logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पेट्रोल पंपनजीकच्या घराला आग;अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला येथील रेल्वे स्थानकानजिक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील निरंजन पेट्रोल पंपाला लागून असलेल्या मनकोडी मॅन्शन या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने काही काळ परिसरात प्रचंड घबराट आणि खळबळ उडाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली असून आगीवर यशस्‍वीपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मनकोडी मॅन्शन सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर पंढरीनाथ भोसले यांचा फ्लॅट आहे. भोसले यांची प्रकृती ठीक नसल्याने हनुमंत सानप हे त्यांना भेटण्यासाठी आले होते. याच वेळी घरातील एक मुलगी किचनशेजारील खोलीत टीव्ही पाहत होती. दरम्यान, अचानक काहीतरी जळत असल्याचा तीव्र वास आल्याने तिने तातडीने आजोबांना याची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सानप यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तत्पूर्वी, जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनीही अग्निशामक उपकरणांच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. सोसायटीची जागा अत्यंत दाट आणि अरुंद असल्याने अग्निशमन दलाचे वाहन थेट इमारतीपर्यंत पोहोचवणे कठीण जात होते. शिवाय बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने धोक्याची घंटा अधिक तीव्र होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता तिसऱ्या मजल्याकडे धाव घेतली. दोरीच्या साह्याने पाण्याचे पाईप थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचवण्यात आले. घरात प्रचंड धूर आणि काळोख पसरला होता. जवानांनी खिडक्यांच्या काचा फोडून धूर बाहेर जाण्यासाठी मार्ग करून दिला आणि प्राणाची पर्वा न करता पाण्याचा मारा सुरू ठेवला. अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. वॉटर प्युरिफायरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आग लागली तेव्हा घरातील नागरिक वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. ही कामगिरी लिडिंग फायरमन श्रीकांत नागपुरे, फकिरा भालेराव, प्रणय सुखदान, यश व्यवहारे, युवराज पाटोळे, अभिषेक शिंदे आणि सूरज हिरे या जवानांच्या पथकाने फत्ते केली. पेट्रोल पंपाच्या अत्यंत जवळ असलेली ही आग वेळेत विझल्याने संपूर्ण परिसराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

2 hrs ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
33f622bd-f036-4b63-85ea-a26ec48edd6a

पेट्रोल पंपनजीकच्या घराला आग;अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला येथील रेल्वे स्थानकानजिक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील निरंजन पेट्रोल पंपाला लागून असलेल्या मनकोडी मॅन्शन या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने काही काळ परिसरात प्रचंड घबराट आणि खळबळ उडाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली असून आगीवर यशस्‍वीपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मनकोडी मॅन्शन सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर पंढरीनाथ भोसले यांचा फ्लॅट आहे. भोसले यांची प्रकृती ठीक नसल्याने हनुमंत सानप हे त्यांना भेटण्यासाठी आले होते. याच वेळी घरातील एक मुलगी किचनशेजारील खोलीत टीव्ही पाहत होती. दरम्यान, अचानक काहीतरी जळत असल्याचा तीव्र वास आल्याने तिने तातडीने आजोबांना याची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सानप यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तत्पूर्वी, जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनीही अग्निशामक उपकरणांच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. सोसायटीची जागा अत्यंत दाट आणि अरुंद असल्याने अग्निशमन दलाचे वाहन थेट इमारतीपर्यंत पोहोचवणे कठीण जात होते. शिवाय बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने धोक्याची घंटा अधिक तीव्र होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता तिसऱ्या मजल्याकडे धाव घेतली. दोरीच्या साह्याने पाण्याचे पाईप थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचवण्यात आले. घरात प्रचंड धूर आणि काळोख पसरला होता. जवानांनी खिडक्यांच्या काचा फोडून धूर बाहेर जाण्यासाठी मार्ग करून दिला आणि प्राणाची पर्वा न करता पाण्याचा मारा सुरू ठेवला. अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. वॉटर प्युरिफायरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आग लागली तेव्हा घरातील नागरिक वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. ही कामगिरी लिडिंग फायरमन श्रीकांत नागपुरे, फकिरा भालेराव, प्रणय सुखदान, यश व्यवहारे, युवराज पाटोळे, अभिषेक शिंदे आणि सूरज हिरे या जवानांच्या पथकाने फत्ते केली. पेट्रोल पंपाच्या अत्यंत जवळ असलेली ही आग वेळेत विझल्याने संपूर्ण परिसराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रतिनिधी समाधान शिरसाठ मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
    2
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी समाधान शिरसाठ 
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. 
नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये  ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य 
डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.
    user_PRASIDHI PRAMUKH NEWS
    PRASIDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. ​ याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली. मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. ​ शेतकर्‍यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. ​आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले ​"गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे." ​शेतकऱ्यांची मुख्य मागणी ​• सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. • स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. • कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.
    3
    लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर
नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. 
​ याबाबत सविस्तर वृत्त असे की  प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली.  मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
​ शेतकर्‍यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. 
​आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले
​"गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे."
​शेतकऱ्यांची मुख्य मागणी
​• सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. 
• स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. 
• कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    2
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    1
    शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --
    1
    आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा

सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा
सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--
--
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    2
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते  चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें। गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
    1
    बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है।
इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें।
S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है।
इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें।
S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.