राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.

- नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.1
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1
- सोयगाव, दि. ०५ : दिंडोरीतील ताज्या दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत एक मालवाहतूक गाडी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कंकराळा गावातील युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात कोणी अडकले आहे का, या भीतीने संपूर्ण गाव विहिरीजवळ जमा झाले होते. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या गंभीर घटनेच्या वेळी एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे समोर आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर पांडवलेणी परिसरातील सुविधा अधिक दर्जेदार करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. त्रिरश्मी डोंगरावरील लेणींची पाहणी करत त्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रवेशमार्ग व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंग, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना व डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. – प्रतिनिधी : जयेश केवणे4