Shuru
Apke Nagar Ki App…
User7432
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Riyazisaksayyed2
- आज 07/01/2026 छत्रपती संभाजीनगरमधील किलेअर्क भागात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला शहरातील भागात मंगळवारी मोठी खळबळ उडाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही संतप्त तरुणांनी दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सुदैवाने जलील यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या घराकडे जात असताना किलेअर्क परिसरात जमा झालेल्या आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलक आणि जलील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले. संतप्त तरुणांनी जलील यांच्या गाडीवर दगड भिरकावले आणि त्यांच्या ताफ्याला घेरण्याचा प्रयत्न केला. वादाचे मुख्य कारण: उमेदवारी अर्जावरून पेच या राड्यामागे आगामी निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून असलेला वाद असल्याचे समोर येत आहे. विशिष्ट मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत नाराजी होती. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी जलील यांच्या निर्णयाला विरोध दर्शवत थेट त्यांच्या गाडीवरच संताप व्यक्त केला. अशी प्रतिक्रिया जलील यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. किलेअर्क भागात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकशाहीत प्रत्येकाला निषेध करण्याचा अधिकार आहे, पण हिंसा करणे चुकीचे आहे..1
- मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मा रवींद्र शेटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त निराधार वृद्धाना भोजनदान दिले1
- Post by Peoples News 241
- श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले...1
- हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची घटना हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची दुसरी घटना घडली आहे. बाहेर राज्यातून येऊन येथे काम करणाऱ्या एका युवकाला काम करत असताना जोरदार वीजेचा शॉक लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक लोखंडी रॉड टेरेसवर नेत असताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला. या घटनेत युवकाचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले असून तो जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वीज सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती आहे.4
- मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मा रवींद्र शेटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त निराधार वृद्धाना भोजनदान दिले1
- हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा.1
- *प्रभाग ०८मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचारास गती;घरोघरी जावून प्रचार* https://youtu.be/fwAyc2_y0WI2