स्वारातीम’ विद्यापीठाच्या वार्षिक अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी! रु. ४२ कोटी १८ लक्ष तुटीचा अर्थसंकल्प सादर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत एकमताने दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. अधिसभा सदस्य अशोक गुजराथी यांनी एकूण रुपये ३१४ कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेसमोर सादर. ९ मार्च रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये सादर केला आहे. ४२ कोटी १८ लाख रुपयांच्या या तुटीचा अर्थसंकल्पास काही दुरुस्तीसह अधिसभेने मंजूर केला आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्र-कुलगरू डॉ.अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. माधव गव्हाणे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.पराग खडके, डॉ.चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, उपकेंद्राचे संचालक डॉ. संभाजी माने, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, आजीवन शिक्षण आणि विस्तार मंडळाचे संचालक डॉ. वैजनाथ अनमुलवाड, यासह अधिसभा सदस्य डॉ.दीपक बच्चेवार, डॉ.अशोक गवते, डॉ.दिलीप मुगळे, डॉ.संजय वाघमारे, डॉ.आशा मुंडे, धनराज जोशी, रामेश्वर पवार, डॉ.ए. टी. शिंदे, डॉ.विजय भोपाळे, डॉ.विष्णू पवार, डॉ.दिलीप पाईकराव, डॉ.अशोक टिपरसे, डॉ.एम. ए. बेंबडे, डॉ.वर्षा डोडीया, डॉ.बाबासाहेब सुरवसे, डॉ.दिलीपकुमार बोईनवाड, डॉ.शालिनी कदम, युवराज पाटील, डॉ.महेश मगर, अजय गायकवाड, गजानन आसोलेकर, शितल सोनटक्के, राजगोपाल कलानी, सिद्धेश्वर कासनाळे, दीपक मोरताळे, प्रमोद देशमुख, डॉ.सुभाष विखे, शिवाजी चांदणे आणि रंगनाथ शेळके आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कल्याण, कौशल्य विकास, संशोधनाला चालना आणि पायाभूत सुविधा विकास या प्रमुख बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच विद्यापीठ परिसराच्या आधुनिकीकरणासाठी विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा उभारणीसाठी तब्बल ९ कोटी ११ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही सर्वात मोठी तरतूद ठरली आहे. याशिवाय नवीन विद्यार्थी भवनासाठी १ कोटी रुपये, कमवा व शिका योजनेसाठी २० लक्ष, सॉफ्ट स्किल व व्यक्तिमत्व विकासासाठी २५ लक्ष, तर स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासासाठी २८ लक्ष रुपये देण्यात आले आहेत. कुलगुरू सहाय्यता निधी व विद्यार्थिनी दत्तक योजनेसाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षासाठी ५ लाख रुपये, विद्यार्थी कल्याण व पुरस्कार योजनेकरिता १० लक्ष, विद्यार्थी विकास विभागांतर्गत पारितोषिक योजेनेकरिता २.५ लक्ष, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडू पारितोषिकांसाठी रु.२० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय स्त्री अध्ययन केंद्रासाठी ९.५० लक्ष रुपये, महिला जागृती कार्यशाळांसाठी ५ लक्ष रुपये तसेच कर्मचारी प्रशिक्षण व कल्याणासाठी ३० लक्ष रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. कर्मचारी प्रशिक्षण व कल्याणासाठी ३० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या दीर्घकालीन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृह आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी २ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठातील संशोधन कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन प्रोत्साहन योजनेसाठी १५ लक्ष रुपये देण्यात आले आहेत. महाविद्यालये व विभागांमध्ये चर्चासत्रे आणि परिषदांसाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षक व संशोधकांच्या संशोधन प्रकल्पांसाठी महाविद्यालय स्तरावर ७५ लक्ष आणि संकुल स्तरावर ३० लक्ष रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागासाठी ३० लक्ष रुपये, तर महाविद्यालय गुणवत्ता वृद्धीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी परिषदा व संशोधन पेपर सादरीकरणासाठी रु.१५ लक्ष यासह प्रत्येक संकुलाकरिता परिषदा, कार्यशाळा चर्चासत्रे आयोजन करण्याकरिता किमान प्रत्येक संकुलाकरिता रु.३ लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या विस्तार आणि सुविधा वाढीसाठीही अर्थसंकल्पात भरीव निधी देण्यात आला आहे. परभणी उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी रुपये, लातूर उपकेंद्राच्या वसतिगृह बांधकामासाठी ५ कोटी रुपये, तर हिंगोली न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये रस्ते व कंपाउंड बांधणीसाठी ४५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीसाठी ५० लक्ष रुपये, तर परिसर हरितीकरणासाठी उद्यान विभागाला ८८.५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विविध उपकेंद्रांच्या कार्यक्षमतेसाठी आवर्ती व अनावर्ती खर्चासाठीही निधी देण्यात आला आहे. लातूर उपकेंद्राला ३०४ लक्ष आवर्ती व १६९ लक्ष अनावर्ती, हिंगोली मॉडेल कॉलेजला १५४ लक्ष आवर्ती व ६० लक्ष अनावर्ती, परभणी उपकेंद्राला ७४ लक्ष आवर्ती व ४६ लक्ष अनावर्ती, तर किनवट संशोधन केंद्राला ५५ लक्ष आवर्ती व ४३ लक्ष अनावर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले की, “हा अर्थसंकल्प विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. तुटीचा असला तरी तो पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, संशोधन, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थी हिताच्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचा विस्तार करणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच येणाऱ्या एनआरआयएफ रँकिंगमध्ये स्थान मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहे.” ----------------------------

- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.1
- Post by Info news1
- अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.1
- Post by Nanded_71