Shuru
Apke Nagar Ki App…
महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र महिला शेतकरी सबलीकरण अधिनियम 2026 अंतर्गत. 'महिला शेतकरी प्रमाणपत्रा'साठीचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल आज ✨ मा. मंत्री श्री दत्तात्रय भरणे (कृषी) ✨ यांच्या हस्ते अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे! या उपक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना महत्त्वाच्या लाभ आणि सेवांपर्यंत सहज पोहोच मिळवून देऊन त्यांचे सबलीकरण करणे हा आहे. 🇮🇳🌱 कृपया ही माहिती तुमच्या नेटवर्कमधील सर्व महिला शेतकरी आणि महिला बचत गटांपर्यंत नक्की पोहोचवा! 📲👥
SHEGAONlive
महत्त्वाची घोषणा महाराष्ट्र महिला शेतकरी सबलीकरण अधिनियम 2026 अंतर्गत. 'महिला शेतकरी प्रमाणपत्रा'साठीचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल आज ✨ मा. मंत्री श्री दत्तात्रय भरणे (कृषी) ✨ यांच्या हस्ते अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे! या उपक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना महत्त्वाच्या लाभ आणि सेवांपर्यंत सहज पोहोच मिळवून देऊन त्यांचे सबलीकरण करणे हा आहे. 🇮🇳🌱 कृपया ही माहिती तुमच्या नेटवर्कमधील सर्व महिला शेतकरी आणि महिला बचत गटांपर्यंत नक्की पोहोचवा! 📲👥
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन1
- बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*1
- दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा1
- खामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीचा चिमुकली काढला लकी ड्रॉ खामगाव: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत प्रथम मानाचा लाकडी गणपती , तानाजी गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, व राणा गणेश मंडळ असतात तर त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे इतर मंडळे सहभागी होत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉ नुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असून अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणुक निघणार आहे.यामध्ये शिवाजी नगर पोलिस स्टेशन तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अशा एकूण 28 गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे. या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ,शिवाजी नगर पो.स्टे.चे ठाणेदार मंदार पुरी व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रिश अनुपकुमार छतवाणी वय 3 व आर्यन संतोष श्रीनाथ वय या लहान मूल्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी ने लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली.4
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.4
- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान1
- चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी1