logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जागतिक महिला दिनानिमित्त ‘अस्मिता महिला लीग’ स्पर्धा उत्साहात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च रोजी येथील तालुका क्रीडा संकुलावर अस्मिता महिला लीग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित मैदान गाजविले. ही स्पर्धा केंद्र शासनाच्या मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग हिंगोली, खेलो इंडिया हिंगोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट व गाईड तसेच एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या शर्यतींमध्ये खेळाडूंनी अटीतटीची लढत देत उत्कृष्ट कामगिरी केली. खुल्या गटातील स्पर्धेत 100 मीटर धावण्यात पल्लवी पांचाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. 200 मीटरमध्ये आरती राठोड तर 400 मीटरमध्ये वैष्णवी वाशिमकर हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. 18 वर्षांखालील गटात 100 मीटर धावण्यात पायल अशोक राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व प्राची काठाले (तृतीय) यांनी क्रमांक मिळवले. 200 मीटरमध्ये पायल राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व आकांक्षा नरवाडे (तृतीय) तर 400 मीटरमध्ये पायल राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व कोमल नवले (तृतीय) यांनी यश मिळवले. या गटात पायल राठोड व शुभांगी राठोड यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली. 13 वर्षांखालील गटात 100 मीटर धावण्यात कल्याणी पवार (प्रथम), अश्विनी राठोड (द्वितीय) व रागिणी पतंगे (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. 200 मीटरमध्ये कल्याणी अनिल पवार (प्रथम), मेघा लोणकर (द्वितीय) व अनुष्का वायगाये (तृतीय) तर 400 मीटरमध्ये कल्याणी पवार (प्रथम), शर्वरी पोले (द्वितीय) व मीरा नरवाडे (तृतीय) यांनी यश मिळवले. या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, ॲड. अंजली इंगोले, क्रीडा अधिकारी भूमरे, गणेश बोडके, खेलो इंडिया केंद्राचे शेख नफिज बाजंलावार आदी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान डॉ. अयोध्या तांबिळे व करण श्रीखंडे यांनी वैद्यकीय सेवा दिली. हा कार्यक्रम मेरा युवा भारत हिंगोलीचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, अनिल ढंगे व प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पवन वासनिक, अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव गंगावणे व गजानन आडे यांच्या टीमने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

7 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
7 hrs ago
5127443d-b3d8-4c58-bb5c-3f796873f50b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    5 hrs ago
  • *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*
    1
    *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
नांदेड:
शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला
या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
"आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.