logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुर्णा-ताडकळस मार्गावर स्विफ्ट डिझायर कार उलटली; चार तरुण गंभीर जखमी पुर्णा-ताडकळस मार्गावर स्विफ्ट डिझायर कार उलटली; चार तरुण गंभीर जखमी पुर्णा-ताडकळस मार्गावर हटकरवाडी शिवारात भरधाव अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात होऊन चार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री सुमारे १०.३० वाजता घडली. या प्रकरणी पुर्णा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या अपघातात श्रीनिवास केदार पाथरकर, अनिकेत अविनाश कदम, मो. गौस आणि कुणाल अनिल डिकोंडवार (सर्व रा. पुर्णा) हे गंभीर जखमी झाले आहेत. केदार मल्लिकार्जुन अप्पा पाथरकर हे आपल्या मुलगा श्रीनिवास व त्याच्या मित्रांसह (एमएच २९ बीसी ५८९४) क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने ताडकळसहून पुर्णेकडे येत होते. दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने अचानक कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकवरील तीव्र पांढऱ्या एलईडी लाईटमुळे समोरचे स्पष्ट दिसेनासे झाले. प्रसंगावधान राखत गाडी थांबवण्याचा प्रयत्न करूनही कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात चालक सुरक्षित राहिला असला तरी इतर चार जणांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापती झाल्या. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनाबाहेर काढले व त्यांना पुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कारचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

2 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago
3e8e9a0c-3798-486f-a871-00da42699621

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    1
    पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली !
आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    1
    परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.
    1
    महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले.
न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Anil Rathod
    1
    Post by Anil Rathod
    user_Anil Rathod
    Anil Rathod
    माजलगाव, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी
समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.