नेर शहरात पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ जमील कॉलनीत दोन घरफोड्या; पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास शहरातील वळीसाव दर्याजवळील वळीसाव नगर परिसरातील जमील कॉलनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत दोन घरांतून तब्बल ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेर शहरात पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमीद खान अयुब खान (वय ४७) यांच्या घरात चोरट्यांनी जिन्यावरून प्रवेश करून कपाट फोडले. यात दहा ग्रॅम सोन्याचा हार, ४.५ ग्रॅम सोन्याची कर्णफुले, ३.५ ग्रॅम सोन्याची अंगठी, दहा ग्रॅम चांदीचे पैंजण तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणारे शेख मुस्ताक यांच्या घराकडे मोर्चा वळवला. तेथेही जिन्यावरून घरात प्रवेश करून कपाट फोडण्यात आले. या घरातून दोन ग्रॅम सोन्याच्या बाळ्या व ३३ हजार रुपयांची रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल लंपास करण्यात आला. दोन्ही चोरीच्या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस कर्मचारी प्रकाश आडे, नितेश राठोड, आरिफ शेख हे पुढील तपास करीत आहेत.

- JKV NEWS 24 पेज को लाइक करें शेयर करें फॉलो करें 98814508911
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये २ ते ९ मे दरम्यान धम्म बालसंस्कार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी धम्म शांतता रॅली काढली.1
- Post by Pratik1
- वर्धा शहरातील रस्त्यावर गटार तुंबल्याने गलिच्छ पाणी सर्वत्र पसरले आहे. यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.1
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सिंधगि, चालगनीसह अनेक गावांमध्ये ट्रेझर बोटी वापरून रेतीचा अवैध उपसा सर्रास सुरू आहे. या गंभीर प्रकारावर महसूल प्रशासन गप्प असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी कलेक्टर साहेबांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.1
- मुजफ्फरपुर में मांस दुकानों पर छापा कई घंटे तक चली कार्रवाई सं/दिग्ध मां/स बरा/मद कई कारोबारी फरार #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpurpolice #Muzaffarpur #NewsUpdate #facebookviral #aakashpriyadarshi #worldbiharnews मुजफ्फरपुर में मांस दुकानों पर छापा कई घंटे तक चली कार्रवाई सं/दिग्ध मां/स बरा/मद कई कारोबारी फरार #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpurpolice #Muzaffarpur #NewsUpdate #facebookviral #aakashpriyadarshi #worldbiharnews1