डिंभे धरणातून १०,४३८ क्यूसेक विसर्ग; घोडनदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मंचर/घोडेगाव: मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडनदीला पुन्हा पूर आला असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्याने वाढ करण्यात आली. सुरुवातीला ३,८७० क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सकाळी ६,८०० क्युसेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता तो ८,५०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. दुपारी एक वाजता धरणातून तब्बल १० हजार ४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने घोडनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. प्रशासनाच्या माहितीनुसार, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी पाणी सोडावे लागू शकते. धरणात येणाऱ्या पाण्याचा आणि विसर्गाचा सातत्याने आढावा घेत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जुलैच्या सुरुवातीला आलेल्या पुरामुळे घोडनदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेती, नगदी पिके, शेतीपंप तसेच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले होते. यावेळी डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून गोहे खोऱ्यातून येणारे पाणीही घोडनदीत मिळत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरम्यान, चास गावच्या हद्दीत काही हौशी तरुण पुराच्या पाण्याजवळ जाऊन धोकादायक पद्धतीने सेल्फी काढताना दिसून आले. पूरग्रस्त नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखावे, कोणतीही जोखीम घेऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1