लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हेल्मेट वाटप संपन्न लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेच्या पोलीस सभासदांना पोलीस अधीक्षक यांचे हस्ते हेल्मेट वाटप. लातूर (एल पी उगीले) राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, व चार चाकी स्वारासाठी सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये लातूर पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि अंमलदार दुचाकी वाहन चालविणाऱ्यांना हेल्मेट व चार चाकी वाहन चालवणाऱ्यास सीट बेल्ट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. लातूर पोलिसांच्या लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर यांनी लातूर पोलीस दलातील अधिकारी व अमलदारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, यासाठी पतसंस्थेच्या सभासदांना हेल्मेट वाटप करण्याचा मानस पोलीस अधीक्षक यांना दाखविला. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या संमतीने लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. लातूर यांच्या वतीने संस्थेतील ठेवीदार व आर.डी. धारक सभासदांना मोफत आयएसआय प्रमाणित हेल्मेटचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात सभासदांना हेल्मेट वाटप कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात 50 पोलीस अंमलदार/संस्थेचे सभासद ठेवीदार यांना हेल्मेट चे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले असून आणखीन दीड हजार पोलिसांना पतसंस्थेकडून हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सदर कार्यक्रमादरम्यान सांगितले की, "उपलब्ध आकडेवारीनुसार, रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 80 टक्के मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होतात. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट हे डोक्याचे व मेंदूचे संरक्षण करणारे अत्यावश्यक साधन आहे. अपघाताच्या वेळी होणारा जोरदार आघात हेल्मेट शोषून घेत असल्यामुळे गंभीर दुखापती टाळल्या जातात आणि मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. त्यामुळे हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले." पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले फ्रंटलाइन यंत्रणा असून, अनेकदा ड्युटीच्या धावपळीत स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळते. अनियमित कामाचे तास, ताणतणाव व सततची हालचाल यामुळे पोलीस कर्मचारीही अपघाताच्या जोखमीला सामोरे जातात. अशा घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वतःपासून सुरुवात करून सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री. परमेश्वर जनक ढेकणे, सचिव नामदेव सारोळे, गोविंद सरवदे, खुर्रम काझी माधव, माधव केंद्रे, आयुब शेख, नवनाथ कल्याने, श्रीमती दीपिका शिवलकर व अनुराधा मेहकर तसेच सभासद मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना नियमित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. पतसंस्थेकडून पोलिसांच्या सुरक्षितेसाठी मोफत हेल्मेट वाटप करण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक पोलीस अधिकारी व अमलदारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे हा आहे. “हेल्मेट ही आपत्ती नसून जीवाची ढाल आहे” हा संदेश देत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. लातूर पोलीस दलाचा हा उपक्रम केवळ पोलीस कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.4
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे1
- 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.1
- Post by Karan1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3