logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई ;ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन. नांदेड दि. 28 एप्रिल :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना,भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा,महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिक चे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

17 hrs ago
user_राजुभाऊ गायकवाड
राजुभाऊ गायकवाड
मी 2021 पासून पत्रकार आहे हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
17 hrs ago
e1ecca67-7cea-4a38-a29c-1633d30473b1

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • कछरा का दिकत
    1
    कछरा का दिकत
    user_Ajay Pawar
    Ajay Pawar
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    11 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    4
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    1
    नांदेड (प्रतिनिधी) : बिदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात टिप्पर आणि ऑटो यांच्यात जोरदार धडक होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिप्पर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
जखमी प्रवासी हे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरातील बेहारीपूर गावातील असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
👉 अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
    1
    माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा ठाणे येथील स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब 
यांच्या उपस्थित  श्री. संग्राम हयगले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.