समाधान शिबिर लोकांच्या कल्याणनासाठी आणि विकासासाठी आहेत - ना. पाटील समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील लातूर (प्रतिनिधी) समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एका छताखाली उपलब्ध होत असून यामुळे सर्वसामान्य जनतेचे वेळेची बचत व आर्थिक बचत असल्याचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अहमदपूर येथे संत सावतामाळी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे होत्या. लातूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, लातूर जिल्हा परिषद सभापती उत्तम माने, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगारकर, चाकूरचे तहसिलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, अहमदपूर पंचायत समिती सभापती सुरज पाटील, अहमदपूरच्या उपसभापती अयोध्या केंद्रे, चाकूरचे उपसभापती चाकूर भुजंगराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे, प्रतीक्षा गुट्टे, अश्विन नागराळे, रंजना चाटे, उषाताई सोनकांबळे, भानुदास पोटे, अहमदपूरचे उपनगराध्यक्ष अय्याज शेख, प्रदीप खोमणे, नगरपंचायत चाकूर नगराध्यक्ष भागवत फुले, भागवत गुट्टे, पंचायत समिती सदस्य सुधीर गुट्टे, रविंद्र बोडके, गजानन होनराव, संतोष कलवले, तानाजी राजे, मधुकर मुंढे आदी उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा माहिती व लाभ सुलभ पद्धतीने मिळत आहे. शासन व प्रशासनाच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आगामी काळातही विविध लोकाभिमुख योजना राबवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सहकार मंत्री पाटील म्हणाले. राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. कर्जमुक्तीच्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी केले. यामध्ये त्यांनी महसूल विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांची माहिती दिली. तसेच सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात महसूल विभागासह विविध विभागातील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप सहकार मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी अविनाश पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागासह अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. यावेळी विविध स्टॉल उभारण्यात आले होते. या सर्व स्टॉलची पाहणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व इतर सर्व अधिकाऱ्यांनी केली. या समाधान शिबिरास अहमदपूर व चाकूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- भारतीय शेतकरी कामगार पक्ष 79व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा2
- नांदेडमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; हायवा, कारसह ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल नांदेड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४९ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, हायवा चालक, मालक आणि पोलिसांचे लोकेशन देऊन मदत करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलैच्या रात्री बेकायदेशीर वाळूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी बारड चौकात नाकाबंदी केली. यादरम्यान संशयास्पद हायवा टेम्पोला रोखून पाहणी केली असता, त्यात ५ ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती. अधिक तपासात हायवाचा मालक संतोष ढगे असल्याचे समोर आले. त्याचवेळी घटनास्थळी सापडलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधून पद्माकर ढगे हा मोबाईलवरून पोलिसांच्या हालचालींचे लोकेशन हायवा चालकाला देऊन या बेकायदेशीर वाहतुकीत मदत करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ४० लाखांचा हायवा, २५ हजारांची वाळू, ८ लाखांची कार आणि दोन महागडे मोबाईल असा एकूण ४९ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1