खाशाबा चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर न्यायालयीन आयोगाचा अर्ज दाखल खाशाबा चित्रपटाच्या स्थगिती सुनावणीत चित्रपट जूनपर्यंत प्रदर्शित करीत नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयीन आयोगाची नियुक्ती करून निर्णय घेण्यात यावा असा अर्ज पुणे सत्र व दिवाणी न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे जिओ स्टुडियो व आटपाट प्रोडक्शनच्या खाशाबा चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. राजा शिवाजी चित्रपटाच्या सुरूवातीला खाशाबा चित्रपटाचे ट्रिझर महाराष्ट्रात दिसत आहे. न्यायालयात दावा सुरू असतानाही खाशाबा चित्रपटाचा ट्रिझर प्रर्दशित केल्याने चित्रपट स्थगितीच्या अर्जावर तातडीचे सुनावणी घेण्यात आली. डिसेंबर 2024 पासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांचा कॉफीराईटबाबतचा दावा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन यांच्याविरूध्द सुरू आहे. दाव्याच्या तातडीच्या सुनावणीत खाशाबा चित्रपट हा लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे तब्बल 16 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी जूनपर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे नागराज मंजुळे यांचे वकील ॲड. रामकृष्ण कुलकर्णीं यांनी तोंडी जबाबात सांगितल्यानंतर संजय दुधाणे यांचे वकील ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयीन आयोगाची मागणी करणरा अर्ज दाखल केला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आयोगाने चित्रपट पाहावा आणि संजय दुधाणे यांचे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकाचे वाचन करून निर्णय घेण्यात याचा असा अर्ज ॲड. सुवर्णा शिंदे सादर केला. न्यायाधिश अग्रवाल यांनी हा अर्ज मान्य केला असून आता स्थगिती व न्यायालयीन आयोगाची नियुक्ती अर्जावर 9 जून रोजी सुनावणी होणार आहे. जिओ स्टुडियो व ज्योती देशपांडे यांच्याकडून ॲड. प्रियांका चौधरी यांनी बाजू मांडली. स्थगिती अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तीवाद ॲड. चौधरी यांनी केला. स्थगिती सुनावणीचे उत्तर वादी दुधाणे यांना जिओ स्टुडियो कडून वेळेत न मिळाल्याने यावर न्यायालयाने पुढील तारखेला सुनावणीत होईल असे उत्तर दिले. कथेबाबत तब्बल 14 पुरावे सादर खाशाबा चित्रपट हा संजय दुधाणे यांच्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकावर आधारित असल्याचे तब्बल 14 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 5 पुरावे चित्रपटाच्या ट्रिझरवरून, 4 पुरावे नागराज मंजुळे यांनी केलेल्या 5 कोटीचा अब्रुनुकसान दाव्यात तर 6 पुरावे हे रणजीत जाधव यांच्याशी करार चित्रपटाच्या संदर्भात आहेत. हे सर्व पुरावे ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयात दाखल केले आहे. नवे 4 पुरावे जिओकडून प्राप्त झालेल्या स्थगिती सुनीवणीच्या उत्तरात सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटीचा अब्रुनुकसान दावा दाखल केला असून या दाव्यातील शपथपत्रातच कथा ही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे मंजुळे यांनी जोडले आहेत. मंजुळे यांच्या दाव्यातच खाशाबा चित्रपट हा सोशल मिडियाच्या माहिती आधारे चित्रपट निर्माण करीत असल्याचे मंजुळे यांनी शपथपत्र दिले आहे. या शपथपत्रातील पान. क्रं. 215 व 215 वर दुधाणे यांच्या नावाचा कथालेखक म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. याशिवाय मंजुळे यांनी जोडलेले तब्बल 4 संदर्भ हे दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारीत आहेत.

- पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे कामाला वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे : १) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के) २) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के) ३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के) या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे. मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.1
- 19 वर्ष पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बनवल्याबद्दल जीवन निरगुडे यांचा केला सत्कार पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनचे सदस्य दत्ताभाऊ बुलबुले यांचे मावस भाऊ जीवन निरगुडे यांना त्यांच्या १९ वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित भैया शिंदे आणि संपूर्ण सदस्यांतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा!1
- आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.4
- दैनिक जनप्रवासचे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळला आहे. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, पिस्तूल, काडतुसे व चाकू जप्त करण्यात आले आहेत.1
- कोवाड (चंदगड) येथे पालकांच्या मागणीनुसार 'निओगोवा अँग्लो स्कूल' ही नवीन इंग्लिश मीडियम शाळा सुरू होत आहे. गोव्यामध्ये यशस्वीरित्या शाळा चालवणारे संजीव पाटील यांनी ही घोषणा केली असून, प्रवेश सुरू होण्याआधीच ६०-७० पालकांनी मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे चंदगड तालुक्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार आहे.1
- सांगली शहरात दैनिक 'जनप्रवास'चे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा मोठा कट पोलिसांनी उधळला. पोलिसांनी दोन देशी पिस्तुलं, चार काडतुसे आणि चाकू जप्त करत तिघांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून रचलेल्या या कटातील आरोपींना ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.2
- मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.1