*साधू संतांच्या मार्गदर्शनातून नाशिक कुंभ जगासाठी आदर्श ठरेल - मंत्री छगन भुजबळ* *कुंभमेळा २०२७ आस्था, विकास, स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम - मंत्री छगन भुजबळ* *आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक त्र्यंबकेश्वर सह जिल्ह्यात २८ हजार कोटीची विकासकामे सुरू- मंत्री छगन भुजबळ* *कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रथमतः स्वच्छ, निर्मळ गोदावरीसाठी प्राधान्य - मंत्री छगन भुजबळ* *नाशिक,दि.४ एप्रिल:-* आगामी नाशिक कुंभमेळा २०२७ हा केवळ धार्मिक पर्व नसून आस्था, विकास, स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम असणार आहे. हे कुंभ पर्व साधू संतांच्या मार्गदर्शनातून जगासाठी आदर्श ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक शहरातील स्वामी नारायण मंदिर येथे आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, महंत स्वामी सुब्रह्मण्यम भारती, महंत राजेंद्र दास, महंत रवींद्र पुरी, महंत प्रसाद महाराज अमळनेरकर, विश्व हिंदू परिषदेचे दिनेश चंद्रा,आयडीएसएचे अभ्यासक आशिष शुक्ल, उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक कैलास मुदलियार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह देशभरातून आलेले पूज्य संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, संत महंत हाच कुंभमेळ्याचा आत्मा आहे. आगामी नाशिक कुंभमेळा नियोजनात संतांची भूमिका मार्गदर्शक आणि निर्णायक असणार आहे. नाशिक ही केवळ ऐतिहासिक नगरी नसून भारताच्या आध्यात्मिक चेतनेचे, सनातन परंपरेचे आणि संत संस्कृतीचे जिवंत केंद्र आहे. गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले नाशिक, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दिव्यता, रामायणकालीन परंपरा आणि संत परंपरेच्या वारशामुळे देशभरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कुंभमेळ्याचे वैभव केवळ त्याच्या भव्यतेत नसून, त्याच्या आध्यात्मिक गाभ्यात.आहे आणि त्या गाभ्याचे केंद्र म्हणजे संत महंत आहे. अखाडे, शाही स्नान, धर्मसभा, प्रवचन, साधना आणि तपश्चर्या यांमधूनच कुंभाला त्याचे खरे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे आगामी कुंभाच्या प्रत्येक नियोजनात संत महंत त्यांचे प्रतिनिधी, अखाडे आणि धर्माचार्य यांचा सन्मानपूर्वक सहभाग महत्वाचा असणार आहे. या कुंभ पर्वाकडे केवळ धार्मिक आयोजन म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा सोहळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीचा महत्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, साधुग्राम, पार्किंग, निवासव्यवस्था, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनया केवळ या कुंभमेळ्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या पुढील अनेक दशकांसाठी शहराच्या विकासाचा पाया राहतील असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शासनाने याच दृष्टीने व्यापक नियोजन सुरू केले असून, या कुंभमेळ्यासाठी सुमारे २८ हजार कोटींची विकासकामे प्रस्तावित व कार्यान्वित केली आहेत. यामध्ये विशेषतः गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य असणार आहे. तसेच शहर जिल्ह्यातील प्रमुख रस्ते व पुलांचे सुदृढीकरण, नवीन घाटांची उभारणी, जुन्या घाटांचे आधुनिकीकरण, पेयजल व स्वच्छता व्यवस्थेचा विस्तार, साधुग्रामची उभारणी, पार्किंग, निवास, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. नाशिक कुंभ केवळ भव्य नव्हे, तर व्यवस्थित, सुरक्षित, सुगम आणि दूरदर्शी व्हावा, हा शासनाचा उद्देश आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कुंभसारख्या विराट आयोजनाचे यश केवळ निधी किंवा प्रकल्पांवर अवलंबून नसते. तर विश्वास, संवाद आणि समन्वय हीच त्याची खरी ताकद असते. शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक संस्था, स्वयंसेवी संघटना, व्यापारी वर्ग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत महंत या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यासच कुंभ यशस्वी होईल. या कुंभमेळ्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि सामाजिक उन्नतीला मोठी चालना मिळणार आहे. पूज्य संतांच्या मार्गदर्शनातून, शासन-प्रशासनाच्या कटिबद्धतेतून आणि समाजाच्या सक्रिय सहभागातून नाशिक कुंभमेळा जगासाठी एक आदर्श, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आयोजन ठरेल असा विश्वास देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
*साधू संतांच्या मार्गदर्शनातून नाशिक कुंभ जगासाठी आदर्श ठरेल - मंत्री छगन भुजबळ* *कुंभमेळा २०२७ आस्था, विकास, स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम - मंत्री छगन भुजबळ* *आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक त्र्यंबकेश्वर सह जिल्ह्यात २८ हजार कोटीची विकासकामे सुरू- मंत्री छगन भुजबळ* *कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रथमतः स्वच्छ, निर्मळ गोदावरीसाठी प्राधान्य - मंत्री छगन भुजबळ* *नाशिक,दि.४ एप्रिल:-* आगामी नाशिक कुंभमेळा २०२७ हा केवळ धार्मिक पर्व नसून आस्था, विकास, स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम असणार आहे. हे कुंभ पर्व साधू संतांच्या मार्गदर्शनातून जगासाठी आदर्श ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक शहरातील स्वामी नारायण मंदिर येथे आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे, महंत स्वामी सुब्रह्मण्यम भारती, महंत राजेंद्र दास, महंत रवींद्र पुरी, महंत प्रसाद महाराज अमळनेरकर, विश्व हिंदू परिषदेचे दिनेश चंद्रा,आयडीएसएचे अभ्यासक आशिष शुक्ल, उपमहापौर विलास शिंदे, नगरसेवक कैलास मुदलियार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह देशभरातून आलेले पूज्य संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, संत महंत हाच कुंभमेळ्याचा आत्मा आहे. आगामी नाशिक कुंभमेळा नियोजनात संतांची भूमिका मार्गदर्शक आणि निर्णायक असणार आहे. नाशिक ही केवळ ऐतिहासिक नगरी नसून भारताच्या आध्यात्मिक चेतनेचे, सनातन परंपरेचे आणि संत संस्कृतीचे जिवंत केंद्र आहे. गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले नाशिक, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दिव्यता, रामायणकालीन परंपरा आणि संत परंपरेच्या वारशामुळे देशभरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कुंभमेळ्याचे वैभव केवळ त्याच्या भव्यतेत नसून, त्याच्या आध्यात्मिक गाभ्यात.आहे आणि त्या गाभ्याचे केंद्र म्हणजे संत महंत आहे. अखाडे, शाही स्नान, धर्मसभा, प्रवचन, साधना आणि तपश्चर्या यांमधूनच कुंभाला त्याचे खरे
स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे आगामी कुंभाच्या प्रत्येक नियोजनात संत महंत त्यांचे प्रतिनिधी, अखाडे आणि धर्माचार्य यांचा सन्मानपूर्वक सहभाग महत्वाचा असणार आहे. या कुंभ पर्वाकडे केवळ धार्मिक आयोजन म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा सोहळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीचा महत्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, साधुग्राम, पार्किंग, निवासव्यवस्था, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनया केवळ या कुंभमेळ्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या पुढील अनेक दशकांसाठी शहराच्या विकासाचा पाया राहतील असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शासनाने याच दृष्टीने व्यापक नियोजन सुरू केले असून, या कुंभमेळ्यासाठी सुमारे २८ हजार कोटींची विकासकामे प्रस्तावित व कार्यान्वित केली आहेत. यामध्ये विशेषतः गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य असणार आहे. तसेच शहर जिल्ह्यातील प्रमुख रस्ते व पुलांचे सुदृढीकरण, नवीन घाटांची उभारणी, जुन्या घाटांचे आधुनिकीकरण, पेयजल व स्वच्छता व्यवस्थेचा विस्तार, साधुग्रामची उभारणी, पार्किंग, निवास, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश आहे. नाशिक कुंभ केवळ भव्य नव्हे, तर व्यवस्थित, सुरक्षित, सुगम आणि दूरदर्शी व्हावा, हा शासनाचा उद्देश आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कुंभसारख्या विराट आयोजनाचे यश केवळ निधी किंवा प्रकल्पांवर अवलंबून नसते. तर विश्वास, संवाद आणि समन्वय हीच त्याची खरी ताकद असते. शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक संस्था, स्वयंसेवी संघटना, व्यापारी वर्ग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत महंत या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यासच कुंभ यशस्वी होईल. या कुंभमेळ्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि सामाजिक उन्नतीला मोठी चालना मिळणार आहे. पूज्य संतांच्या मार्गदर्शनातून, शासन-प्रशासनाच्या कटिबद्धतेतून आणि समाजाच्या सक्रिय सहभागातून नाशिक कुंभमेळा जगासाठी एक आदर्श, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक आयोजन ठरेल असा विश्वास देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.1
- भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।4
- राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.1
- bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai2
- प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. – प्रतिनिधी : जयेश केवणे4
- डॉ बाबा साहब अंबेडकर जी का फ़ोटो गंदा नहीं होना चाहिए। #viralvideoシ #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #मुंब्रा #NiteshRane #viral #babasahabambedkar @highlight Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate ROhit Singh Kalpana Surywanshi1
- सुल्तानपुर में शिकायतकर्ता परिवार पर हमला, महिला के कपड़े फाड़ने और मारपीट का आरोप न्यूज़: सुल्तानपुर के कादीपुर क्षेत्र में भ्रष्टाचार की शिकायत दर्ज कराने के बाद एक परिवार पर हमला किए जाने का मामला सामने आया है। आरोप है कि ग्राम प्रधान और उनके साथ आए कई लोगों ने घर में घुसकर परिवार के सदस्यों के साथ मारपीट की। पीड़ित पक्ष का दावा है कि महिला के कपड़े फाड़े गए, बच्चों को भी पीटा गया और पूरे परिवार को लाठी-डंडों व धारदार हथियारों से घायल किया गया। परिवार का आरोप है कि घटना के बाद स्थानीय पुलिस ने एफआईआर दर्ज नहीं की और न ही मेडिकल जांच कराई। पीड़ितों ने प्रशासन से निष्पक्ष जांच, कड़ी कार्रवाई और सुरक्षा की मांग की है। #Sultanpur #UPPolice #JusticeForVictim #Kadipur #CrimeNews #WomenSafety #BreakingNews #UttarPradesh #ViralNews #PoliceAction1
- शिवर नगरी में श्री हनुमान जयंती के पावन अवसर पर संपूर्ण वातावरण भक्तिरस और आध्यात्मिक ऊर्जा से सराबोर हो गया। नगर के प्राचीन एवं जागृत श्री हनुमान मंदिर संस्थान में इस शुभ अवसर पर विविध धार्मिक कार्यक्रमों का भव्य आयोजन किया गया। सुबह से ही मंदिर परिसर में श्रद्धालुओं की भारी भीड़ उमड़ पड़ी थी। हनुमान जयंती के मुख्य कार्यक्रम अंतर्गत शेगांव निवासी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे के प्रभावी कीर्तन का आयोजन किया गया। महाराज के ओजस्वी वाणी, भावपूर्ण भजन-कीर्तन और प्रेरणादायी प्रवचन ने उपस्थित भक्तों को मंत्रमुग्ध कर दिया। उनके कीर्तन के माध्यम से भक्तिरस की ऐसी अविरल धारा प्रवाहित हुई कि प्रत्येक श्रद्धालु श्रीराम-हनुमान नामस्मरण में लीन हो गया। कीर्तन के दौरान महाराज ने श्री हनुमान जी के आदर्श जीवन, त्याग, निष्ठा, सेवा और समर्पण पर विस्तार से प्रकाश डाला। उन्होंने बताया कि हनुमान जी केवल शक्ति के प्रतीक नहीं, बल्कि वे संयम, बुद्धिमत्ता, अनुशासन और निष्काम सेवा के सर्वोच्च उदाहरण हैं। महाराज ने युवाओं को संस्कारयुक्त जीवन जीने, व्यसनमुक्त रहने तथा माता-पिता का सम्मान करने का संदेश दिया। कार्यक्रम के दौरान “जय बजरंगबली”, “जय श्रीराम” के जयघोष से संपूर्ण मंदिर परिसर गूंज उठा। श्रद्धालुओं ने भजन-कीर्तन में सहभाग लेते हुए भक्तिरस का भरपूर आनंद लिया। कई भक्त भावविभोर हो गए, तो अनेक श्रद्धालु भक्ति में झूमते हुए नजर आए। हनुमान जयंती के अवसर पर मंदिर में विशेष पूजा-अर्चना, महाआरती एवं प्रसाद वितरण कार्यक्रम भी संपन्न हुआ। मंदिर संस्थान तथा आयोजन समिति की ओर से श्रद्धालुओं की सुविधा हेतु उचित व्यवस्था की गई थी। संपूर्ण कार्यक्रम शांतता, अनुशासन और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम के समापन पर मंदिर संस्थान एवं ग्रामवासियों की ओर से ह.भ.प. श्री कैलासचंद्र महाराज गावंडे का सम्मान कर उनका आभार व्यक्त किया गया। उपस्थित भक्तों ने कहा कि इस कीर्तन से उन्हें आध्यात्मिक शांति, सकारात्मक ऊर्जा तथा जीवन में नई प्रेरणा प्राप्त हुई। शिवर नगरी में आयोजित यह हनुमान जयंती उत्सव भक्तों के लिए एक अविस्मरणीय अनुभव बन गया और पूरे नगर में धार्मिक चेतना का संचार हुआ।1