Shuru
Apke Nagar Ki App…
नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.
Kapil Katyare
नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी सरकार सक्रिय नेपाळमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नेपाळ सरकारच्या संपर्कात असून, महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत राज्य सरकारकडून सतत माहिती घेतली जात आहे. संबंधित नागरिकांशी संपर्क साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासह आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे महाजन यांनी सांगितले.1
- पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें। पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।1
- मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिनांक 28 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन चाचडगाव येथे १४ एकरांच्या प्रशस्त कॅम्पसमध्ये अत्याधुनिक सुविधा; १०९ एकरांवर विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शेती क्षेत्र दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक २६ ऑगस्ट २०२६ | नाशिक, (प्रतिनिधी : निलेश शेकोकार):- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालया’च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक . २८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते चाचडगाव, तालुका दिंडोरी येथे होणार आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत मुलांचे आणि मुलींचे सुसज्ज वसतीगृह या तीन भव्य इमारतींचे उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्हॅकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, शिक्षणाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार राजाराम वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार उपस्थित राहणार आहेत. नाशिक महापालिकेच्या महापौर श्रीमती हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट . नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. २००३ पासून कृषी शिक्षणाची वाटचाल नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनासाठी महाराष्ट्रात अग्रगण्य मानला जातो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मराठा विद्या प्रसारक समाजाने दिनांक १ नोव्हेंबर २००३ रोजी नाशिक शहरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात केली. पुढे या महाविद्यालयाचे ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. कृषी शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयाचे नाशिक शहरातून दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतर करण्यात आले. १४ एकरांचा अत्याधुनिक कॅम्पस चाचडगाव येथे तब्बल १४ एकर जागेवर महाविद्यालयाचा प्रशस्त व आधुनिक कॅम्पस उभारण्यात आला आहे. या परिसरात प्रशासकीय इमारत, मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतीगृह, भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, संगणक प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व दहा विभागांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, आधुनिक शिक्षण साहित्याने सुसज्ज व्याख्यान कक्ष, वाय-फाय आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सुविधांसोबतच निवास आणि अभ्यासासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. १०९ एकरांवर प्रात्यक्षिक शेती कृषी शिक्षणातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष शेतीचा अनुभव. ही गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी तब्बल १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पिकांचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, कृषी प्रयोग, संशोधन आणि शेतकरी मार्गदर्शन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. महाविद्यालयात चार वर्षांचा बी.एस्सी. कृषी पदवी अभ्यासक्रम असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयही सुरू आहे. त्यामुळे कृषी शिक्षणाची साखळी अधिक सक्षम झाली आहे. ‘अ’ दर्जासह विविध पुरस्कारांनी गौरव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत सन २०२२-२३ मध्ये महाविद्यालयास ‘अ’ दर्जा प्रदान केला. तसेच सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’तर्फे महाविद्यालयाला ‘कृषीभूषण-२०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘KRUSHITHON 2024’मध्ये महाविद्यालयाला ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारांमुळे महाविद्यालयाच्या कृषी शिक्षण, प्रयोगशीलता आणि संशोधनाच्या कार्याला विशेष अधोरेखित करण्यात आले आहे. संशोधन आणि शेतकरी सेवेला प्राधान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक आणि ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच संशोधनाला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेती, संशोधन आणि शेतकरी सेवा यांचा समन्वय साधत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शिक्षण, संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गावांचा कृषी व आर्थिक विकास साधणे हेच महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केले. मविप्र संस्थेच्या कृषी शिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार असून, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांनाही त्याचा मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक प्रतिनिधी : निलेश शेकोकार, नाशिक दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक : प्रा. डॉक्टर भागवत महाले2
- १६० कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आमदार हिरामण खोसकरांचा पाठिंबा इगतपुरी तालुक्यातील वाडीवरे येथील रुठे यार्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील सुमारे १६० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, तसेच अनेक वर्षांपासून नियमित उत्पादनाचे काम करणाऱ्या या कामगारांना कायम कामगारांप्रमाणे वेतन व अन्य लाभ द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दर्शवला असून कंपनीतील हे सुमारे १६० कामगार गेल्या अनेक वर्षांपासून उत्पादन विभागात मशीन ऑपरेशनसह विविध नियमित स्वरूपाची कामे सातत्याने करत असल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. मात्र, एवढ्या काळापासून कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नाशिक वर्कर्स युनियन सिटी संलग्न संघटनेने १३ मे २०२६ रोजी कामगार आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे निवेदन सादर केले होते. संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेऊन कायम कामगारांप्रमाणे वेतन, सेवा-सुविधा आणि अन्य लाभ देण्यात यावेत, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. दरम्यान, कंत्राटी पद्धतीचे निर्मूलन करण्याबाबतचा प्रस्ताव कामगार विभागाने राज्य सरकारकडे सादर केला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीतील कामगारांच्या रोजगाराच्या स्वरूपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, नियमित स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना योग्य सेवा-सुरक्षा आणि लाभ मिळावेत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनासोबत वेळोवेळी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला असून कामगारांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होऊन त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशाराही त्यांनी दिला दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणामुळे १६० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.4
- मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी मोठामाळ–श्रीभुवन परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा; ग्रामस्थांची मागणी प्रतिनिधी बोरगाव. जय गांगुर्डे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील मोठामाळ, श्रीभुवन परिसरात निसर्गसौंदर्याची मोठी देणगी असून, या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटनस्थळाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र हद्दीतील वनविभागाच्या जागेचा योग्य नियोजनातून पर्यटनासाठी विकास केल्यास या परिसराला नवी ओळख मिळू शकते, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मोठामाळ–श्रीभुवन परिसरात नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि हिरवाई असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. वनविभागाने या परिसराची पाहणी करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच हॉटेल, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, वाहतूक व इतर पूरक व्यवसायांना चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे वनविभाग व संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मोठामाळ–श्रीभुवन परिसराच्या पर्यटन विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी; खासदार भास्कर भगरे यांचा पाठिंबा विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांची विचारपूस केली. अनुदानित आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या आणि घडलेल्या इतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, निष्पाप मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, तर सध्या उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ५ ऑगस्ट २०२० आणि सुधारित १४ ऑगस्ट २०१९ चे शासन निर्णय रद्द करावेत, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असून, शासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी गोल्फ क्लब मैदानावरील उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई व्हावी यासाठी आगामी काळात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार भगरे यांनी सांगितले. पाचव्या दिवशीही विद्यार्थी आमरण उपोषणावर ठाम असल्याने आता शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.4
- मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.1