गॅस टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, महसूल विभागाच्या वतीने योग्य नियंत्रण सुरू गॅस सिलेंडरचा साठा आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 'ॲक्शन मोड'वर; जिल्ह्यात १० भरारी पथके तैनात लातूर (प्रतिनिधी) इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि व्यावसायिक वापर रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार किंवा समस्या असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या ९८९००८४१६८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गॅस पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, जिल्ह्यातील गॅस एजन्सींच्या साठा तपासणीसाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी १० विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके जिल्ह्यातील गॅस एजन्सीला, गॅस गोडावूनला 'सरप्राईज व्हिजिट' देऊन गॅस सिलेंडर साठ्याची तपासणी करतील. तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई करतील, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीधारकांची बैठक घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व घरगुती ग्राहकांना प्राधान्याने सिलेंडर पुरवठा करावा. एका कनेक्शन धारकाला २५ दिवसांच्या आत दुसरे सिलेंडर दिले जाऊ नये. तसेच, वितरण केवळ फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ आणि ओटीपी आधारित करावे. गॅस कंपनीने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम आकारू नये. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्यास किंवा काळाबाजार केल्यास अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. एजन्सीधारकांनी दररोजचा साठा प्रशासनाला सादर करणे अनिवार्य आहे. स्टॉक असतानाही हेतुपुरस्सर डिलिव्हरी न केल्यास कडक कारवाई होईल. सर्व गॅस एजन्सी नियमित वेळेनुसार उघड्या ठेवाव्यात, विनाकारण एजन्सी बंद ठेवू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Post by Sopan Talekar1
- माझे नाव:हनुमंत भिकाजी शिंदे. राहणार पालसिंगण तालुका जिल्हा बीड योजनेचा अर्धवट कामावर ग्रामपंचायत कार्यालय ते थेट राष्ट्रपती भवना पर्यंत ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने वारंवार तक्रारी केलेले आहेत यापैकी महा जलसमाधान या वेबसाईटवर देखील ऑनलाइन तक्रार केलेली आहे या तक्रारीचे स्टेटस तपासले असतात तक्रारीचे समाधान केल्याचे दिसत आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही मग माझ्या तक्रारीचे असे स्टेटस दाखवून प्रशासनाला नेमकं सिद्ध काय करायचं आहे1
- ----- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त ग्राम पंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते. या वेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, साहेबराव निर्मळ, ॲड.गणेश वाणी, ग्राम पंचायत सदस्य दामोदर थोरात, रमेश गायकवाड, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, मोहनराव कोटुळे, महादेव वाणी, ज्ञानेश्वर कुदळे, संजय पावले, खंडू वाणी, श्रीराम तागड, भीमराव बोराटे, सुभाष मुळे, मल्हारी आबदार, पोपट निर्मळ सह आदी उपस्थित होते. --- “महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी” :– डॉ.गणेश ढवळे -- या वेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. “विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...” हा महात्मा फुले यांचा विचार उद्धृत करत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले असून, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला नवी दिशा दिली, असे त्यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षण सर्वांसाठी खुले केले. अज्ञानाचा अंधार दूर करून समाज सक्षम बनवण्याचा त्यांचा विचार आज ही मार्गदर्शक आहे, असे ही त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक विचारातून समाजाला जागृत करत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. धर्माच्या नावाने चालणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध करून “माणुसकी हाच खरा धर्म” असल्याचा संदेश त्यांनी दिला. शेतकरी हा देशाचा कणा असून तो अन्याय, कर्जबाजारीपणा व सामाजिक उपेक्षेखाली दबला जात असल्याचे वास्तव ही त्यांनी मांडले, असे डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर झटणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आज ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मंठा येथील सम्राट अशोक वाचनालय येथे 18 तास अभ्यासिका चे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यासिकात सात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.1
- जालना – मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स को-ऑप बँक लि., जालना यांच्या वतीने सर्व सभासद, ग्राहक व ठेवीदारांना एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. बँकेचे डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., डोंबिवली (पूर्व) मध्ये विलिनीकरण (मर्जर) होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विलिनीकरण प्रक्रियेनंतर बँकेत असलेल्या चालू, बचत तसेच सर्व प्रकारच्या मुदत ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहून त्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा भीती (पॅनिक) न बाळगता बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बँक प्रशासनाने सर्व ग्राहकांना शांतता व विश्वास ठेवण्याचे आवाहन करत, विलिनीकरण प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.1
- वाशी APMC मध्ये थरार! काही वेळात कामगारांनी वाचवला महिलेचा जीव नवी मुंबईतील APMC वाशी धान्य बाजारात एक थरारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली. काही सेकंद उशीर झाला असता, तर एका महिलेचा जीव गमावला गेला असता. दुपारच्या सुमारास एक महिला गोदामात स्वच्छतेचं काम करत होती. त्याच वेळी वर रचलेली जड धान्याची पोती अचानक कोसळली आणि क्षणातच ती महिला पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. हा प्रकार इतक्या झटक्यात घडला की आजूबाजूच्या लोकांना काही कळण्याआधीच सर्व काही घडलं. मात्र, महिलेचा आवाज ऐकताच तिथे काम करणाऱ्या कामगारांनी विलंब न करता धाव घेतली. त्यांनी तातडीने एक-एक पोतं हटवायला सुरुवात केली आणि अवघ्या काही क्षणांतच त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढलं. या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आला असून, कामगारांची चपळता आणि एकजूट स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या तत्परतेमुळेच मोठा अनर्थ टळला. महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने तिला किरकोळ दुखापत झाली आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना केवळ अपघाताची नसून, कठीण प्रसंगी माणुसकी आणि धाडस दाखवणाऱ्या खऱ्या हिरोंची जिवंत उदाहरण आहे. योग्य वेळी पुढे येणारे हातच एखाद्याचा जीव वाचवू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.1
- फक्त माता नर्मदेचं जल प्राशन करून गेली सहा वर्ष नामस्मरण करणारे परम पूज्य स्वामी दादा गुरु भगवान महाराज यांचे पाटोदा येथे भव्य मिरवणूक आणि सत्संग पार पडला. त्यांनी आपल्या जीवनामध्ये निसर्गावर अंत्यत प्रेम केल आहे. चरा चरा मध्ये भगवंत आहे, झाडा झुडपा मध्ये भगवंत आहे असे त्यांनी सांगितले. माता इंद्रायणीची झालेली अवस्था पाहून येणाऱ्या काळात इंद्रायणी निर्मळ करण्याचं काम करायचं आहे असं त्यांनी सांगितलं.1
- Post by Dhanjay surve Surve1
- जालन्यात कलावंतांचा गौरव; सय्यद सलाउद्दीन उर्फ अज़र यांच्या कार्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून कौतुक.! सय्यद सलाउद्दीन यांच्या अल्पसंख्याक पदाबाबत गोरंट्याल यांचे मोठे विधान,1