छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वनस्पतिशास्त्र व दुग्धशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्याख्यान व विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे होते. यावेळी विचार मंचावर रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एच.ए.तिरपुडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.पी. बिरादार, दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. रंजन येडतकर,डॉ चाटे सुधाकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ.मांजरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगत विज्ञाननिष्ठ विचारसरणी विकसित करण्याचे आणि संशोधनाच्या क्षेत्रात पुढे येण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.एस. व्ही.चाटे यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील योगदान, पर्यावरण संवर्धन आणि संशोधनातील संधी यावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. तसेच डॉ. रंजन बी.एडतकर यांनी दुग्धउद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, अन्नसुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण आणि संशोधनाची गरज यावर सविस्तर विवेचन केले. यानंतर आयोजित विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे 150 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.सामान्य विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र व दुग्धशास्त्र विषयांवरील विविध फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचा ज्ञानविस्तार झाला. प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. पाटेकर एम. ए. यांनी केले.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे महाविद्यालयात विज्ञानमय वातावरण निर्माण झाले.

- Post by Dilip Surwase5
- हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.1
- Post by Info news1
- Post by Mohammad Rafikh1
- नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांनी दिलेल्या शुभेच्छांवर आधारित एक बातमी आहे: नांदेडमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह; कर्तृत्ववान महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.'नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती' हा मंत्र जपत, पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपला संकल्प जाहीर केला विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग नांदेडमधील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजिका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वच स्तरातील महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून समाजमाध्यमांवरही (Social Media) शुभेच्छांचा पूर आला आहे प्रामुख्याने पोलीस दलातील महिलांनी "ती सक्षम, ती निडर" अशा घोषणांसह महिला सुरक्षेचा संदेश दिला * जागरूकता अभियान: महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून 'सावित्रीच्या लेकी' आपला वारसा पुढे नेत असल्याचे अधोरेखित करण्यात आले * आरोग्य शिबिरे: काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचा संदेश या निमित्ताने तज्ज्ञ महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. "लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया आहे," असा सूर या वेळी उमटला एकूणच, नांदेडमध्ये सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रणरागिणींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा दिवस प्रेरणादायी बनवला आहे.4
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- Post by Nanded_71
- Post by Dilip Surwase7
- जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी1