logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ESMA लागू; गॅस-इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धपरिस्थितीचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात घरगुती एलपीजी, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक सेवा पुरवठा अधिनियम (ESMA) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंड सुरू ठेवण्यासाठी विशेष अधिकार प्रशासनाला मिळणार आहेत. गॅस, पेट्रोलियम आणि इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये संप, कामबंद किंवा साठेबाजीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी हा कायदा प्रभावी ठरतो. ESMA कायदा नेमका काय? ESMA चे अधिकृत नाव ‘Essential Services Maintenance Act, 1971’ असे आहे. हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी लागू करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सेवा आणि वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्याच्या माध्यमातून संप किंवा कामबंद झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देता येतात. तसेच आवश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार आणि सेवा खंडित करण्यावरही कठोर कारवाईची तरतूद आहे. कोणत्या सेवा ESMAच्या कक्षेत? या कायद्याच्या कक्षेत रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, जलपुरवठा, बँकिंग सेवा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सेवा, पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद तसेच खनिज उत्पादन आणि वितरणाशी संबंधित संस्था येतात. याशिवाय सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि अन्नधान्य पुरवठ्याशी संबंधित सरकारी संस्थांनाही हा कायदा लागू होतो. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई ESMA लागू असताना अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी संप किंवा कामबंद केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. संबंधित कर्मचारी, युनियन नेते किंवा अधिकारी यांना अटक करण्याचीही तरतूद आहे. पूर्वी एक हजार रुपयांपर्यंत असलेला दंड आता वाढवून तीन लाख रुपयांपर्यंत करण्यात आला असून कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. गॅस उत्पादन वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह एलपीजी पूलमध्ये वळवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच काही क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्याने करण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘मेस्मा’ कायदा महाराष्ट्रात याच धर्तीवर ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम’ लागू आहे. 2023 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनंतर हा कायदा Maharashtra Essential Services Maintenance Act, 2023 (MESMA) म्हणून लागू करण्यात आला आहे. आरोग्य सेवा, वीज, एसटी, औषध दुकाने, शिक्षण तसेच इतर अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडू नये, यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

on 10 March
user_Sanjay  Chandgude
Sanjay Chandgude
Local News Reporter Indapur, Pune•
on 10 March
944234ca-9f36-48da-8c98-d3691228629e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Vadodara Gujarat NH 48 accident date 3 wegti two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    1
    Vadodara Gujarat NH 48 
accident date 3 wegti 
two wheeler Se jyaga par spot ho gaya hai
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    Post Office/Courier शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
    1
    बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!
    user_Mahesh Mangrulkar
    Mahesh Mangrulkar
    Shirur (Kasar), Beed•
    13 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.
    1
    बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
    1
    “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.