logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भंडारा येथील नवीन टाकळी, भगतसिंग वॉर्डमधील शिवाजी पुतळ्याजवळ नालीचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून त्याचे फोटोही पाठवण्यात आले आहेत, परंतु तरीही प्रशासनाकडून कोणतेही कार्य करण्यात आलेले नाही. सतत पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

8 hrs ago
user_दादाराम गभणे
दादाराम गभणे
भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
8 hrs ago

भंडारा येथील नवीन टाकळी, भगतसिंग वॉर्डमधील शिवाजी पुतळ्याजवळ नालीचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून त्याचे फोटोही पाठवण्यात आले आहेत, परंतु तरीही प्रशासनाकडून कोणतेही कार्य करण्यात आलेले नाही. सतत पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराष्ट्रात स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ते २८ तारखेपर्यंत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे।
    1
    महाराष्ट्रात स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २२ ते २८ तारखेपर्यंत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे।
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सडक अर्जुनी येथील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्याच पावसात या पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्ता खचल्याचे आणि रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील सुमारे १०० मीटर रस्ता तुटला होता. या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना युवासेना गोंदियाचे माजी जिल्हाप्रमुख महेश डुंभरे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे सीओडी (COD) तात्काळ थांबवून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुलाची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
    3
    मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सडक अर्जुनी येथील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्याच पावसात या पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्ता खचल्याचे आणि रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील सुमारे १०० मीटर रस्ता तुटला होता.

या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना युवासेना गोंदियाचे माजी जिल्हाप्रमुख महेश डुंभरे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे सीओडी (COD) तात्काळ थांबवून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुलाची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या अन्यायकारक घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकारच्या मनमानी कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी हा लढा उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. तसेच बहुजन समाज पक्षाचे नेते डॉ. वसंत खवास, शिवसेना नेते मिथुन माटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, माजी नगराध्यक्ष लव जनबंधू, नगरसेवक किरण नागरीकर, कैलास कोमरेल्लीवार, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष वर्षा ठाकरे, माजी नगरसेवक मिनाक्षी उमरेडकर, निशा जांभुळे, मंजुषा समर्थ, बलवंत जांभुळकर, अभिजित बन्सोड, विजय लांजेवार, भोजराज जांभुळकर, प्रेमनाथ सोरदे, सुनिल लांजेवार, प्रफुल्ल बार्बोडे, कैलास रामटेके, प्रफुल्ल गजभिये, जितेंद्र सवाईकर, दिलीप श्रीरामे, गणेश फुलबांधे, विशाल खंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    1
    नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आणि दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या अन्यायकारक घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकारच्या मनमानी कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी हा लढा उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या आंदोलनात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. तसेच बहुजन समाज पक्षाचे नेते डॉ. वसंत खवास, शिवसेना नेते मिथुन माटे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, माजी नगराध्यक्ष लव जनबंधू, नगरसेवक किरण नागरीकर, कैलास कोमरेल्लीवार, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष वर्षा ठाकरे, माजी नगरसेवक मिनाक्षी उमरेडकर, निशा जांभुळे, मंजुषा समर्थ, बलवंत जांभुळकर, अभिजित बन्सोड, विजय लांजेवार, भोजराज जांभुळकर, प्रेमनाथ सोरदे, सुनिल लांजेवार, प्रफुल्ल बार्बोडे, कैलास रामटेके, प्रफुल्ल गजभिये, जितेंद्र सवाईकर, दिलीप श्रीरामे, गणेश फुलबांधे, विशाल खंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • चंद्रपूर येथे बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. संघर्षाचा समानार्थी शब्द म्हणजे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, अशा शब्दांत त्यांनी मुंडे यांच्या लोकनेतृत्वाचा गौरव केला. अन्यायाविरुद्ध अखंड लढा देणे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करणे आणि जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देणारे नेतृत्व हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांची खरी ओळख होती, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे.
    1
    चंद्रपूर येथे बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. संघर्षाचा समानार्थी शब्द म्हणजे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, अशा शब्दांत त्यांनी मुंडे यांच्या लोकनेतृत्वाचा गौरव केला.

अन्यायाविरुद्ध अखंड लढा देणे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष करणे आणि जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देणारे नेतृत्व हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांची खरी ओळख होती, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • एक सच्चा गुरू नेहमी हीच इच्छा बाळगतो की त्याचा प्रत्येक शिष्य ज्ञान, संस्कार आणि यशाच्या बाबतीत स्वतःपेक्षाही पुढे निघून जावा.
    1
    एक सच्चा गुरू नेहमी हीच इच्छा बाळगतो की त्याचा प्रत्येक शिष्य ज्ञान, संस्कार आणि यशाच्या बाबतीत स्वतःपेक्षाही पुढे निघून जावा.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर येथील आरटीओ कार्यालयातील तक्रारींना नेमकी वाचा कधी आणि कोण फोडणार, असा विचार आता व्यापारी संघटनांकडून केला जात आहे. आरटीओ कार्यालयातील तक्रारींच्या सद्यस्थितीबाबत व्यापारी संघटनांमध्ये सध्या हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
    1
    नागपूर येथील आरटीओ कार्यालयातील तक्रारींना नेमकी वाचा कधी आणि कोण फोडणार, असा विचार आता व्यापारी संघटनांकडून केला जात आहे. आरटीओ कार्यालयातील तक्रारींच्या सद्यस्थितीबाबत व्यापारी संघटनांमध्ये सध्या हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • माझ्यावर ज्या नेत्यांचे ऋण आहे, त्यात पहिले नाव केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी आणि दुसरे नाव लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. नागपूर आणि चंद्रपूरच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांविषयी आपल्या भावना अत्यंत आदरपूर्वक आणि कृतज्ञतेने व्यक्त केल्या. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच बल्लारशा तहसीलच्या निर्मितीचा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, असे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. हा निर्णय केवळ एक प्रशासकीय बदल नसून जनतेच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मिळालेला न्याय होता, असे सांगत त्यांनी या ऋणाची जाणीव आणि कृतज्ञता आयुष्यभर कायम राहील, असा शब्द दिला.
    1
    माझ्यावर ज्या नेत्यांचे ऋण आहे, त्यात पहिले नाव केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी आणि दुसरे नाव लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. नागपूर आणि चंद्रपूरच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांविषयी आपल्या भावना अत्यंत आदरपूर्वक आणि कृतज्ञतेने व्यक्त केल्या.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच बल्लारशा तहसीलच्या निर्मितीचा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला, असे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. हा निर्णय केवळ एक प्रशासकीय बदल नसून जनतेच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मिळालेला न्याय होता, असे सांगत त्यांनी या ऋणाची जाणीव आणि कृतज्ञता आयुष्यभर कायम राहील, असा शब्द दिला.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाने घरफोडीच्या गंभीर प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करून फरियादीला परत सोपवत धडाकेबाज कामगिरी केली आहे. भंडारा रोड, पाडी येथील रहिवासी आदित्य गौरव आर्य (वय २१) यांच्या 'वन क्लिकी एंटरप्रायझेस' या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोराने रोख रकमेसह साहित्य लांबवले होते. या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि गुप्त बातमीदार तसेच गुन्ह्याच्या विशिष्ट पद्धतीचा (मोडस ऑपरेंडी) अभ्यास करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जाळे विणून ओमप्रकाश पुनम लहरे (वय २६, रा. मिनीमाता नगर, पाचपावली, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने या चोरीची कबुली दिली. पोलीस तपासात आरोपी हा गुन्हेगारी अभिलेखावरील शातिर गुन्हेगार असल्याचे आणि त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेसंबंधी अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी बंद दुकाने व घरांचे शटर उचकटून सहज नेता येईल असा मौल्यवान माल चोरणे ही त्याची गुन्हे करण्याची पद्धत होती. नागपूर शहर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
    2
    नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाने घरफोडीच्या गंभीर प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करून फरियादीला परत सोपवत धडाकेबाज कामगिरी केली आहे.

भंडारा रोड, पाडी येथील रहिवासी आदित्य गौरव आर्य (वय २१) यांच्या 'वन क्लिकी एंटरप्रायझेस' या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोराने रोख रकमेसह साहित्य लांबवले होते. या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि गुप्त बातमीदार तसेच गुन्ह्याच्या विशिष्ट पद्धतीचा (मोडस ऑपरेंडी) अभ्यास करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जाळे विणून ओमप्रकाश पुनम लहरे (वय २६, रा. मिनीमाता नगर, पाचपावली, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने या चोरीची कबुली दिली.

पोलीस तपासात आरोपी हा गुन्हेगारी अभिलेखावरील शातिर गुन्हेगार असल्याचे आणि त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेसंबंधी अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी बंद दुकाने व घरांचे शटर उचकटून सहज नेता येईल असा मौल्यवान माल चोरणे ही त्याची गुन्हे करण्याची पद्धत होती. नागपूर शहर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नागपूरमध्ये दिवसेंदिवस हत्येच्या घटना घडत असून पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. गोरेवाडा येथील हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी जाहीर परेड घेतली असून त्यांना संबंधित क्षेत्रात फिरवले आहे. या घटनेत दरोड्यानंतर एका ऑटो चालकाची हत्या करण्यात आली होती.
    1
    नागपूरमध्ये दिवसेंदिवस हत्येच्या घटना घडत असून पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. गोरेवाडा येथील हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी जाहीर परेड घेतली असून त्यांना संबंधित क्षेत्रात फिरवले आहे. या घटनेत दरोड्यानंतर एका ऑटो चालकाची हत्या करण्यात आली होती.
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.