मोजाबंदी स्मशानभूमी मोजणी प्रकरण तापले; तांत्रिक गैरप्रकाराच्या आरोपांनी प्रशासनासमोर नवे प्रश्न तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रकरण रिसोड तालुक्यातील मोजाबंदी येथील समोर आले असून, स्मशानभूमीच्या जागेच्या अधिकृत डिजिटल मोजणीमध्ये तांत्रिक गैरप्रकार झाल्याचा आरोप अर्जदार व ग्रामस्थांनी केला आहे. डिजिटल मोजणी शिटवरील कोऑर्डिनेटनुसार हद्द निश्चित करण्याऐवजी त्यात फेरफार अथवा वेगळ्या पद्धतीने हद्द दर्शविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ पुरावा समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाबाबत खळबळ उडाली आहे. २० मार्च रोजी पहिली मोजणी संबंधित स्मशानभूमीच्या जागेची पहिली मोजणी २० मार्च २०२६ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर ६ एप्रिल २०२६ रोजी हद्दीच्या खुणा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप अर्जदार संतोष काळे व इतर ग्रामस्थांनी केला. याबाबत त्यांनी तत्काळ हरकत नोंदवून संबंधित भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडे दाद मागितली.हरकतीनंतर विशेष पथकाची मोका तपासणी अर्जदारांच्या हरकतीची दखल घेत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून २९ एप्रिल २०२६ रोजी तीन भूमापकांचे विशेष पथक मोका तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पथकाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी संबंधित भूमापकाला पत्र देऊन मोजणी काम आणि दुरुस्तीच्या कामामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच २५ जून २०२६ पर्यंत हद्दीच्या खुणा देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. १५ जुलैची नोटीस; मात्र कर्मचारी मोक्यावर पोहोचलेच नाहीत? यानंतर दुरुस्ती मोजणीतील हद्दीच्या खुणा निश्चित करण्यासाठी १५ जुलै २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली. संबंधित सर्व पक्षांना त्याबाबत कळविण्यात आले होते. अर्जदार पोलिस बंदोबस्तासह मोक्यावर उपस्थित राहिले; मात्र त्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयातील कोणताही कर्मचारी मोक्यावर आला नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. या प्रकारानंतर अर्जदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपसंचालक भूमी अभिलेख, अमरावती यांच्याकडे तक्रार केली. वरिष्ठ पातळीवरून कोऑर्डिनेटनुसार पडताळणीचे निर्देश तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवरून संबंधित मोजणी नकाशा व शिटवर दर्शविण्यात आलेल्या कोऑर्डिनेटनुसार प्रत्यक्ष हद्द दर्शविण्यात आली आहे किंवा नाही, याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, याच काळात डिजिटल मोजणी शिटमधील तांत्रिक माहिती बाजूला ठेवून हद्द निश्चित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिरस्तेदाराने डिजिटल मोजणी शिटवरील माहिती डावलून तांत्रिक पद्धतीत अनियमितता केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.डिजिटल मोजणी शिट’चा आधार नेमका घेतला का? स्मशानभूमीची जागा ही सार्वजनिक उपयोगाची असल्याने तिच्या हद्दीबाबत कोणतीही संदिग्धता राहू नये, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. अधिकृत डिजिटल मोजणीमध्ये नोंदविलेल्या कोऑर्डिनेटच्या आधारेच हद्द निश्चित केली जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मोजणी प्रक्रियेत त्याचे पालन झाले का, हा मुख्य प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जिल्हा तांत्रिक पथकाकडून ‘सुपर मोजणी’ची मागणी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तांत्रिक पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील तांत्रिक पथकामार्फत सुपर मोजणी करण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्मशानभूमीची जागा सुरक्षित ठेवून तिच्या वास्तविक हद्दी निश्चित कराव्यात, तसेच यापूर्वी झालेल्या मोजणीतील त्रुटींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित शिरस्तेदार व भूमापकांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तांत्रिक गैरप्रकार अथवा जाणीवपूर्वक नियमबाह्य कृती आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि स्मशानभूमीची जागा कायमस्वरूपी सुरक्षित करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित भूमी अभिलेख अधिकारी, शिरस्तेदार व भूमापकांची अधिकृत बाजू समोर आलेली नसून, त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
मोजाबंदी स्मशानभूमी मोजणी प्रकरण तापले; तांत्रिक गैरप्रकाराच्या आरोपांनी प्रशासनासमोर नवे प्रश्न तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रकरण रिसोड तालुक्यातील मोजाबंदी येथील समोर आले असून, स्मशानभूमीच्या जागेच्या अधिकृत डिजिटल मोजणीमध्ये तांत्रिक गैरप्रकार झाल्याचा आरोप अर्जदार व ग्रामस्थांनी केला आहे. डिजिटल मोजणी शिटवरील कोऑर्डिनेटनुसार हद्द निश्चित करण्याऐवजी त्यात फेरफार अथवा वेगळ्या पद्धतीने हद्द दर्शविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ पुरावा समोर आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाबाबत खळबळ उडाली आहे. २० मार्च रोजी पहिली मोजणी संबंधित स्मशानभूमीच्या जागेची पहिली मोजणी २० मार्च २०२६ रोजी करण्यात आली होती. त्यानंतर ६ एप्रिल २०२६ रोजी हद्दीच्या खुणा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप अर्जदार संतोष काळे व इतर ग्रामस्थांनी केला. याबाबत त्यांनी तत्काळ हरकत नोंदवून संबंधित भूमी अभिलेख अधिकाऱ्यांकडे दाद मागितली.हरकतीनंतर विशेष पथकाची मोका तपासणी अर्जदारांच्या हरकतीची दखल घेत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून २९ एप्रिल २०२६ रोजी तीन भूमापकांचे विशेष पथक मोका तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पथकाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानंतर उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी संबंधित भूमापकाला पत्र देऊन मोजणी काम आणि दुरुस्तीच्या कामामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच २५ जून २०२६ पर्यंत हद्दीच्या खुणा देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात नमूद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. १५ जुलैची नोटीस; मात्र कर्मचारी मोक्यावर पोहोचलेच नाहीत? यानंतर दुरुस्ती मोजणीतील हद्दीच्या खुणा निश्चित करण्यासाठी १५ जुलै २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली. संबंधित सर्व पक्षांना त्याबाबत कळविण्यात आले होते. अर्जदार पोलिस बंदोबस्तासह मोक्यावर उपस्थित राहिले; मात्र त्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयातील कोणताही कर्मचारी मोक्यावर आला नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. या प्रकारानंतर अर्जदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच उपसंचालक भूमी अभिलेख, अमरावती यांच्याकडे तक्रार केली. वरिष्ठ पातळीवरून कोऑर्डिनेटनुसार पडताळणीचे निर्देश तक्रारीनंतर वरिष्ठ पातळीवरून संबंधित मोजणी नकाशा व शिटवर दर्शविण्यात आलेल्या कोऑर्डिनेटनुसार प्रत्यक्ष हद्द दर्शविण्यात आली आहे किंवा नाही, याची पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, याच काळात डिजिटल मोजणी शिटमधील तांत्रिक माहिती बाजूला ठेवून हद्द निश्चित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिरस्तेदाराने डिजिटल मोजणी शिटवरील माहिती डावलून तांत्रिक पद्धतीत अनियमितता केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.डिजिटल मोजणी शिट’चा आधार नेमका घेतला का? स्मशानभूमीची जागा ही सार्वजनिक उपयोगाची असल्याने तिच्या हद्दीबाबत कोणतीही संदिग्धता राहू नये, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. अधिकृत डिजिटल मोजणीमध्ये नोंदविलेल्या कोऑर्डिनेटच्या आधारेच हद्द निश्चित केली जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मोजणी प्रक्रियेत त्याचे पालन झाले का, हा मुख्य प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जिल्हा तांत्रिक पथकाकडून ‘सुपर मोजणी’ची मागणी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तांत्रिक पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील तांत्रिक पथकामार्फत सुपर मोजणी करण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. स्मशानभूमीची जागा सुरक्षित ठेवून तिच्या वास्तविक हद्दी निश्चित कराव्यात, तसेच यापूर्वी झालेल्या मोजणीतील त्रुटींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित शिरस्तेदार व भूमापकांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तांत्रिक गैरप्रकार अथवा जाणीवपूर्वक नियमबाह्य कृती आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि स्मशानभूमीची जागा कायमस्वरूपी सुरक्षित करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित भूमी अभिलेख अधिकारी, शिरस्तेदार व भूमापकांची अधिकृत बाजू समोर आलेली नसून, त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च1
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.3
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1