पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ ! पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलपूजनाने पंधरवड्याची सुरुवात • चित्ररथाद्वारे ग्रामीण भागात जलव्यवस्थापनाबाबत होणार जनजागृती लातूर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. सिंचन प्रकल्प, विहिरी आणि विंधन विहिरींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकामध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या माध्यमातून यासाठी प्रभावी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित या पंधरवड्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यावेळी लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रूपाली ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, लातूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, रोहित जगताप, मयूर महाजन, अमरसिंह पाटील आणि जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. शेती आणि उद्योगासह सर्वच क्षेत्रांत पाण्याचा वापर करताना जास्तीत जास्त बचतीवर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन जनजागृती करावी. तसेच, भूजल पातळी वाढवण्यासाठी विहिरी आणि विंधन विहिरींच्या पुनर्भरणाची मोहीम अधिक गतीने राबवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले. जलव्यवस्थापनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता रूपाली ठोंबरे यांनी पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला. जलसंपत्तीचे योग्य नियोजन करणे आणि लाभधारकांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे आणि जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलकलशांचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जल बचतीची शपथ देण्यात आली. त्यानंतर, जलव्यवस्थापन विषयक संदेश देणाऱ्या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. ****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ ! पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड • जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलपूजनाने पंधरवड्याची सुरुवात • चित्ररथाद्वारे ग्रामीण भागात जलव्यवस्थापनाबाबत होणार जनजागृती लातूर जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. सिंचन प्रकल्प, विहिरी आणि विंधन विहिरींच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा विनियोग योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकामध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या माध्यमातून यासाठी प्रभावी
प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. लातूर पाटबंधारे विभागामार्फत १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित या पंधरवड्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यावेळी लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तथा प्रशासक रूपाली ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, लातूर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, रोहित जगताप, मयूर महाजन, अमरसिंह पाटील आणि जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता
बाळासाहेब शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. शेती आणि उद्योगासह सर्वच क्षेत्रांत पाण्याचा वापर करताना जास्तीत जास्त बचतीवर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन जनजागृती करावी. तसेच, भूजल पातळी वाढवण्यासाठी विहिरी आणि विंधन विहिरींच्या पुनर्भरणाची मोहीम अधिक गतीने राबवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले. जलव्यवस्थापनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता रूपाली ठोंबरे
यांनी पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला. जलसंपत्तीचे योग्य नियोजन करणे आणि लाभधारकांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे आणि जिल्ह्यातील पाच नद्यांच्या जलकलशांचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जल बचतीची शपथ देण्यात आली. त्यानंतर, जलव्यवस्थापन विषयक संदेश देणाऱ्या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. ****
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.2
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- Post by TNMaharashtra News Channel1
- Post by Sanjhsuyog News Channel1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- Post by Ramesh Mulgir1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- Post by ईलियास नजीर शेख1