडील तेथे आले आणि बाप-लेकांची झालेली भेट उपस्थितांसाठी मन हेलावून टाकणारी ठरली. आपल्या मुलाची खालावलेली तब्येत पाहताच जरांगे पाटलांच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. मुलाच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि संघर्ष पाहताना एका बापाच्या मनाची घालमेल या क्षणी स्पष्टपणे जाणवत होती. वडिलांनी जरांगे पाटलांना भावनिक मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते; मात्र काळजी, माया, वेदना आणि मुलासाठीची तळमळ सगळं काही जाणवत होतं. समाजाच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मुलाची अवस्था पाहून बापाच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून उपस्थितांचेही मन भरून आले. एकीकडे समाजाच्या लढ्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेला मुलगा आणि दुसरीकडे आपल्या लेकाच्या तब्येतीची चिंता मनात घेऊन त्याला भेटण्यासाठी आलेला बाप… पहाटेच्या त्या शांत वातावरणात झालेली ही भेट अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणून गेली. काही भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत… त्या फक्त डोळ्यांतून वाहतात. “बापाच्या डोळ्यातलं पाणी… आणि लेकाच्या चेहऱ्यावरचा संघर्ष; पहाटेची ही भेट मन हेलावून गेली!”

1 day ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
1 day ago
b910234d-45c9-40bd-b33b-c3aff64f1665

पहाटे तीन वाजता बाप-लेकांची भावनिक भेट; लेकाची खालावलेली तब्येत पाहून बापाच्या डोळ्यांत अश्रू! पहाटे तीन वाजता बाप-लेकांची भावनिक भेट; लेकाची खालावलेली तब्येत पाहून बापाच्या डोळ्यांत अश्रू! अंतरवाली सराटी प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू ठेवत मुंबईच्या दिशेने निघालेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील काल मंगळवारी रात्री सुमारे २ वाजता बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी पोहोचले. पहाटेच्या सुमारास आपल्या लेकाला भेटण्यासाठी त्यांचे वडील तेथे आले आणि बाप-लेकांची झालेली भेट उपस्थितांसाठी मन हेलावून टाकणारी ठरली. आपल्या मुलाची खालावलेली तब्येत पाहताच जरांगे पाटलांच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. मुलाच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि संघर्ष पाहताना एका बापाच्या मनाची घालमेल या

712a417f-3efe-48dc-b8e8-8c57ee4c9ec3

क्षणी स्पष्टपणे जाणवत होती. वडिलांनी जरांगे पाटलांना भावनिक मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते; मात्र काळजी, माया, वेदना आणि मुलासाठीची तळमळ सगळं काही जाणवत होतं. समाजाच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या मुलाची अवस्था पाहून बापाच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून उपस्थितांचेही मन भरून आले. एकीकडे समाजाच्या लढ्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेला मुलगा आणि दुसरीकडे आपल्या लेकाच्या तब्येतीची चिंता मनात घेऊन त्याला भेटण्यासाठी आलेला बाप… पहाटेच्या त्या शांत वातावरणात झालेली ही भेट अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणून गेली. काही भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत… त्या फक्त डोळ्यांतून वाहतात. “बापाच्या डोळ्यातलं पाणी… आणि लेकाच्या चेहऱ्यावरचा संघर्ष; पहाटेची ही भेट मन हेलावून गेली!”

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    1
    तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 

तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस 
बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
    1
    नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
    user_Sambhaji Fit Wellness Studio
    Sambhaji Fit Wellness Studio
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरांमध्ये मुख्यमंत्री... छत्रपती संभाजीनगर: शहरांमध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामुळे नागरिकांचे हाल शहरातील व्हीआयपी रोडची ट्राफिक जाम चोही बाजूने रस्ते बंद करण्यात आले होते
    1
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरांमध्ये मुख्यमंत्री...
छत्रपती संभाजीनगर: शहरांमध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामुळे नागरिकांचे हाल शहरातील व्हीआयपी रोडची ट्राफिक जाम चोही बाजूने रस्ते बंद करण्यात आले होते
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर - वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू. - मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर छत्रपती संभाजीनगर - वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू. - मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर - प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची घेतली माहिती - Anc : छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करत असताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिरसाट यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याचीही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माहिती घेतली. कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
    2
    छत्रपती संभाजीनगर 
- वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट
- कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू.
- मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर
छत्रपती संभाजीनगर 
- वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट
- कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू.
- मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर
- प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची घेतली माहिती
- Anc : छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करत असताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिरसाट यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याचीही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माहिती घेतली. कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    2 hrs ago
  • बीड - पुणे रेल्वे सेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ
    1
    बीड - पुणे रेल्वे सेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.
    1
    जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न...


जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न...
आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली. या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते. चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात ‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
    1
    दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश
दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई व पीकविमा द्या : राजेंद्र आमटे
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन; करपलेली पिके हातात घेऊन शेतकऱ्यांचा आक्रोश
बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, बाजरी यांसह खरीप पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये अर्थात हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली.
या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे पीक आणि करपलेल्या बाजरीची कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हलगी वाजवत शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात आले. ‘पीकविमा तात्काळ मिळालाच पाहिजे’, ‘दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने मागील १५ ते २० दिवसांपासून बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे, डॉ. गणेश ढवळे, ज्येष्ठ शेतकरी नेत्या सुशीलाताई मोराळे, बाळासाहेब मोरे, अशोकराव येडे, ज्ञानेश्वर राऊत, रामधन जमले, कुलदीप करपे, हनुमान घोडके, राजू गायके, खाजाभाई पठाण, दीपक जाधव, प्रदीप घुमरे, बळीराम मेहेत्रे, सतीश विसाफे, मच्छिंद्र साठे, शाम पांढरे, खंडू गाडेकर, धनंजय सागर, अण्णा वाणी, रोहिदास मस्के, मुसा बेग, चांद बॅग, राजाभाऊ साळुंखे, विक्रम साळुंखे, विष्णू साळुंखे, सुलेमान पठाण, मुसा पठाण, विक्रम शिंदे, दिलीप शिंदे, मशरूम साळुंखे, सुरेश साळुंखे आदींसह बीड तालुक्यातील ३० ते ३५ गावांमधील शेतकरी उपस्थित होते.
चौकट : सोयाबीन, कापूस, बाजरी घेऊन शेतकरी आंदोलनात
‘हलगी बजाव’ आंदोलनात शेतकरी हातात करपलेले सोयाबीन, सुकलेले कापसाचे दाणे आणि दाणे न भरलेल्या बाजरीच्या कणसे घेऊन सहभागी झाले. पिकांची झालेली दयनीय अवस्था शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करपलेली पिके आंदोलनस्थळी आणली होती. आंदोलनात महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
चौकट : हलगीच्या नादाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. हलगीच्या कडकडाटासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांच्या घोषणा दिल्याने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • ‘मोदी’ चॉकलेट वाटून पंतप्रधानांचा उपहासात्मक वाढदिवस; ‘मेलोडी’ला नागरिकांची पसंती ‘अच्छे दिन’पासून ‘१५ लाखां’पर्यंत… रिपब्लिकन सेनेचे ‘मोदी चॉकलेट’ आंदोलन ‘मोदी’ चॉकलेट वाटून पंतप्रधानांचा उपहासात्मक वाढदिवस; ‘मेलोडी’ला नागरिकांची पसंती ‘अच्छे दिन’पासून ‘१५ लाखां’पर्यंत… रिपब्लिकन सेनेचे ‘मोदी चॉकलेट’ आंदोलन ‘आत्मनिर्भर भारत’च्या नावाने ‘मेलोडी’ चॉकलेट; रिपब्लिकन सेनेचा मोदींच्या वाढदिवशी उपरोधिक निषेध अच्छे दिन, १५ लाख, रोजगार, स्वस्त इंधन आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यांवर रिपब्लिकन सेनेचा उपरोधिक निषेध छत्रपती संभाजीनगर दि.१७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अनोख्या आणि उपरोधिक पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ‘मोदी चॉकलेट’ आणि ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप करत मोदी सरकारच्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली. आंदोलनादरम्यान ‘मोदी चॉकलेट’च्या माध्यमातून ‘अच्छे दिन’, १५ लाख रुपये, प्रतिवर्षी २ कोटी रोजगार, स्वस्त इंधन, प्रत्येकाला स्वस्त गॅस, शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी आदी मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला. या आश्वासनांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अपेक्षा आणि त्यानंतरच्या अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी चॉकलेट वाटपाचे उपरोधिक वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणून ‘आत्मनिर्भर भारत’ या नावाने ‘मेलोडी’ चॉकलेटचेही वाटप करण्यात आले. ‘मोदी’ आणि ‘मेलोडी’ या शब्दांतील साम्याचा आधार घेत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या घोषणांवर आणि आश्वासनांवर उपरोधिक भाष्य केले. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या विविध घोषणा, आश्वासने आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत प्रश्न उपस्थित केले. वाढती महागाई, रोजगाराच्या संधी, इंधनाचे दर, घरगुती गॅस, शेतमालाचे भाव आणि शेतकरी प्रश्न याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. ‘मोदी चॉकलेट’पेक्षा नागरिकांनी ‘मेलोडी’ चॉकलेटला अधिक पसंती दिली. चॉकलेट वाटपादरम्यान नागरिकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याची नाराजी व्यक्त केली व पुन्हा मोदी नको अश्या प्रतिक्रिया दिल्या ईव्हीएम च्या जीवावर मोदी निवडून येतात असा टोलाही नागरिकांनी लगावला. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना “आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हे चॉकलेट वाटप असून, जनतेला केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्ष परिणाम हवेत,” अशी भूमिका रिपब्लिकन सेनेच्या वतीने मांडण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७६वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी देशभर विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. रिपब्लिकन सेनेने मात्र याच दिवशी उपरोधिक चॉकलेट वाटपाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर आणि आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करत आपला निषेध नोंदविला. यावेळी के व्ही मोरे, सचिन निकम, मिलिंद मोकळे, सुनील पांडे, अजय बनसोडे, राहुल गवळी, राष्ट्रपाल गवई, बाळू गायकवाड,अतुल चव्हाण, सचिन शिंगाडे, राजू मगरे, अनिल खरात, आकाश पंडित, अमोल तुपे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
    3
    ‘मोदी’ चॉकलेट वाटून पंतप्रधानांचा उपहासात्मक वाढदिवस; ‘मेलोडी’ला नागरिकांची पसंती

‘अच्छे दिन’पासून ‘१५ लाखां’पर्यंत… रिपब्लिकन सेनेचे ‘मोदी चॉकलेट’ आंदोलन
‘मोदी’ चॉकलेट वाटून पंतप्रधानांचा उपहासात्मक वाढदिवस; ‘मेलोडी’ला नागरिकांची पसंती
‘अच्छे दिन’पासून ‘१५ लाखां’पर्यंत… रिपब्लिकन सेनेचे ‘मोदी चॉकलेट’ आंदोलन
‘आत्मनिर्भर भारत’च्या नावाने ‘मेलोडी’ चॉकलेट; रिपब्लिकन सेनेचा मोदींच्या वाढदिवशी उपरोधिक निषेध
अच्छे दिन, १५ लाख, रोजगार, स्वस्त इंधन आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यांवर रिपब्लिकन सेनेचा उपरोधिक निषेध
छत्रपती संभाजीनगर दि.१७ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता अनोख्या आणि उपरोधिक पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ‘मोदी चॉकलेट’ आणि ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप करत मोदी सरकारच्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली.
आंदोलनादरम्यान ‘मोदी चॉकलेट’च्या माध्यमातून ‘अच्छे दिन’, १५ लाख रुपये, प्रतिवर्षी २ कोटी रोजगार, स्वस्त इंधन, प्रत्येकाला स्वस्त गॅस, शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी आदी मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला. 
या आश्वासनांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अपेक्षा आणि त्यानंतरच्या अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी चॉकलेट वाटपाचे उपरोधिक वाटप करण्यात आले.
विशेष बाब म्हणून ‘आत्मनिर्भर भारत’ या नावाने ‘मेलोडी’ चॉकलेटचेही वाटप करण्यात आले. ‘मोदी’ आणि ‘मेलोडी’ या शब्दांतील साम्याचा आधार घेत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या घोषणांवर आणि आश्वासनांवर उपरोधिक भाष्य केले.
रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या विविध घोषणा, आश्वासने आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत प्रश्न उपस्थित केले. वाढती महागाई, रोजगाराच्या संधी, इंधनाचे दर, घरगुती गॅस, शेतमालाचे भाव आणि शेतकरी प्रश्न याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
‘मोदी चॉकलेट’पेक्षा नागरिकांनी ‘मेलोडी’ चॉकलेटला अधिक पसंती दिली. चॉकलेट वाटपादरम्यान नागरिकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांबाबत अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याची नाराजी व्यक्त केली व पुन्हा मोदी नको अश्या प्रतिक्रिया दिल्या ईव्हीएम च्या जीवावर मोदी निवडून येतात असा टोलाही नागरिकांनी लगावला.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना “आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हे चॉकलेट वाटप असून, जनतेला केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्ष परिणाम हवेत,” अशी भूमिका रिपब्लिकन सेनेच्या वतीने मांडण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७६वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी देशभर विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.  रिपब्लिकन सेनेने मात्र याच दिवशी उपरोधिक चॉकलेट वाटपाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांवर आणि आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करत आपला निषेध नोंदविला.
यावेळी के व्ही मोरे, सचिन निकम, मिलिंद मोकळे, सुनील पांडे, अजय बनसोडे, राहुल गवळी, राष्ट्रपाल गवई, बाळू गायकवाड,अतुल चव्हाण, सचिन शिंगाडे, राजू मगरे, अनिल खरात, आकाश पंडित, अमोल तुपे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    Aurangabad, Pune•
    2 hrs ago
  • कन्नड तालुक्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू; पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली कुटुंबीयांची भेट कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात शेतात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखाच्या प्रसंगी धीर दिला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    कन्नड तालुक्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू; पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात शेतात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखाच्या प्रसंगी धीर दिला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.