लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा तालुक्यात बेधडक कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला पकडून तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१० वाजता लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून (TS 12 UE 4190) गुटखा व सुगंधी तंबाखू नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत विविध लेबल असलेली सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाचे काचेचे डबे असा २८ लाख ९७ हजार ६० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल तसेच ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ५२०/२०२६, कलम १२३, २७५, २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा माल कोठून आणला आणि कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांनी केली.
लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा तालुक्यात बेधडक कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला पकडून तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१० वाजता लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून (TS 12 UE 4190) गुटखा व सुगंधी तंबाखू नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि.
हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत विविध लेबल असलेली सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाचे काचेचे डबे असा २८ लाख ९७ हजार ६० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल तसेच ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ५२०/२०२६, कलम १२३, २७५, २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा माल कोठून आणला आणि कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांनी केली.
- देशभरात NEET-UG आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केल्याची घोषणा केली. गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह विविध राज्यांमध्ये विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांकडून परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, पारदर्शकता आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र आंदोलने सुरू होती. या वाढत्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनाम्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, देशातील शांतता आणि परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच आपण शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी सातत्याने काम केले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या निर्णयानंतर देशभरातील अनेक आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर विरोधी पक्षांनी हा निर्णय जनतेच्या दबावाचा विजय असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढील कार्यभार कोणाकडे सोपवला जाणार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.1
- लातूर जिल्ह्यात अवैध धंदे आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औसा तालुक्यात बेधडक कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला पकडून तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१० वाजता लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे एका आयशर टेम्पोमधून (TS 12 UE 4190) गुटखा व सुगंधी तंबाखू नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. वाहनातील मालाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात बंदी घातलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. याप्रकरणी मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत विविध लेबल असलेली सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाचे काचेचे डबे असा २८ लाख ९७ हजार ६० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल तसेच ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ५२०/२०२६, कलम १२३, २७५, २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हा माल कोठून आणला आणि कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांनी केली.2
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील येळनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी पालखीची भव्य मिरवणूक काढली. टाळ, मृदंग आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल", "ज्ञानोबा-तुकाराम" अशा अखंड नामघोषात विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गांवरून प्रदक्षिणा घातली. पारंपरिक वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या पालखी सोहळ्यात शिक्षक, ग्रामस्थ, पालक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण गाव विठ्ठलमय झाले होते. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरेची ओळख, भारतीय संस्कृतीचे जतन आणि सामूहिक सहभागाची भावना दृढ होण्यास मदत झाली आहे. गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत शाळेच्या शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.1
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस आणि लोकनेत्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परळी तालुक्याच्या वतीने २२ ते २६ जुलै दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून २५/०७/२०२६ रोजी कन्हैया वारकरी शिक्षण संस्था, परळी वैजनाथ येथे वारकरी बांधवांना खिचडी वाटप करण्यात आले. या प्रसंगी आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या दिंडीत मान्यवरांनी सहभाग नोंदवत विठू नामाचा गजर केला. या कार्यक्रमाला परळी तालुका भाजपा अध्यक्ष राजेश गित्ते, कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह. भ. प. गोविंद महाराज मुंडे, भाजपा कोषाध्यक्ष भुराज बदने, भाजपा सचिव अनिल गुट्टे, कासारवाडीचे माजी सरपंच दशरथ (दादा) गुट्टे तसेच दैनिक परळी बातमीदारचे संपादक महादेव गित्ते यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. आयोजित या सर्व सामाजिक उपक्रमांचा समारोप 'आज एक पेड पंकजाताई के नाम...' या अभियानांतर्गत वृक्षारोपण करून होणार आहे.4
- लातूरमध्ये ५९ अनुसूचित जातींच्या (अ.ब.क.ड.) उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चामध्ये समस्त मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केले आहे. लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील शिवाजी महाराज चौकातील हॉटेल अंजनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेत भालेराव यांनी महामोर्च्याची भूमिका, उद्दिष्टे आणि समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. अनुसूचित ५९ जातींना न्याय्य प्रतिनिधित्व आणि घटनात्मक हक्क मिळावेत, या उद्देशाने हा महामोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटकांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून एकजुटीने या आंदोलनात सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महामोर्चाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधण्यात येणार असून, प्रशासनामार्फत शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे. या वेळी उपस्थितांनी समाजबांधवांना उपस्थित राहून महामोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेला समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.1
- दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे कॅन्डल मार्च आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा तीव्र विरोध दर्शवण्यासाठी अणदूर येथे या कॅन्डल मार्च व निषेध सभेचे आयोजन करून घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.1