नवयुवक बौद्ध समाज, जोगना यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात नवयुवक बौद्ध समाज, जोगना यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात जोगना, ता. चामोर्शी: नवयुवक बौद्ध समाज, जोगना यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या सोहळ्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे* यांनी उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच, उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे व कार्याचे महत्त्व सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती देत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, नदीम नाथानी, सुधाकर वासेकर, संतोष गव्हारे, कुणाल ताजने, सिद्धार्थ मेश्राम, आदित्य वाळके, रवी मेश्राम,सुरेश फुलझेले, सह ग्रामस्थ उपस्थित होते.
नवयुवक बौद्ध समाज, जोगना यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात नवयुवक बौद्ध समाज, जोगना यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात जोगना, ता. चामोर्शी: नवयुवक बौद्ध समाज, जोगना यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या सोहळ्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे* यांनी उपस्थित राहून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच, उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे व कार्याचे महत्त्व सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती देत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष धानोरा प्रशांत कोराम, नदीम नाथानी, सुधाकर वासेकर, संतोष गव्हारे, कुणाल ताजने, सिद्धार्थ मेश्राम, आदित्य वाळके, रवी मेश्राम,सुरेश फुलझेले, सह ग्रामस्थ उपस्थित होते.
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- नागपूरच्या जिल्हा परिषद समोर रज्जु परिपगार आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार महाराष्ट्रातील 48 कर्मचारी सात महिन्यापासून मानधनापासून वंचित नागपुर न्यूज़ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला पण अधिकारी वर्ग ऐैकत नाही ! असा आरोप सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत लावला -रज्जु परिपगार महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागात, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील योजना ही 2017 पासून सुरू झाली. परंतु 6 सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय जीआर निघाला की, महिला बाल विकास विभाग योजनेत हस्तांतरण करण्यात आले. 1 एप्रिल 2025 पासून योजना अंमलात आली. 2017 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मनुष्यबळ मंजूर झालेले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यानुसार 2023 मध्ये मनुष्यबळ राहणार नाही असे सुद्धा नमूद केले होते. राज्य शासनाने गेल्या 7 महिन्यापासून पगारापासून वंचित ठेवले आहे म्हणून आरोग्य विभागाचे उदासीन धोरणामुळे मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, येथे दाद मागितली. माननीय उच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2025 च्या कोर्ट आदेशानुसार समायोजन करावे. आणि 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू ऐकून अधिकारी वर्गांना आदेश दिला व सांगितले. परंतु अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप रज्जु परिपगार यांनी पत्र परिषदेत लावला. जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हा सर्वांना 7 महिन्याचा पगार देणार नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करणार ! असे पत्रकारांना सांगितले. मा. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य सचिव समावेश समायोजन करावेत असे निर्देश दिले होते. त्यानंतर हैद्राबाद हाऊस सचिवालयात आशा पठाण यांना पत्र दिले. केंद्रीय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संदीप जोशी या सर्वांना यासंदर्भात माहिती दिली होती. परंतु आम्हाला न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव घ्यावी लागली. कारण आम्ही आमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करू, कसे जगू, यासाठी हक्काचा पगार आम्हाला मिळावा व कार्यादेश देण्यात यावा. त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनवणी करीत आहे की, आमचा सात महिन्याचा पगार देण्यात यावा व कार्यादेश द्यावा असे सांगितले. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सीटुचे अध्यक्ष राजेंद्र साठे आणि कॉस्ट्राईबचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे, रज्जू परिपगार, पौर्णिमा गजभिये, संगीता वासेवार, निता दांडेकर, निलेश अडुळकर, कैलास खांडेकर आणि प्रिती मेश्राम यांची उपस्थिती होती.1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1