logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट वडीलासुरा येथे बुद्ध-आंबेडकर-रमाई मूर्तींचे अनावरण बदनापूर जिल्हा जालना अंबड तालुक्यातील वडीलासुरा येथे आज सिद्धार्थ बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट होते, तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार नारायणराव कुचे उपस्थित होते. पूज्य भंते राजरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व, सामाजिक समता व शिक्षणाचे मूल्य सांगत, मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध विकासाची कामे जोमाने सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्पित कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, याची मी ग्वाही देतो." आमदार नारायण कुचे म्हणाले की, वडीलासुरा येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या माध्यमातून समता, बंधुता व न्यायाचे विचार समाजात अधिक दृढ होण्यास मदत होईल. तसेच भावी पिढीला प्रेरणा मिळेल. याप्रसंगी कार्यक्रमास नंदकुमार घोडेले, प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर, माजी सभापती रमेश पैठणे, कपिल सरोदे, साहेबराव पटेकर, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष पटेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अर्जुन पटेकर यांनी केले. **

20 hrs ago
user_सय्यद नजाकत
सय्यद नजाकत
बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
20 hrs ago
fbeabe28-cd99-473e-b86c-9c04bbdf3507

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    1
    परतुर तालुक्यात अपेक्स हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खतना‌ कॅम्प सफरपूर्वक: डॉक्टर मुनीर कादरी
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    1
    आकाशवाणी परिसरामध्ये एका चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असून सदरील घटना ही छत्रपती संभाजी नगर शहरातील आकाशवाणी चौकामध्ये घडली आहे सदरील व्हिडिओ हा समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    1
    सिल्लोड : भवन येथे सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण स्मारणार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शासनाच्या ईमेल आयडीवर हरकती नोंदवण्यासाठी घरोघरी जाऊन हरकती नोंदविले जाईल असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 min ago
  • रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू
    1
    रिल च्या नादात भरधाव दुचाकी अपघातात तीन तरुणाचा मृत्यू
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    16 hrs ago
  • पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली ! आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    1
    पुष्कर घाटात भीषण अपघात ! १५० फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली !
आज १9 एप्रिल रविवारी सदरील घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    1
    👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    1
    रील्सचा नाद जीवावर बेतला! समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पलटी-दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, २५ जण जखमी
समृद्धी महामार्ग वर आज १९ एप्रिल रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.