logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

घराला आग लागून लाखोंचे नुकसान घोळसगावातील घटना; साडे बारा लाखांच्या नुकसानीचा दावा अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथील रहिवाशी राघवेंद्र चंदु जगताप यांच्या घराला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून घर जळून भस्मसात झाले. घरातील सर्व साहित्य, धान्य, कपडे, पाच तोळे सोने, रोख रक्कम ८५ हजार २०० रुपये, शालेय साहित्य असे १२ लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे जगताप कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.सदर घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी व्ही. एस. पवार यांनी करुन संबंधित कार्यलयास सादर केला आहे. घरातील सर्व मंडळीकामानिमित्त बाहेर गेली असताना घरात शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागल्याने जीवित हानी टळली. सदर घटनेची माहिती मिळताच सरपंच राजकुमार किवडे व इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले.

5 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
51e732b9-85e8-4f7c-aff5-9c90682955d0

घराला आग लागून लाखोंचे नुकसान घोळसगावातील घटना; साडे बारा लाखांच्या नुकसानीचा दावा अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथील रहिवाशी राघवेंद्र चंदु जगताप यांच्या घराला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून घर जळून भस्मसात झाले. घरातील सर्व साहित्य, धान्य, कपडे, पाच तोळे सोने, रोख रक्कम ८५ हजार २०० रुपये, शालेय साहित्य असे १२ लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे जगताप कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.सदर घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी व्ही. एस. पवार यांनी करुन संबंधित कार्यलयास सादर केला आहे. घरातील सर्व मंडळीकामानिमित्त बाहेर गेली असताना घरात शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागल्याने जीवित हानी टळली. सदर घटनेची माहिती मिळताच सरपंच राजकुमार किवडे व इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले. देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
    1
    आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले.
देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Dilip Surwase
    5
    Post by Dilip Surwase
    user_Dilip Surwase
    Dilip Surwase
    Local Politician उमरगा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत
    1
    ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो.
---
**हेडलाईन :**
**बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव**
**सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज**
सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे.
भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे.
याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    1
    आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू लातूर | प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले. दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    1
    लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा गोंधळातच सुरू
लातूर | प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आज गोंधळाच्या वातावरणातच सुरू झाली. सभेच्या प्रारंभीच विविध मुद्द्यांवरून नगरसेवकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
विविध प्रलंबित प्रश्न, शहरातील मूलभूत सुविधा तसेच प्रशासनाच्या कामकाजाबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सभेतील गोंधळामुळे कामकाज काही काळ ठप्प झाले होते. नंतर महापौर आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि सभेचे कामकाज पुढे सुरू करण्यात आले.
दरम्यान, शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    1
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिशा देणारा आणि समाधानकारक - माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Dilip Surwase
    7
    Post by Dilip Surwase
    user_Dilip Surwase
    Dilip Surwase
    Local Politician उमरगा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.