धरणगावात अखंड नामजप यज्ञ सप्ताह उत्साहात संपन्न गुरुचरित्र पारायणात 300 सेवेकऱ्यांचा सहभाग धरणगाव प्रतिनिधी : येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दि. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सप्ताहभर गुरुचरित्र पारायण, दैनंदिन आरती, नित्य स्वाहाकार, औदुंबर प्रदक्षिणा व दर्शनसेवा अशा विविध धार्मिक उपक्रमांत 10 हजारांहून अधिक भाविकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या सप्ताह काळात अध्यात्मिक आणि समाजप्रबोधनाच्या विविध विषयांवर सेवेकऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. गर्भसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, कृषीशास्त्र, मराठी अस्मिता तसेच सेवा मार्गात कार्यरत असलेल्या 18 विभागांवर सविस्तर मार्गदर्शन झाले. सेवेकऱ्यांनी सेवेतून आलेले अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. सप्ताहकाळात 300 सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला. या दरम्यान गणेश याग, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, मल्हारी याग व रुद्र याग अशा विविध यागांचे आयोजन करण्यात आले. दिवस-रात्र अखंडपणे वीणा वादन, स्वामी चरित्र वाचन व स्वामी समर्थ माळजप प्रहर पद्धतीने करण्यात आले. *तीन दिवसीय युवा प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर* दत्तजयंती अखंड नामजप सप्ताहानिमित्त युवा वर्गासाठी तीन दिवसीय प्रबोधन व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये नाशिक विभाग आयकर आयुक्त श्री. विशाल मकवाने यांनी युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी त्यांनी जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व स्पष्ट करताना सकारात्मक विचार निर्णयक्षमता, वर्तन आणि करिअरवर कसा परिणाम करतात यावर प्रकाश टाकला. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, एकाग्रता वाढवण्याचे प्रभावी उपाय आणि नियोजनाचे तंत्र यांची माहिती दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शिबिरात मॅनिफेस्टेशन या संकल्पनेचे टप्पे, तत्त्वे आणि जीवनातील उपयोग यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मॅनिफेस्टेशन म्हणजे मन, ऊर्जा आणि विश्वास यांना एकवटून ध्येय प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया असून, योग्य विचार आणि कृती यांचा संपूर्ण समन्वय साधल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करताना मकवाने यांनी सांगितले की अध्यात्म हा जीवनाचा पाया आहे. अध्यात्माशिवाय संस्कार आणि मानसिक बळ जीवनात टिकून राहत नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले. या तीन दिवसीय शिबिराला शहर आणि परिसरातील शेकडो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सर्व सेवेकरी परिवारांनी मोलाचे योगदान दिले.

- नांदेड मध्ये सक्षम ताटे हत्याकांड सी सी टीव्ही फुटेज पुराव्यासह2
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- निवडणूक संपताच दुसऱ्या दिवशी भावी नगरसेवक लागले कामाला...1
- 🚨 नांदेड अपडेट | अवैध रेतीघाटावर मोठी कारवाई! नांदेड लिंबगाव परिसरातील अवैध रेतीघाटावर पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. जिलेटीनच्या साहाय्याने रेती उपसा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य ब्लास्ट करून नष्ट करण्यात आले. अवैध रेती उपसावर अंकुश आणण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. 📌 कायदेशीर कारवाई पुढे सुरू… #Nanded #NandedNews #Limbgaon #PoliceAction #MahsulVibhag #IllegalSandMining #RetiGhat #NandedUpdates #BreakingNews #MaharashtraNews #LawAndOrder #AntiSandMafia #SandMiningRaid https://www.instagram.com/reel/DR48WIyEoFz/?igsh=cmhnb256aGVnczA51
- टीईटी सक्तीविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा1
- *💥 लहुजी शक्ती सेनेचे विष्णू भाऊ कसबे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा* *💥 धामणगांव रेल्वे ,जुना धामणगांव ,शहापूर ,व अंजनसिंगी ,चांदुर रेल्वे येथे समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात पदयात्रेचे केले स्वागत* *💥 मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अनुसूचित जाती वर्गीकरण अ ब क ड ला तत्काळ लागू करावे च्या मागणी करिता* *💥 १२ डिसेंबरला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांचे समाजाला आवाहन* *✍️ बघा सिटी न्यूज बुलेटीन प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे 7350846789 WhatsApp 8421078244*1
- Post by Kiran Mali1
- भोयेगांव ता. चांदवड येथील किरण केदारे याने ॲक्रॉलिक कलरमध्ये बाबासाहेबांची प्रतिकृती साकारून महामानवास केलं अनोखं अभिवादन2
- 🐆 बिबट्या झाला हुशार…! वनविभागाचे ट्रॅप पिंजरेही फसले नांदेड जिल्ह्यातील नायगाव परिसरात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिक चिंतेत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वनविभागाने लावलेल्या ट्रॅप पिंजऱ्याला बिबट्याने जवळ जाऊन बारकाईने पाहणी केली आणि पिंजऱ्यात न जाता सरळ मागे वळून जंगलात परत निघून गेला. यामुळे “बिबट्या झाला सुपर स्मार्ट!” अशी चर्चा नेटिझन्स मध्ये रंगली आहे. जरी हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याची खात्री नसली, तरी मागील काही दिवसांपासून नायगाव परिसरातील बिबट्याच्या दहशतीने नागरिकांची झोप उडाली आहे, हे मात्र खरे. #Nanded #Naigaon #Leopard #LeopardAlert #Wildlife #ForestDepartment #TrapCage #ViralVideo #NandedNews #MaharashtraNews #LeopardSighting #SocialMediaBuzz #WildlifeUpdate #ForestRaid #BeAlert https://www.instagram.com/reel/DR5GXBMko1_/?igsh=c2ZmZDY1cGVrbWpo1