विश्व जागृती मिशनच्या वतीने आयोजीत सनातन भक्ती सत्संग मंडपाचे भूमिपूजन खामगाव : विश्व जागृती मिशन खामगाव यांच्या वतीने २३ फेब्रुवारी २६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान येथे प.पू. आचार्य श्री सुधांशुजी महाराज यांच्या अमृतवाणीतुन सनातन भक्ती सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे. त्या अनुषंगाने आचार्य शिवदत्तजी महाराज यांनी वैदीक मंत्रोच्चाराने सत्संग मंडपाचे भूमिपूजन केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्षा यांनी कार्यक्रमाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला उद्योजक अमित गोयनका, आचार्य अभिषेक तिवारी, कार्यकारी अध्यक्ष लिखारे, वानखडे नागपुर, मंत्री, बाबुलाल चुडीवाले, राजेश झापडे तसेच मिशनचे पदाधिकारी व गुरुबंधु उपस्थित होते. आरती, पूजन व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राजेश झापर्डे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून सत्संग कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन केले.
विश्व जागृती मिशनच्या वतीने आयोजीत सनातन भक्ती सत्संग मंडपाचे भूमिपूजन खामगाव : विश्व जागृती मिशन खामगाव यांच्या वतीने २३ फेब्रुवारी २६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प. मैदान येथे प.पू. आचार्य श्री सुधांशुजी महाराज यांच्या अमृतवाणीतुन सनातन भक्ती सत्संगाचा कार्यक्रम होणार
आहे. त्या अनुषंगाने आचार्य शिवदत्तजी महाराज यांनी वैदीक मंत्रोच्चाराने सत्संग मंडपाचे भूमिपूजन केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्षा यांनी कार्यक्रमाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला उद्योजक अमित गोयनका, आचार्य अभिषेक तिवारी, कार्यकारी अध्यक्ष
लिखारे, वानखडे नागपुर, मंत्री, बाबुलाल चुडीवाले, राजेश झापडे तसेच मिशनचे पदाधिकारी व गुरुबंधु उपस्थित होते. आरती, पूजन व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राजेश झापर्डे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून सत्संग कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचे आवाहन केले.
- खामगाव : उच्च शिक्षणात सामाजिक न्याय, आरक्षण आणि शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार खामगाव येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत भीम आर्मीच्या वतीने मा. राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच (USG)कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.याप्रसंगी बोलताना भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे म्हणाले की, "शिक्षणातील सामाजिक न्याय अबाधित राहावा आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या हक्कांवर कोणताही आघात होऊ नये, यासाठी भीम आर्मी कटिबद्ध आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि आरक्षणाच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे." या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष शैलेश वाकोडे, जिल्हा महासचिव अतुल इंगळे, जिल्हा नेते रोशन सरदार, बंटी गव्हांदे. खामगाव तालुकाध्यक्ष मंगेश वाकोडे, मलकापूर तालुकाध्यक्ष विलास तायडे, नांदुराचे अंकुश वाकोडे, जळगाव जामोदचे संगम तायडे, शेगावचे अजय शिरसाट, खामगाव शहराध्यक्ष विवेक गवई,अनंता इंगळे, अमरदीप दाभाडे, सुनील इंगळे, अशोक सुरडकर, ऋषी निंबोळकार, स्वप्निल भोजने, आकाश इखारे, योगेश इंगळे, जोगेंद्र हिवराळे, सोनू सोनवणे, योगेश निंबाळकर, आकाश वाकोडे, डी.के, अशोक इंगळे, पंकज दादा, अक्षय जोगदंड, गोलू हिवराळे, आकाश बोरुडे आणि प्रसिद्धी प्रमुख सय्यद रफिक. हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला4
- खामगाव: हमीद चौक परिसरात दोन गटात राडा; पोलीस प्रशासन सतर्क! #Khamgaon #Buldhana1
- ‘झिरो मिस्टेक’चा इशारा; राष्ट्रपती दौऱ्यासाठी पोलिसांची कडेकोट मोर्चेबांधणी.. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची ‘हायअलर्ट’ तयारी; सुरक्षा आराखड्याची विशेष पाहणी शेगांव / बुलढाणा, दि. १७ (जिमाका) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. दौरा निर्विघ्न आणि दिमाखात पार पडावा यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सभास्थळ, हेलिपॅड, विश्रांतीगृह तसेच मार्गावरील संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी करण्यात आली. बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारण्याच्या दृष्टीने बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर ‘गरुडदृष्टी’ ठेवली जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. आशितोष गुप्ता यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन आराखडा, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि प्रोटोकॉल याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. “दौऱ्यात कोणतीही त्रुटी चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हायसिक्युरिटी, कडक नियोजन आणि प्रशासनाचा ‘फुल गियर’ — राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी बुलढाणा तयार!1
- चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- Post by Raghunath Aghao1
- खामगाव : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नमुद केले आहे की, न.प. कडुन मालमत्ता धारकांना प्रस्तावित करवाढीच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. ही करवाढ भरमसाठ व अन्यायकारक असल्याने मालमत्ता धारकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सदर करवाढ करतांना प्रस्तावित वार्षिक करामध्ये केलेले मुल्यांकन चुकीचे व अवाजवी आहे याबाबत हरकत नोंदविण्यात येत असुन सदर करवाढ रद्द करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर शरद वसतकार, शहराध्यक्ष आकाश सरदार, तालुका अध्यक्ष शांताराम पाटेखेडे, धम्मपाल नितनवरे, जगदिश तिडके, प्रशिक उमाळे, गजानन हिवराळे, सुमित मोरे, शुभम हिवराळे, आदिच्या सह्या आहेत.3